-
अंडी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यांच्या सेवनाने अनेक समस्या दूर होऊ शकतात. पण तुम्हाला माहिती आहे का जगातील सर्वात महागडी अंडी कोणत्या देशातील लोक खातात? (Photo: Freepik)
-
खरं तर, वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने नुम्बेओचा (Numbeo) हवाला देत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये कोणत्या देशातील लोक डझनभर अंड्यांसाठी सर्वाधिक पैसे मोजतात? हे सांगितले आहे. (Photo: Pexels)
-
१-स्वित्झर्लंड
या आकडेवारीनुसार, स्वित्झर्लंडमधील लोक अंड्यासाठी सर्वात जास्त पैसे खर्च करतात. येथील लोक १२ अंड्यांसाठी ६.७१ डॉलर्स देतात, जे भारतीय चलनात रूपांतरित केल्यास ५८२ रुपये होतात. अशा परिस्थितीत एका अंड्याची किंमत सुमारे ४८ रुपये होते. (Photo: Freepik) -
२-न्यूझीलंड
न्यूझीलंड हा जगातील दुसरा देश आहे जिथे लोक सर्वात महाग अंडी खातात. येथे १२ अंड्यांची किंमत ६.२० डॉलर्स म्हणजेच ५३८ भारतीय रुपये आहे. (Photo: Pexels) -
३- डेन्मार्क
त्याचप्रमाणे, डेन्मार्कमधील लोक एक डझन अंड्यांसाठी ४.५६ डॉलर्स (रु.३९६) देतात. (Photo: Pexels) -
४-नेदरलँड्स
नेदरलँड्समध्ये एका डझन अंड्याची किंमत ४.४० डॉलर्स आहे. जी भारताच्या ३८२ रुपयांएवढी आहे. (Photo: Pexels) -
५-ऑस्ट्रिया
ऑस्ट्रियातील लोक एक डझन अंड्यांसाठी ४.१६ (रु.३६१) देतात. (छायाचित्र: फ्रीपिक) -
६-ऑस्ट्रेलिया
डझनभर अंड्यांना सर्वाधिक किंमत देणारा ऑस्ट्रेलिया हा जगातील सहावा देश आहे. येथे एक डझन अंड्याची किंमत ४.१२ डॉलर्स (रु. ३५७.९५) आहे. (Photo: Pexels) -
७-ग्रीस
ग्रीसमधील लोक डझनभर अंड्यांसाठी मोठी किंमत मोजतात. येथे १२ अंड्यांची किंमत ४.०६ डॉलर्स (रु. ३५२.७२) आहे. (Photo: Pexels) -
८-इस्रायल
इस्रायलमध्येही अंडी खूप महाग आहेत. येथे डझनभर अंड्यांची किंमत ४.०५ डॉलर्स म्हणजेच ३५१.८४ रुपये आहे. (Photo: Pexels) -
९-नॉर्वे
नॉर्वेमध्ये एका अंड्याची किंमत ३.९७ डॉलर्स आहे. जर आपण त्याचे भारतीय रुपयांमध्ये रूपांतर केले तर ते ३४४.९३ रुपये होते. (Photo: Pexels) -
१०-फ्रान्स
फ्रान्स हा जगातील दहावा देश आहे जिथे लोक सर्वात महागडी अंडी खातात. येथील लोक डझनभर अंड्यांसाठी ३.९४ (रु. ३४५.३१) देतात. (Photo: Pexels) -
अमेरिका-यूके मध्ये किंमत
त्याचप्रमाणे, अमेरिकेत एक डझन अंड्याची किंमत ३.९४ डॉलर्स, यूकेमध्ये ३,७२, इटलीमध्ये ३.६३ आणि कॅनडामध्ये ३.४० डॉलर्स आहे. (Photo: Pexels) -
भारतातील किंमत
भारताबद्दल बोलायचे झाले तर, या आकडेवारीनुसार, येथे एक डझन अंड्याची किंमत ०.९६ डॉलर एवढी म्हणजे ६.९१ रुपये आहे. (Photo: Pexels) हेही पाहा- दररोज २० मिनिटे नाचल्याने शरीराला कोणते फायदे होतात?

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार