-
माघ पौर्णिमा हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आध्यात्मिक उत्सव आहे, जो माघ महिन्याच्या शेवटी साजरा केला जातो. या दिवशी चांगले कर्म आणि पवित्र नद्यांमध्ये पवित्र स्नान केल्याने पापमुक्त होता येते आणि आशीर्वाद मिळतात असे मानले जाते. त्रिवेणी संगम येथे महाकुंभ आयोजित केला जात असल्याने, लाखो यात्रेकरू पवित्र स्नानासाठी येत आहेत. पंतप्रधान मोदी, अंबानी आणि अनेक मोठ्या व्यक्तींनी देखील या पवित्र स्थळाला भेट दिली आहे. यानिमित्ताने भाविक उपवास पाळतात आणि असा विश्वास करतात की या पवित्र स्नानामुळे त्यांचे पाप धुतले जातील. (Photo: PTI)
-
माघ पौर्णिमेच्या पवित्र दिवशी महाकुंभमेळ्याला भेट देण्यासाठी भाविक आणि पर्यटकांनी रेल्वे स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये गर्दी केली होती. (Photo: PTI)
-
मंगळवारी ११ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ही गर्दी दिसून आली कारण माघी पौर्णिमेला सुमारे ७३ लाख लोक स्नान करतील असा अंदाज होता. त्यामुळे वाहतुक कोंडीही पाहायला मिळाली. (Photo: PTI)
-
रेल्वे प्लॅटफॉर्मवर गर्दी प्रचंड होती, गर्दीतील लोक खिडक्यांमधून रेल्वेच्या आत जातानाही दिसले. (Photo: PTI)
-
शहरातील वाहतूक व्यवस्थेचं चांगल्या प्रकारे नियोजन केल्याचं दिसून आलं. प्रशासनाला स्नानासाठी प्रचंड गर्दी होण्याची अपेक्षा होती. (Photo: PTI))
-
माघी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला, अनंत अंबानी आणि त्यांचे वडील मुकेश अंबानी त्रिवेणी संगमात स्नान करताना दिसले. त्यांच्यासोबत त्यांचे संपूर्ण कुटुंब होते. (Photo: PTI)
-
‘कल्पवास’ ही हिंदू परंपरेत रुजलेली एक जुनी प्रथा आहे. ‘कल्प’ या शब्दाचा अर्थ दीर्घकाळ आहे तर ‘वास’ म्हणजे जिवंतपणा. हा काळ सहसा हिंदू कॅलेंडरनुसार ‘माघ’ महिना असतो. पौर्णिमेनंतर कल्पवास संपेल आणि लवकरच कल्पवासी महाकुंभही सोडतील. (Photo: PTI)
-
२६ फेब्रुवारी रोजी संपणाऱ्या या महाकुंभाला लाखो भाविकांनी हजेरी लावली आहे. पवित्र त्रिवेणी संगमावर आयोजित या महाकुंभाचा समारोप महाशिवरात्रीच्या दिवशी होणार आहे. (Photo: PTI)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”