कविता नागापुरे,

भंडारा : राजकीय पक्षांसाठी यंदाची ग्रामपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची होती. भंडारा तालुक्यातील गणेशपुर , खोकरला यांसारख्या अनेक ग्रामपंचायतींवर राकाँचे वर्चस्व होते. यावेळी शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांची प्रतिष्ठाही पणाला लागली होती. मात्र या ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापितांना जोरदार धक्का बसला आहे. भंडारा तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतीपैकी तब्बल १० अपक्षांनी काबीज करून राष्ट्रवादी आणि भोंडेकर समर्थित गटाला त्यांची जागा दाखवून दिली आहे. विजयी अपक्ष उमेदवारांना १० लाखांचा विकास निधी देण्याचे प्रलोभन दाखवून स्वतःचा आकडा फुगविण्याचे तकलादू प्रयत्नही यावेळी झाले. सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या गणेशपूर ग्रामपंचायतीतही अपक्ष उमेदवाराने बाजी मारल्याने आ. भोंडेकर, काँग्रेसचे पवन मस्के, यशवंत सोनकुसरे यांच्यासह अनेक जण तोंडघशी पडले.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा >>> विधानसभेत विरोधकांनी संधी दडवली

खासदार सुनील मेंढे यांचा प्रभाव फारच कमी दिसून आल्याने भाजप आणि शिंदे गटासह प्रस्थापितांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, आमदार नरेंद्र भोंडेकर हे देखील अपक्षच निवडून आले होते. त्यामुळे भंडारा तालुक्यात कोणत्याही पक्षाच्या शिक्क्यापेक्षा अपक्षांच्या हाती विकासाची धुरा देण्याकडे जनतेचा कल आहे. भंडारा जिल्हा परिषदेवर सत्ता गाजविणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र या निवडणुकीच्या निकालानंतर मंथन करण्याची गरज आहे. याच विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे वर्चस्व असणाऱ्या पवनी तालुक्यात काँग्रेसचे प्रभूत्व कायम आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई आणि माजी राज्यमंत्री बंडू सावरबांधे या नेत्यांचा या तालुक्यात असलेला प्रभाव या निवडणुकीतून स्पष्ट झाला आहे. विशेष म्हणजे, आमदार भोंडेकर यांनी पवनी तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीवर विजयाचा दावा केला आहे. मागील काही दिवसांत आ. भोंडेकर यांच्या पवनी ” वाऱ्या ” वाढल्या आहेत. नुकतेच त्यांनी पवनीत ४ ते ५ विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांचा हस्ते केले होते. त्याचीच ही फलश्रुती म्हणावी लागेल. तुमसर विधानसभा क्षेत्र हे अत्यंत संवदनशील आहे. हा भाजपचा गड समजला जातो. या क्षेत्रावर अनेक ठिकाणी भाजपचेच वर्चस्व आहे. मात्र या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तुमसर तालुक्यातील राजकीय समीकरण पूर्णतः बदलण्याने भाजप समर्थिताना निम्म्या ग्रामपंचायतीही काबीज करता आलेल्या नाही. तुमसर तालुक्यात भारतीय जनता पक्षाने एकही ग्रामपंचायतीवर स्वतंत्रपणे किंवा स्वबळावर निवडणूक लढविलेली नाही. काही ठिकाणी काँग्रेस, काही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेससोबत भाजपने युती करून गड काबीज करण्याची केविलवाणी धडपड केली. भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या चरण वाघमारे यांची प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी हकालपट्टी केली होती त्याच वाघमारे यांच्या विकास फाऊंडेशनसोबत देखील भाजपने या निवडणुकीत युती केली. एकूण ९७ ग्रामपंचयतीपैकी आता झालेल्या ७७ ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस २४, काँग्रेस ११, अपक्ष ७ , उध्दव ठाकरे शिवसेना १ असे ४४ जागांवरील सरपंचाना स्पष्ट बहुमत आहे. मात्र उर्वरित ३३ पैकी १ बिनविरोध वगळता ३२ जागांवर भाजप आणि विकास फाऊंडेशनचे उमेदवार निवडून आल्याचा दावा करीत आहेत. उल्लेखनीय असे की, भाजप समर्थित विजयी सरपंचांपैकी अनेकांनी विकास फाऊंडेशनच्या कार्यालयात विजयोत्सव साजरा केला. तुमसर विधानसभा क्षेत्रात माजी आमदार चरण वाघमारे यांचे आजही वजन कायम आहे, हे या निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आगामी विधान सभा निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, आ. परिणय फुके यांनी साकोली सोबतच आता या विधानसभा क्षेत्राकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे आगामी विधासभा निवडणुकीत वाघमारे विरूध्द फुके असे चित्र राहील का ? की दोघेही हातमिळवणी करतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा >>> ‘सत्काराला या आणि निधी घेऊन जा’; सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार सोहळ्यापूर्वी आमदार संतोष बांगर यांचे आश्वासन

