-
रणवीर अलाहाबादियाची गणना यूट्यूबवरील काही लोकप्रिय पॉडकास्टर्समध्ये केली जाते.
-
परंतु तुम्हाला माहित आहे का की यूट्यूब हे रणवीरसाठी कमाईचे केवळ एक साधन आहे, याशिवाय तो इतर अनेक माध्यमांतून पैसे कमावतो.
-
यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया त्याच्या वादग्रस्त विधानामुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. रणवीर अलाहाबादिया हा यूट्यूबच्या जगातला एक प्रसिद्ध चेहरा आहे, परंतु बहुतेक लोक त्याला केवळ त्याच्या पॉडकास्टमुळे ओळखतात. पण पॉडकास्टिंग हे रणवीरसाठी कमाईचे एकमेव साधन नाही.
-
रणवीर यूट्यूबवरून किती कमावतो?
माध्यमांतील माहितीनुसार, रणवीर अलाहाबादियाची एकूण संपत्ती ६० कोटी रुपये आहे आणि तो अनेक प्रकारच्या व्यवसायातून पैसे कमावतो. मिळालेल्या माहितीनुसार, त्याचे बीअर बायसेप्स नावाचे यूट्यूब चॅनल दरमहा सुमारे ३५ लाख रुपये कमाई करते. -
माँक एंटरटेनमेंट
रणवीर अलाहाबादिया ‘माँक एंटरटेनमेंट’ नावाच्या टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीचाही संस्थापक आहे. ही कंपनी प्रभावशाली मार्केटिंग करून पैसेही कमावते. -
बिगब्रेनको
रणवीरच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये त्याची ‘बिगब्रेनको’ नावाची कंपनी देखील महत्त्वाची आहे. रणवीरची ही कंपनी शैक्षणिक तंत्रज्ञान कंपनी आहे. -
लेव्हल सुपरमाइंड
रणवीर अलाहाबादिया मानसिक आरोग्यासाठीही एक प्लॅटफॉर्म चालवतो. ‘लेव्हल सुपरमाइंड’ असे त्याच्या या उपक्रमाचे नाव आहे. रणवीरने त्याच्या पॉडकास्टमध्ये याविषयी अनेकदा सांगितले आहे. -
RAAAZ
एवढेच नाही तर या प्रसिद्ध यूट्यूबरकडे पुरुषांचा ग्रूमिंग ब्रँड देखील आहे. ‘बिग ब्रेनिको’ अंतर्गत, त्याने RAAAZ नावाची कंपनी स्थापन केली आहे जी पुरुषांसाठी ग्रूमिंग उत्पादने बनवते. -
हे देखील उत्पन्नाचे साधन
रणवीरने ‘BeerBiceps SkillHouse’ नावाचा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे तो युट्यूबवर करिअर करू इच्छिणाऱ्या नवोदितांना नवीन कौशल्ये शिकण्याची संधी देतो. (All Photos Source: Ranveer Allahabadia/Instagram) हेही पाहा- यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया दिवसाला करतो तब्बल ‘एवढी’ कमाई, एकूण संपत्ती किती?
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”