-
उन्हाळा सुरू झाला आहे आणि अनेक राज्यांमध्ये तापमानाचा पाचा चढत आहे. अशा परिस्थितीत स्वतःची काळजी घेण्यासोबतच एसीपासून ते वाहनांपर्यंत सर्व गोष्टींची काळजी घेणं आवश्यक असतं. (छायाचित्र: पेक्सेल्स)
-
उन्हाळ्यात काही गोष्टी चुकूनही तुमच्या कारमध्ये ठेवू नका. या गोष्टींमुळे उन्हात पार्क केलेल्या तुमच्या कारमध्ये स्फोट होऊ शकतो. (छायाचित्र: पेक्सेल्स)
-
कारमध्ये परफ्यूम का ठेवू नये?
उन्हाळ्यात कारमध्ये परफ्यूम ठेवू नये. परफ्यूममध्ये अल्कोहोल असते जे उष्णतेमध्ये गॅसमध्ये बदलू शकते आणि बाटलीच्या आत दाब निर्माण होऊ शकतो. थेट सूर्यप्रकाश परफ्यूमच्या बाटलीवर पडला तर त्यातून वायू निर्माण होऊ शकतो आणि स्फोट होऊ शकतो. (छायाचित्र: पेक्सेल्स) -
लायटर
उन्हाळ्यात कारमध्ये लायटर ठेवू नये. लायटर बराच वेळ सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आलं तर लायटरचा स्फोट होऊ शकतो. ज्यामुळे कारमध्ये आग लागू शकते. (छायाचित्र: पेक्सेल्स) -
सॅनिटायझर
उन्हाळ्यात कारमध्ये सॅनिटायझर ठेवू नये. प्रखर सूर्यप्रकाश त्यावर पडतो तेव्हा आगीचा धोका वाढतो. सॅनिटायझरमुळे तुमच्या कारमध्ये मोठा स्फोट होऊ शकतो. (छायाचित्र: पेक्सेल्स) -
गॅस कॅनिस्टर
तुम्ही कारमध्ये गॅस कॅनिस्टर ठेवत असाल तर तो सर्वात आधी कारमधून बाहेर काढा कारण आता उन्हाळा सुरू झाला आहे. गॅस कॅनिस्टर प्रखर सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यास स्फोट होण्याची व आग लागण्याची भिती असते. (छायाचित्र: पेक्सेल्स) -
पाण्याच्या रिकाम्या बाटल्या
बरेच लोक कारमध्ये पाण्याच्या रिकाम्या बाटल्या ठेवतात. पण ही चूक महागात पडू शकते. खरं तर, रिकामी बाटली तेजस्वी सूर्यप्रकाशात लेन्सप्रमाणे काम करते. जेव्हा ती गरम होते तेव्हा ते वितळू लागते ज्यामुळे आग लागू शकते. अशी शक्यता फारच कमी असते तरी देखील आपण काळजी घ्यायला हवी. (छायाचित्र: पेक्सेल्स) -
कुलेंट
कारमध्ये कुलेंट कमी असल्यास इंजिनवरील भार वाढतो, त्यामुळे कार अधिक गरम होते. त्यासाठी कारमधील कूलेंटचं प्रमाण नियमित तपासत राहा. (छायाचित्र: पेक्सेल्स) -
उन्हाळ्यात गरम हवेमुळे कारच्या आत उच्च दाब निर्माण होतो ज्यामुळे काचा फुटू शकतात किंवा काचांना तडे जाण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही तुमची कार उन्हात उभी केली असेल तर कारची खिडकी थोडीशी उघडी ठेवा जेणेकरून आतली गरम हवा बाहेर पडू शकेल. (छायाचित्र: पेक्सेल्स)
‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…