-
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी केल्यामुळे आधुनिक मुंबईची स्थापना होऊ शकली, असे अनेक दाखले इतिहासात सापडतात. पण नेमकं त्यावेळी काय झालं होतं? ब्रिटिशांची राजधानी सुरतहून मुंबईत कशी आली हे आज आपण पाहूयात. २०२० साली जयवंत साळगावकर यांनी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत या इतिसाहाचे संदर्भ सांगितले होते. (फोटो – लोकसत्ता टीम)
-
जयवंत साळगावकर म्हणाले होते, “शिवाजी महाराजांनी ५ जानेवारी १६६४ ला सुरतेवर हल्ला केला. तेव्हा तिथे इनायत खान हा दिल्ली दरबाराचा प्रतिनिधी काळजी घ्यायला होता. पण हल्ला होताच तो पळून गेला. पण तेथील वखारीत ब्रिटिशांचा एक अधिकारी अधिपती होता. त्याने महाराजांशी तहाची बोलणी केली.” (फोटो – लोकसत्ता टीम)
-
तो हुशार होता, त्याच्या लक्षात आलं की शिवाजी महाराज हे सुरतेवर कब्जा करायला आलेच नाहीत, त्यांना सुरतेतून नित्यनियमाने पैसे मिळाले पाहिजेत. शिवाजी महाराजांची एक खासियत अशी होती की त्यांचा खजिना अत्यंत काळजीपूर्वक सांभाळत असत. ते गेले तेव्हाही त्यांचा खजिना भरलेला होता. त्यामुळे हा आर्थिक अँगल त्याच्या लक्षात आला. त्यामुळे पुन्हा पुन्हा हल्ला होत होणार, हे त्याने हेरलं होतं. (फोटो – लोकसत्ता टीम)
-
त्यामुळे ही वखार हलवण्याची गरज त्याच्या लक्षात आली. त्याकरता मुंबई बेट ही सर्वांत उत्तम जागा आहे, असं त्याच्या लक्षात आलं. कारण मुंबई समुद्राला लागून आहे, त्यामुळे नौदलाला कधीही वापरता येईल. पण तेव्हा मुंबई होती पोर्तुगिजांकडे. आता पोर्तुगिजांकडून मुंबई घ्यायची कशी? ब्रिटिशांनी पोर्तुगिजांना कळवलं की मुंबई आम्हाला पाहिजे. (फोटो – लोकसत्ता टीम)
-
पोर्तुगिजांची राजकन्या डोना कॅथरीन ही दिसायला फारशी चांगली नव्हती. त्यामुळे तिच्या लग्नात मोठा नजराणा द्यायला राजघराणं तयार होतं. त्यामुळे ब्रिटिश सरकारने ही बेटं आंदण म्हणून मागितली. पोर्तुगिजांनी ती दिली. ती दिल्यावर सुरतची राजधानी मुंबईला हलवली. (फोटो – लोकसत्ता टीम)
-
आता मुंबईत सगळंच नव्याने करण्याची गरज होती. त्यांनी पहिली गोष्ट केली ती म्हणजे मुंबईचा पोलीस फोर्स स्थापन केला. शरीराने बळकट असे भंडारी लोक यांचा भरणा या फोर्समध्ये सर्वाधिक केला. (फोटो – लोकसत्ता टीम)
-
पोलीस दलाची स्थापना केल्यानंतर त्यांनी मुंबईत न्यायमंदिर बांधलं. भोईवाड्यात ते न्यायमंदिर आजही आहे. (फोटो – प्रातिनिधिक छायाचित्र)
-
संरक्षणार्थ मुंबईत नौदल पाहिजे हेही त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे ब्रिटिशांनी माझगाव डॉकला भारतीय नौदलाची स्थापना केली. (फोटो – लोकसत्ता टीम)
-
मुंबई सर्व बाजूंना सुरक्षित झाल्यानंतर गुजरातचे श्रीमंत धनाढ्य व्यापाऱ्यांना मुंबईत बोलावण्यात आले. (फोटो – लोकसत्ता टीम)
-
अशाप्रकारे महाराजांनी सुरतेवर हल्ला केला नसता तर आधुनिक मुंबईची स्थापना होऊ शकली नसती. सुरतच ब्रिटिशांची राजधानी राहिली असती. इथली भाषा पोर्तुगाल होती, ती ब्रिटिशांनी इंग्रजी केली. तिथून या शहराच्या वाढीला सुरुवात झाली. मुंबई अश्मयुगापासून आहे, पण आधुनिक मुंबईची स्थापना शिवाजी महाराजांच्या काळात झाली. (फोटो – प्रातिनिधिक छायाचित्र)

शाळा बुडवून मुलगी बॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून सांगा काकांनी बरोबर केलं का?