-
शनिवारी पुण्यात ‘पुणे डॉक्टर असोसिएशन’च्या वतीने ‘सिंगल डॉक्टर फॅमिली’ या उपक्रमाचा शुभारंभ झाला आहे.
-
ज्या कुटुंबांनी स्त्री जन्माचा आदर केला. ज्यांनी वंशाचा दिवा म्हणून मुलाची अपेक्षा न करता केवळ मुलीवर कुटुंब नियोजन केलं, अशा कुटुंबांना या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आलं होतं.
-
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित राहिल्या.
-
दरम्यान, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली आहेत.
-
लोकसभा प्रचाराच्या वेळी साताऱ्यातील सभेत शरद पवारांनी भरपावसात भाषण केलं होतं. यावर एक मुलगी म्हणून तुमची भावना काय होती? असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला होता.
-
यावर सुप्रिया सुळेंचं हे उत्तर ऐकून स्वत: शरद पवारदेखील खळखळून हसले.
-
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, त्या दिवशी रात्री मला एकाने फोन केला आणि सांगितलं की सगळे पावसात भिजले, तोपर्यंत तो फोटोही इतका व्हायरलही झाला नव्हता.
-
जेव्हा मी काय झालं? विचारायला फोन केला तेव्हा शरद पवारांसह इतर सर्वजण शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचा केक कापत होते.
-
आम्ही सगळेच प्रचारात व्यग्र होतो, दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठल्यानंतर त्या फोटोचा असा परिणाम होईल, असं आम्हाला वाटलं नव्हतं.
-
साताऱ्यातील सभा म्हणजे भारतीय राजकारणातला टर्निंग पॉइंट होता, असं अनेकजण संसदेत सांगतात, असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
-
शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी या कार्यक्रमात इतरही अनेक प्रश्नांना उत्तरं दिली आहेत.
-
शरद पवार ‘खूप स्ट्रॉंग’ आहेत, असंही सुप्रिया सुळेंनी यावेळी सांगितलं आहे.
-
शिवाय माझ्या आईकडे खूप सयंम आहे. त्यांच्या सयंमामुळेच बहुदा त्यांचा संसार इतका काळ टिकला आहे.
-
मी आईकडून संयम घेतला आहे, अशी मिश्किल टिप्पणीही सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली.
-
संग्रहित फोटो सौजन्य – express photo by Pavan Khengre and loksatta

शाळा बुडवून मुलगी बॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून सांगा काकांनी बरोबर केलं का?