-
काल १४ एप्रिल रोजी देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकर यांची दोन लग्न झाली होती. (Photo: Indian Express)
-
बाबासाहेब त्यांच्या दुसऱ्या पत्नीला कसे भेटले आणि त्यांचे लग्न कसे झाले ही गोष्ट खूप कमी लोकांना माहिती आहे. (Photo: Indian Express)
-
भारतीय संविधान लिहिल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना निद्रानाशाची समस्या आणि पायांमध्ये न्यूरोपॅथिक वेदना होत होत्या. (Photo: Indian Express)
-
याशिवाय, ते मधुमेह आणि रक्तदाबाच्या समस्यांनीही खूप त्रस्त होते. अशा परिस्थितीत ते उपचारासाठी मुंबईला गेले. (Photo: Indian Express)
-
मुंबईतील ज्या रुग्णालयात बाबासाहेब उपचारासाठी गेले होते, तिथे त्यांची भेट शारदा कबीर यांच्याशी झाली, ज्या त्यांच्यावर उपचार करत होत्या. उपचारांदरम्यान दोघांमधील जवळीक वाढू लागली. शारदा डॉक्टर असण्यासोबतच एक सामाजिक कार्यकर्त्यादेखील होत्या. (Photo: Indian Express)
-
बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या पत्नी रमाबाई यांचे १९३५ मध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. अशा परिस्थितीत, डॉक्टरांनी बाबासाहेबांना त्यांची काळजी घेण्यासाठी एक साथीदार ठेवण्याचा सल्ला दिला. (Photo: Indian Express)
-
यानंतर, बाबासाहेबांनी शारदा कबीर यांना लग्नाचा प्रस्ताव दिला आणि १५ एप्रिल १९४८ रोजी दिल्लीतील त्यांच्या घरी त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर शारदा कबीर यांनी सविता आंबेडकर हे नाव धारण केले आणि आयुष्यभर बाबासाहेबांसोबत राहिल्या. (Photo: Indian Express)
-
बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी सविता आंबेडकरांनी १९३७ मध्ये मुंबई येथून एमबीबीएस पदवी प्राप्त केली. (Photo: Indian Express)
-
लग्नानंतर बाबासाहेब आणि त्यांच्या पत्नीबद्दल अनेक प्रकारच्या चर्चा आणि वाद सुरू झाले. खरंतर, त्यांच्या दुसऱ्या पत्नी सविता आंबेडकर या एका ब्राह्मण कुटुंबातल्या होत्या. (Photo: Indian Express)
-
दरम्यान, या सर्व गोष्टींचा सविता आंबेडकरांवर काहीही परिणाम झाला नाही आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणापर्यंत पूर्ण निष्ठेने त्यांची सेवा करत राहिल्या. लोक सविता आंबेडकरांना ‘माई’ही म्हणत असत. (Photo: Indian Express)
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीचे तीन ठार; एक बालक गंभीर जखमी