-
जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक सुरू केला आहे. सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत १९६० चा सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
-
पाकिस्तानचे अनेक भाग भारतातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्यावर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत, जर भारताने पाकिस्तानची जीवनरेखा म्हणवल्या जाणाऱ्या सिंधू आणि तिच्या उपनद्यांचे पाणी थांबवले, तर पाकिस्तानी लोक पाण्याच्या थेबा- थेंबासाठी रडतील,
-
पाकिस्तानची ८० टक्के शेतीयोग्य जमीन सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. शिवाय, यातील ९३ टक्के पाणी सिंचनासाठी वापरले जाते. पाकिस्तानमधील २३७ दशलक्षाहून अधिक लोक सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. कराची, लाहोर, मुलतान इत्यादी पाकिस्तानातील इतर अनेक प्रमुख शहरे सिंधू आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्यावर अवलंबून आहेत.
-
अशा परिस्थितीत, भारतातील कोणत्या नद्या पाकिस्तानमध्ये वाहतात ते जाणून घेऊया.
-
१. सिंधू नदी
सिंधू नदी ही पाकिस्तानची राष्ट्रीय नदी आहे आणि ती पाकिस्तानची जीवनरेषा देखील आहे. ही नदी जम्मू आणि काश्मीरमार्गे पाकिस्तानात जाते. पाकिस्तानची ८० टक्के शेतीयोग्य जमीन सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. -
२- रावी नदी
रावी नदी हिमाचल प्रदेशातील हिमालयाच्या पश्चिम भागात असलेल्या बारालाचा खिंडीतून उगम पावते आणि ती पाकिस्तानपर्यंत पसरते. पाकिस्तानमध्ये तिला लाहोर नदी म्हणतात. -
३- बियास नदी
बियास नदीचा उगम भारतातील हिमाचल प्रदेशातून होतो. ही नदी पाकिस्तानात वाहत नाही पण तिचे पाणी निश्चितच सतलज नदीला मिळते जी पाकिस्तानच्या काही भागातूनही वाहते. -
४- सतलज नदी
भारताची सतलज नदी पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या पूर्व भागातून वाहते. ती चिनाब नदीनंतर सिंधू नदीला जाऊन मिळते. -
५- झेलम नदी
झेलम नदी जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातून उगम पावते आणि पीओकेमधून पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात वाहते. -
६- चिनाब नदी
चिनाब नदी हिमाचलमधील लाचा खिंडीतून उगम पावते आणि पाकिस्तानात जाते. -
सिंधू नदी ही आशियातील सर्वात मोठी नदी आहे. १९६१ मध्ये दोन्ही देशांमध्ये या नद्यांच्या पाण्याबाबत एक करार झाला. या करारानुसार, भारतातून पाकिस्तानात वाहणाऱ्या ६ नद्यांचे पाणी विभागले गेले.
-
रावी, बियास आणि सतलज या तीन पूर्वेकडील नद्यांवर भारताला पूर्ण अधिकार मिळाला आणि उर्वरित तीन नद्यांचे पाणी झेलम, चिनाब आणि सिंधू कोणत्याही अडथळ्याशिवाय पाकिस्तानला द्यायचे होते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस | पीटीआय)

Pakistan PM Shahbaj Sharif : “पहलगाम हल्ल्याप्रकरणी आम्ही तटस्थ चौकशीला तयार”; पाकिस्तानच्या पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया!