-
आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी सर्वात महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे पासपोर्ट. त्याशिवाय दुसऱ्या देशात प्रवेश करता येत नाही. (छायाचित्र: पेक्सेल्स)
-
भारतीय पासपोर्ट हा जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टपैकी एक आहे. हॅन्ली पासपोर्ट इंडेक्स २०२५ च्या अहवालानुसार, भारतीय पासपोर्ट जगात ८५ व्या क्रमांकावर आहे. (छायाचित्र: इंडियन एक्सप्रेस)
-
पण तुम्हाला माहिती आहे का भारतात किती प्रकारचे पासपोर्ट आहेत आणि त्यांचा रंगानुसार कोणाची ताकद किती आहे? यापैकी सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणता आहे याबद्दल जाणून घेऊयात.
-
भारत सरकारकडून चार प्रकारचे पासपोर्ट जारी केले जातात ज्यामध्ये तपकिरी, पांढरा, निळा आणि केशरी रंगांचा समावेश असतो. (छायाचित्र: इंडियन एक्सप्रेस)
-
पांढरा पासपोर्ट कोणाला दिला जातो?
भारत सरकार अधिकृत कामासाठी परदेशात प्रवास करणाऱ्या अधिकाऱ्यांना पांढऱ्या रंगाचा पासपोर्ट जारी करते. हा पासपोर्ट सरकारी अधिकाऱ्यांची ओळख दर्शवतो. पांढरे पासपोर्ट धारण करणाऱ्या अधिकाऱ्यांना अनेक सुविधा मिळतात. (छायाचित्र: इंडियन एक्सप्रेस) -
केशरी पासपोर्ट:
भारत सरकारकडून फक्त दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या भारतीय नागरिकांना केशरी पासपोर्ट जारी केला जातो. यामध्ये प्रामुख्याने परदेशात स्थलांतरित कामगार म्हणून काम करणाऱ्या भारतीयांचा समावेश आहे. (छायाचित्र: इंडियन टेक अँड इन्फ्रा/ट्विटर) -
निळ्या रंगाचा पासपोर्ट
भारत सरकार सामान्य भारतीय नागरिकांना निळ्या रंगाचा पासपोर्ट जारी करते. वास्तविक, भारत सरकार पासपोर्टचा रंग वेगळा ठेवते जेणेकरून सामान्य नागरिक आणि सरकारी अधिकारी-राजदूतांना ओळखणे सोपे होईल. (छायाचित्र: पेक्सेल्स) -
तपकिरी पासपोर्ट
भारत सरकार भारतीय राजदूत आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना तपकिरी रंगाचे पासपोर्ट जारी करते. यामध्ये भारतीय राजदूत, आयएएस आणि आयपीएस दर्जाचे सरकारी अधिकारी यांचा समावेश आहे. (छायाचित्र: पेक्सेल्स) -
तपकिरी रंगाचा पासपोर्ट धारक परदेशात देशाचे प्रतिनिधित्व करतो. हा सर्वात शक्तिशाली भारतीय पासपोर्ट मानला जातो. (छायाचित्र: इंडियन एक्सप्रेस)
-
किती देशांमध्ये व्हिसा फ्री प्रवेश आहे?
दरम्यान, भारतीय पासपोर्टसह भारतीय नागरिक आता ५७ देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात. (छायाचित्र: इंडियन एक्सप्रेस) हेही पाहा- ७४ वर्षीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुदृढ आरोग्याचे रहस्य काय? वर्षातील ३०० दिवस खातात ‘हे’ सुपरफूड…
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ विधानावर अजित पवारांचं उत्तर; म्हणाले, “ते शिवसेनेचे…”