-
Indian Railway Rules: उन्हाळी सुट्टी लवकरच सुरू होणार आहे. यानिमित्त अनेकजण फिरायला जाण्याचा प्लॅन कपरतात. काही लोक कारने तर काही रेल्वेने प्रवास करण्याचा पर्याय निवडतात. कारण भारतीय रेल्वे हे प्रवासाचे एक अतिशय सोयीस्कर साधन आहे. कमी भाडे आणि आरामदायी प्रवासासाठी बहुतेक लोक इतर कोणत्याही वाहतुकीच्या साधनांपेक्षा भारतीय रेल्वेने प्रवास करणे पसंत करतात.
-
भारतीय रेल्वेचे विशाल जाळे देशभर पसरलेले आहे. या कारणास्तव, देशाच्या कनेक्टिव्हिटीमध्ये त्याचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. म्हणूनच, भारतीय रेल्वेला देशाची जीवनवाहिनी असेही म्हटले जाते.
-
रेल्वेचे भाडेही बरेच किफायतशीर आहे. प्रवाशांना प्रवासादरम्यान कोणतीही अडचण येऊ नये यासाठी भारतीय रेल्वेने अनेक नियम बनवले आहेत.
-
जर तुम्ही रात्रीच्या वेळी ट्रेनने प्रवास करत असाल तर तुम्हाला काही नियमांची माहिती असायला हवी. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
-
अनेक वेळा प्रवासी तक्रार करतात की, टीटीई त्यांना रात्री उठवतात आणि त्यांची तिकिटे तपासतात. यामुळे त्यांची झोप बिघडते. प्रवाशांची ही समस्या लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने एक खास नियम बनवला आहे.
-
या नियमानुसार, टीटीई रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत तिकिटे तपासू शकणार नाहीत, रात्री १० नंतर ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हा नियम लागू होत नाही, टीटीईला त्या लोकांची तिकिटे तपासण्याची परवानगी आहे.
-
जर तुम्ही रात्री १० वाजल्यानंतर ट्रेनमध्ये प्रवास करताना इअरफोनशिवाय मोबाईलवर, स्पीकरवर म्युझिक ऐकले किंवा व्हिडिओ पाहिले तर तुमच्याबरोबर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास होऊ शकतो.
-
याशिवाय, रात्री तुम्ही मोठ्याने बोलू शकत नाही. जर तुम्ही असे केले आणि तुमच्या सहप्रवाशाने तक्रार दाखल केली तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. (सर्व फोटो-फ्रीपिक | इन्स्टाग्राम)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…