-
आज ८ मार्च २०२५ ला संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा केला जात आहे. हा दिवस स्त्री शक्ती, धैर्य आणि समानतेचे प्रतीक मानला जातो. भारताचा इतिहास अशा शूर महिलांनी भरलेला आहे, ज्यांनी आपल्या अतुलनीय धैर्याने आणि बलिदानाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यातच योगदान दिले नाही तर समाजातील महिलांसाठी नवीन मार्गही उघडले. भारताच्या महान भूमीने नेहमीच शूर, धैर्यवान आणि प्रेरणादायी महिलांना जन्म दिला आहे. ज्यांनी आपल्या धैर्याने, जिद्दीने आणि बलिदानाने इतिहास रचला आहे. चला जाणून घेऊया अशाच भारतातील १० धाडसी महिलांबद्दल… (Photo Social Media) -
१. राणी लक्ष्मीबाई (१९३५-१८५८)
झाशीची राणी लक्ष्मीबाई या भारताच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाचे (१८५७) प्रतीक आहेत. इंग्रजांनी झाशी काबीज करण्याचा प्रयत्न केला तेव्हा राणी आपल्या दत्तक मुलाला पाठीवर बांधून रणांगणात उतरल्या आणि इंग्रजांशी शौर्याने लढल्या. “खूब लड़ी मर्दानी, वह तो झांसी वाली रानी थी” – ही ओळ त्यांच्या जाज्वल्य शौर्याचा पुरावा आहे. १८ जून १८५८ रोजी ग्वाल्हेरमध्ये त्या शहीद झाल्या, परंतु त्यांचे जीवन आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देते. (Photo Social Media) -
२. सरोजिनी नायडू (१८७९-१९४९)
सरोजिनी नायडू, ज्यांना “भारत की कोकिला” म्हणूनही ओळखले जाते, त्या स्वातंत्र्यलढ्यातील एक प्रमुख महिला नेत्या होत्या. त्यांच्या कवितांनी लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत केली. त्या सविनय कायदेभंग चळवळ आणि असहकार चळवळीत सक्रिय होत्या. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा झालेल्या सरोजिनी यांनी आपल्या धैर्याने आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर महिलांना नेतृत्वाचा नवा मार्ग दाखवला. (Photo Social Media) -
३. कस्तुरबा गांधी (१८६९-१९४२)
महात्मा गांधींच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांनी स्वातंत्र्यलढ्यात पडद्यामागे महत्त्वाची भूमिका बजावली होती. स्वातंत्र्याचा निश्चय त्यांच्यापेक्षा (गांधीजींपेक्षा) मोठा असल्याचे खुद्द गांधीजींनीच सांगितले होते. इंग्रजांविरुद्धच्या अनेक आंदोलनात त्यांनी भाग घेतला आणि तुरुंगवासही भोगला. त्यांचा साधेपणा आणि धैर्य आजही महिलांसाठी प्रेरणादायी आहे. (Photo Social Media) -
४. भिकाजी कामा (१८६१-१९३६)
परदेशात राहून भिकाजी कामा यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. १९०७ मध्ये जर्मनीतील स्टुटगार्ट येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत त्यांनी भारताचा पहिला तिरंगा ध्वज फडकावला आणि ब्रिटिश राजवटीविरुद्ध आवाज उठवला. त्यांच्या धाडसाने जगाला दाखवून दिले की भारतीय महिलाही क्रांतीकारी नेत्या होऊ शकतात. (Photo Social Media) -
५. लक्ष्मी सहगल (१९१४-२०१२)
लक्ष्मी सहगल, ज्यांना कॅप्टन लक्ष्मी म्हणून ओळखले जाते, त्या आझाद हिंद फौजेच्या पहिल्या महिला कमांडर होत्या. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रभावाने त्यांनी “झाशी रेजिमेंट” चे नेतृत्व केले आणि ब्रिटिशांविरुद्ध युद्ध केले. रणांगणातही महिला मागे नाहीत हे त्यांच्या शौर्याने सिद्ध होते. (Photo Social Media) -
६. कल्पना चावला (१९६२-२००३)
कल्पना चावला या भारतातील पहिल्या महिला अंतराळवीर होत्या, ज्यांनी NASA साठी काम केले. २००३ मध्ये कोलंबिया स्पेस शटल अपघातात त्यांचा मृत्यू झाला, परंतु त्यांचे योगदान आजही सर्वांना प्रेरणा देते. (Photo Social Media) -
७. कनकलता बरुआ (१९२४-१९४२)
आसाममधील या तरुणीने वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी भारत छोडो आंदोलनात तिरंगा हातात धरून ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला. १९४२ मध्ये मिरवणुकीचे नेतृत्व करताना ती ब्रिटिशांच्या गोळीची शिकार झाली. कनकलता यांचे बलिदान युवा पिढीसाठी आजही प्रेरणादायी आहे. (Photo Social Media) -
८. मातंगिनी हजारा (१८७०-१९४२)
बंगालच्या या धाडसी महिलेने वयाच्या ७२ व्या वर्षी भारत छोडो आंदोलनात भाग घेतला. हातात तिरंगा घेऊन रॅलीचे नेतृत्व करताना इंग्रजांच्या गोळीने त्या शहीद झाल्या. (Photo Social Media) -
९. सावित्रीबाई फुले (१८३१-१८९७)
सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी क्रांतिकारी पावले उचलली. त्यांचे पती ज्योतिबा फुले यांच्याबरोबर त्यांनी पहिली महिला शाळा उघडली आणि सामाजिक कुप्रथांविरुद्ध लढा दिला. भारतीय समाजातील स्त्रियांची स्थिती बदलण्यात त्यांच्या निर्भीडपणाने महत्त्वाची भूमिका बजावली. (Photo Social Media) -
१०. बचेंद्री पाल (जन्म १९५४)
आधुनिक भारतातील या धाडसी महिलेने १९८४ मध्ये एव्हरेस्ट शिखर सर करून इतिहास रचला. ही उंची गाठणारी बचेंद्री पाल ही पहिली भारतीय महिला होती. भारतीय महिला कोणत्याही आव्हानावर मात करू शकतात हे तिच्या यशाने सिद्ध केले आहे. (Photo Social Media) -
भारताचा इतिहास अशा अनेक शूर महिलांनी भरलेला आहे.
शांती तिग्गा या भारतीय सैन्यात भरती झालेल्या पहिल्या महिला होत्या, ज्यांनी पुरुषांच्या बरोबरीने कठोर प्रशिक्षण पूर्ण केले आणि सैन्यात आपला ठसा उमटवला. त्यांचे शौर्य आजही प्रेरणादायी आहे. पॅन ॲम फ्लाइट ७३ एअर होस्टेस नीरजा भानोत यांनी प्रवाशांचे दहशतवाद्यांपासून संरक्षण करताना आपल्या प्राणाची आहुती दिली. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी त्यांनी दिलेले बलिदान भारताच्या इतिहासात शौर्याचे प्रतीक बनले. त्यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करण्यात आले. या महिला दिनी या सर्व कर्तृत्वान महिलांना सलाम. (Photo Social Media)
हेही पाहा- हिंदू, इस्लाम की ख्रिश्चन? कोणता धर्म जगात सर्वात वेगाने वाढत आहे?

२ एप्रिल पंचांग : ‘श्री लक्ष्मी पंचमीला’ मेष, वृषभसह ‘या’ राशींची सुखाने भरणार ओंजळ; आज तुम्हाला कसा मिळणार आशीर्वाद? वाचा राशिभविष्य