-
पहिले लॅटिन अमेरिकन पोप फ्रान्सिस यांचे २१ एप्रिल २०२५ रोजी वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले आहे. ख्रिश्चनांचे हे सर्वात मोठे धार्मिक नेते गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी होते. (Photo: Reuters)
-
पोप फ्रान्सिस किडनीच्या आजाराने ग्रस्त होते. रे गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते. मात्र, प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. (Photo: Reuters)
-
अलिकडेच त्यांना दूहेरी न्यूमोनिया झाला होता, त्यांच्यावर उपचार सुरू होते. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. (Photo: Reuters)
-
कॅथोलिक चर्चसाठी पोपचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. पोप हे चर्चचे सर्वोच्च धार्मिक नेते मानले जातात. ते जे निर्णय घेतात ते जगभरातील लाखो कॅथलिकांच्या जीवनावर परिणाम करतात. (Photo: Reuters)
-
पोप फ्रान्सिस हे एक साधे आणि दयाळू व्यक्ती होते त्यांचे आयुष्य सामाजिक न्याय आणि गरिबांची सेवा करण्यात गेले. (Photo: Reuters)
-
सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची कमतरता नाही यावरून त्यांची लोकप्रियता किती आहे याचा अंदाज लावता येतो. त्याचे ट्विटर अकाउंट ९ भाषांमध्ये आहेत. (Photo: Reuters)
-
इंस्टाग्राम
इंस्टाग्रामबद्दल बोलायचे झाले तर, त्यांना ९.९ दशलक्ष लोक फॉलो करतात. त्यांचे हे अकाउंट २०१६ मध्ये सुरू करण्यात आले होते आणि त्या काळात अवघ्या ५ दिवसांत त्यांचे १९ लाख फॉलोअर्स झाले होते. (Photo: Reuters) -
ट्विटर
त्यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर (आता एक्स) वर ९ वेगवेगळ्या भाषांमध्ये अकाउंट आहेत. येथे एकूण फॉलोअर्सची संख्या १८.३ दशलक्ष आहे. त्यांनी मानवतावादी मदत, कोरोना महामारी, जागतिक संकट, युक्रेन युद्ध याबद्दल ट्विट केले आहेत. (Photo: Pope Francis/Insta) -
वयाच्या ८८ व्या वर्षीही ते खूप सक्रिय होते.
वयाच्या ८८ व्या वर्षी निवृत्तीनंतर बहुतेक लोक घरी विश्रांती घेत असतात, पण पोप फ्रान्सिस या वयातही सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण जगाशी जोडलेले राहिले आणि जगण्याची कला शिकवत राहिले. (Photo: Pope Francis/Insta) -
मुलांबद्दल त्यांना विशेष प्रेम होते
पोप फ्रान्सिस यांना मुलांबद्दल खूप विशेष प्रेम होते. ते जेव्हा जेव्हा मुलांसोबत असायचे तेव्हा त्यांच्या कामात मग्न असायचे. यासोबतच ते सर्वांना समान प्रेम व्यक्त करण्याबद्दल शिकवत असत. (Photo: Pope Francis/Insta) हेही पाहा- अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या कुटुंबात कोण कोण आहे? ते राजकारणात कसे आले?
पत्नी, मुलासमोर दहशतवाद्यांनी डोंबिवलीतील पर्यटकाच्या डोक्यात गोळ्या झाडल्या, मुलावर वडिलांचा मृतदेह पाहण्याची वेळ