-
सध्या वक्फ सुधारणा विधेयकावरून बराच गोंधळ सुरू आहे. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक २०२५ सादर केले. यावेळी त्यांनी सभागृहात अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. (छायाचित्र: पीटीआय)
-
रिजिजू म्हणाले, वक्फ बोर्डाने दिल्लीतील अनेक प्रसिद्ध मालमत्तांवर आपला दावा केला आहे. यामध्ये संसदेपासून, विमानतळ आणि सीजीओ कॉम्प्लेक्सपर्यंत अनेक इमारतींचाही समावेश आहे. (छायाचित्र: पीटीआय)
-
१- केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, “जर वक्फ दुरुस्ती विधेयक येथे मांडले गेले नसते तर संसद भवन देखील वक्फ मालमत्ता घोषित केले गेले असते. (छायाचित्र: पीटीआय)
-
२- लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक सादर करताना, किरेन रिजिजू म्हणाले की, “१९७८ पासून दिल्लीत एक खटला सुरू होता ज्यामध्ये वक्फ बोर्डाने दावा केला होता की सीजीओ कॉम्प्लेक्ससह अनेक मालमत्ता वक्फ मालमत्ता आहेत. (छायाचित्र: पीटीआय)
-
३- त्यांनी सांगितले की, दिल्ली वक्फ बोर्डाने वसंत विहारमधील संसद भवन, विमानतळ, हवाई दलाच्या जमिनीसह सुमारे १२३ मालमत्तांवर दावा केला होता.(छायाचित्र: पीटीआय)
-
४- विधेयक सादर करताना किरेन रिजिजू म्हणाले की, जर नरेंद्र मोदींचे सरकार आले नसते आणि यूपीए सरकार सत्तेत राहिले असते, तर कित्येक इमारती डीनोटिफाय झाल्या असत्या. कारण यूपीएने आधीच १२३ मालमत्ता अधिसूचित केल्या होत्या.(छायाचित्र: पीटीआय)
-
५- जगात कुठेही जास्तीत जास्त वक्फ मालमत्ता असेल तर ती भारतात आहे. तरीदेखील मुस्लिम गरीब कसे राहिले? असा प्रश्न उपस्थित करत मुस्लिमांना वैद्यकीय उपचार, शिक्षण आणि इतर गोष्टींपासून वंचित ठेवण्यात आल्याचं रिजिजूंनी म्हटलं. (छायाचित्र: पीटीआय)
-
६- विधेयक सादर करताना किरेन रिजिजू म्हणाले की, केरळमधील एका ठिकाणी वक्फ बोर्डाने ख्रिश्चन समुदायाच्या ६०० लोकांची जमीन वक्फ जमीन म्हणून घोषित केली आहे. (छायाचित्र: पीटीआय)
-
७- केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, हरियाणामध्येही एक गाव आहे जिथे शीख समुदायाचे लोक राहत होते. येथे वक्फ बोर्डाने संपूर्ण गावावर दावा केला होता. (छायाचित्र: पीटीआय)

Waqf Amendment Bill: वक्फ दुरूस्ती विधेयक मध्यरात्री लोकसभेत मंजूर, पंतप्रधानांची मतदानाला दांडी