-
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या परदेश दौऱ्यावर आहेत.
-
आज म्हणजेच ११ फेब्रुवारी रोजी ते फ्रान्सच्या पॅरीसमध्ये आयोजित AI शिखर परिषदेला संबोधित करणार आहेत.
-
एआय शिखर परिषद २०२५ (AI Action Summit 2025) चे सह-अध्यक्ष म्हणून ते हजर आहेत. दरम्यान, फ्रान्समध्ये पंतप्रधानांचं स्वागत करण्यात आलं.
-
प्रोटोकॉलनुसार पंतप्रधानांना फ्रान्समध्ये स्वागतानंतर सैनिकांकडून सन्मान सलामी देण्यात आली.
-
दरम्यान यावेळी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली तो क्षण
-
यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना अलिंगन दिले.
-
फ्रान्समध्ये मोदींना पाहून तेथील भारतीयांनी पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत केल्याचे पाहायला मिळाले.
-
‘भारत माता की जय, वंदे मातरम” अशा घोषणांनी फ्रान्समधील परिसर दुमदुमला.
-
दरम्यान या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला जाणार आहेत. तिथे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ते भेट घेणार आहेत. या भेटीकडे सबंध जगाचं लक्ष लागून आहे.
-
(सर्व फोटो नरेंद्र मोदी/सोशल मीडिया) हेही पाहा- Mahakumbh 2025: भाविकांच्या अफाट गर्दीनं प्रयागराज ठप्प; अन्न पाण्याविना लोक तासनतास रस्त्यावर अडकले, पाहा फोटो
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”