-
स्टुडिओ ‘घिब्ली’ने पुन्हा एकदा इंटरनेटवर वर्चस्व निर्माण केले आहे, पण यावेळी एआयद्वारे! नेटिझन्स ग्रोक, चॅटजीपीटी आणि विविध एआय इमेज जनरेटर सारख्या टूल्सचा वापर करून लोकप्रिय चित्रपटातील दृश्ये, ऐतिहासिक क्षण आणि प्रिय पात्रांना ‘घिब्ली’च्या शैलीतील उत्कृष्ट प्रकारे रूपांतरित करण्यासाठी क्रिएटिव्ही वापरताना दिसले. सोशल मीडियावर प्रसिद्ध व्यक्ती आणि पॉप कल्चर क्षणांच्या एआय-जनरेटेड क्रिएटिव्हीची एकच चर्चा रंगली. हा ट्रेंड केवळ ‘घिब्ली’विषयीचे आकर्षण दर्शवित नाही तर एआय चाहत्यांच्या क्रिएटिव्हीमध्ये कशी क्रांती घडवत आहे हे देखील दर्शवते
-
मीम्स रिक्रिएट करताना नेटिझन्सनी ChatGPT 4o वापरून स्टुडिओ ‘घिब्ली’ चे व्हर्जन केे आहे. (Photo: X)
-
बाहुबली चित्रपटातील लोकप्रिय दृश्य
-
या पॅरिस २०२४ ऑलिंपिकमध्ये युसूफ डिकेकने (Yusuf Dikec) १० मीटर एअर पिस्तुल मिश्र सांघिक स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्याने या स्पर्धेत रौप्यपदक मिळविले आहे. मात्र ज्यापद्धतीने युसूफने आपला खेळ सादर केला, त्यावरून तो आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता ५१ वर्षांचा युसूफ केवळ हातात पिस्तुल घेऊन आला आणि रौप्यपदक घेऊन गेला. डावा हात खिशात घालून उजव्या हाताने सहजपणे नेम धरणारा युसूफचा फोटो त्यावेळई जोरदार व्हायरल झाला होता. त्याचे ‘घिब्ली’ चे व्हर्जन पाहा.
-
‘भूल भुलैया’ या आवडत्या बॉलिवूड चित्रपटातील ‘एक्स’ वरील एका युजरने ‘छोटा पंडित’ (लहान पुजारी) या पात्राचे स्टुडिओ ‘घिब्ली’ व्हर्जन शेअर केले. (प्रतिमा: एक्स)
-
युजर्सनी चित्रपटातील गॉडफादर मालिकेतील हे लोकप्रिय दृश्य सोशल मीडियावर शेअर केले. पाहा स्टुडिओ ‘घिब्ली’ व्हर्जन. (प्रतिमा: X)
-
युजर्सनी पंतप्रधान मोदींचे महाकुंभ २०२५ मधील फोटो ‘घिब्ली’ स्टुडिओ व्हर्जन शेअर केले आहे. (प्रतिमा: X)
-
या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबाराची आठवण करून देताना, चॅटजीपीटी 4o ने सर्वांचे लक्ष वेधले. पाहा स्टुडिओ ‘घिब्ली’ व्हर्जन. ( (प्रतिमा: एक्स)
-
ग्रोक वापरून तयार केलेल्या स्टुडिओ ‘घिब्ली’ व्हर्जनमध्ये आयपीएल २०२५ च्या ट्रॉफीचा फोटो दाखवला आहे आणि या फोटोमध्ये सर्व दहा संघातील कर्णधार सामन्यांपूर्वी रांगेत उभे दिसत आहे. (प्रतिमा: X)
-
X वरील एका पेजवर ChatGPT4o वरील ‘घिब्ली’ टूलचा वापर करून शास्त्रज्ञ, मॅडम क्युरी आणि अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा फोटो शेअर केला आहे. (प्रतिमा: X)
-
ऑनलाइन चित्रपटप्रेमींनी ऑस्कर विजेत्या ला ला लँडच्या क्लायमॅक्स सीनच्या स्टुडिओ ‘घिब्ली’ व्हर्जन शेअर केले आहेत. (प्रतिमा: X)

“…तर माझेही तुकडे केले असते”, नाना पाटेकरांनी वाचवला होता अशोक सराफांचा जीव; म्हणाले, “नान्या रिक्षा घेऊन…”