-
फोर्ब्सने २०२५ सालची अब्जाधीशांची यादी जाहीर केली आहे. २०२५ सालामधील जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क आहेत ज्यांच्याकडे ३४२ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. (Photo: Reuters)
-
एलोन मस्क ५३ वर्षांचे आहेत पण तुम्हाला माहिती आहे का जगातील सर्वात वयस्कर श्रीमंत व्यक्ती कोण आहे आणि त्यांचे वय किती आहे? (Photo: Indian Express)
-
खरं तर, हे दुसरे तिसरे कोणी नसून वॉरेन बफे आहेत जे जगातील सर्वात वृद्ध श्रीमंत व्यक्ती आहेत. (Photo: Indian Express)
-
जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक असलेले वॉरेन बफे हे बर्कशायर हॅथवे कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ आहेत. त्यांना ओमाहाचे ओरॅकल म्हणूनही ओळखले जाते. (Photo: Indian Express)
-
वॉरेन बफे हे ९४ वर्षांचे आहेत आणि फोर्ब्सच्या यादीनुसार ते जगातील सहावे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. (Photo: Reuters)
-
फोर्ब्सच्या मते, वॉरेन बफे २०२५ मध्ये एकूण १६७.६ अब्ज डॉलर्स एवढ्या संपत्तीचे मालक आहेत. (Photo: Indian Express)
-
वॉरेन बफे यांची कंपनी बर्कशायर हॅथवेकडे ३२५ अब्ज डॉलर्स रोख आहे. गेल्या वर्षीच त्यांनी अॅपल आणि बँक ऑफ अमेरिकाचे अब्जावधी डॉलर्सचे शेअर्स विकले. (Photo: Indian Express)
-
ही रोकड मायक्रोसॉफ्ट, अॅपल, अमेझॉन, एनव्हीडिया कॉर्प आणि अल्फाबेट सारख्या अनेक मोठ्या टेक कंपन्यांच्या एकूण रोख रकमेपेक्षा जास्त आहे. (Photo: Reuters)
-
वॉरेन बफे यांच्या मते, त्यांना रोख रकमेऐवजी इक्विटीमध्ये (कंपनीतील हिस्सा खरेदी करणे) गुंतवणूक करायला आवडते आणि ते या धोरणावर कोणताही निर्णय घेण्याची घाई करत नाहीत. (Photo: Indian Express)
-
या वर्षी जेव्हा बाजार कोसळला तेव्हा लोकांना असा समज झाला की कदाचित बफेट यांना हे आधीच माहिती होते. कारण त्यांनी या पडझडीआधीच अॅपलचे शेअर्स विकले होते. (Photo: Indian Express) हेही पाहा – दिव्या भारतीच्या नावावर असलेला ‘हा’ रेकॉर्ड ऐश्वर्या राय, माधुरी दीक्षितलाही मोडता आला नाही…

Tanisha Bhise Death Case : “होय डॉक्टरांनी डिपॉझिट मागितले होते”, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाची कबुली; म्हणाले, “त्या दिवशी…”