या निवडणुकीत आम आदमी पक्षाने दोन ग्रामपंचयतीत त्यांचे खाते उघडले, हे लक्षवेधी ठरले आहे. शहरापुरती मर्यादित समजल्या जाणाऱ्या ”आप”ने ग्रामपंचायत निवडणूक जिंकून आपले सामर्थ्य दाखवून दिले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा आणि नगर परिषद निवडणुकीत सर्व राष्ट्रीय पक्षांची अस्मिता पणाला लागणार एवढे मात्र नक्की ! नानाभाऊंचा पगडा असलेल्या साकोली आणि लाखांदूर तालुक्यातील चित्र या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर पूर्णतः वेगळे आहे. नानांच्या शिलेदारांनी त्यांच्याकडे पाठ फिरवून दुसरीकडे वर्णी लावली आहे. नानांचा त्यांच्या विधानसभा क्षेत्राकडे झालेल्या दुर्लक्षाचा हा परिणाम आहे. या तालुक्यात प्रामुख्याने शेतकरी वर्गाच्या नानांकडून प्रचंड अपेक्षा होत्या. लोकदरबारसारखे कार्यक्रमामुळे नाना आपल्याला तारू शकतात असा विश्वास लोकांना होता. मात्र आता नानांची आणि साकोलीची नाळ तुटत चालली असून त्यांचा प्रभाव या क्षेत्रात कमी होताना दिसत आहे. याचा फायदा आगामी निवडणुकीत आ. फुके यांना होणार का, हा प्रश्न आहे. लाखनी तालुक्यात काँग्रेसने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. मात्र मुरमाडी येथे एक महिला उमेदवार हरल्यानंतर त्या क्षेत्राच्या जि. प. सदस्याने पक्षाच्या जिल्हाध्यक्षाना शिव्या हाणल्या. या प्रकारानंतर निवडणुकीसाठी पक्षाकडून आलेला निधी लोकांपर्यत पोहचत नसल्याचे आणि ग्रामपंचयत निवडणुकांतही आर्थिक उलाढाल झाल्याचे सिद्ध झाले. यावेळी भंडारा तालुक्यातील चिखलपहिला, लाखांदूर तालुक्यातील विहीरगाव तसेच तुमसर तालुक्यातील देवरीदेव या ग्रामपंचयतीची निवडणूक अविरोध झाली. जिल्ह्यात झालेल्या ३०५ ग्रामपंचायतीत सरपंच थेट जनतेतून निवडून आले. मात्र सदस्य वेगळ्या पॅनलचे तर सरपंच वेगळ्या पक्षाचे असे चित्र अनेक ग्रामपंचायतीत आहे. त्यामुळे ग्रामसभेत कोणताही ठराव संमत करताना मोठी अडचण येणार असून सदस्यांना घेऊन गावगाडा हाकताना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

Story img Loader