नागपूर : विधानसभा निवडणुकीचे निकाल जसे विरोधी पक्षांसाठी धक्कादायक ठरले तसेच काही ठिकाणी त्याचा सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनाही फटका बसला. विदर्भात तब्बल बारा विद्यमान आमदार पराभूत झाले. त्यात पाच सत्ताधारी पक्षाचे आहेत.

विदर्भात लोकसभा निवडणुकीच्या अगदी विरोधी चित्र विधानसभा निवडणुकीत दिसून आले. लोकसभेच्या १० पैकी सात जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत ६२ पैकी फक्त १३ जागांवर समाधान मानावे लागले. तर महायुतीला तब्बल ४९ जागा मिळाल्या. वरवर हा निकाल सत्ताधारी महायुतीच्या बाजूने वाटत असला तरी युतीच्या काही आमदारांनाही धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे सरसकट लाडकी बहीण योजनेमुळे राजकीय उलटफेर झाला, असा दावा करणाऱ्या विश्लेषकांना सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या पराभवाची कारणे शोधतांना जड जाऊ लागले आहेत.

Demand money from company owner in name of MLA Pune news
आमदाराच्या नावाने कंपनी मालकाकडे पैशांची मागणी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
dcm devendra fadnavis criticized congress mla ravindra dhangekar
‘कसब्या’तील आमदारांची कामे कमी आणि दंगा जास्त; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका
कसब्यात एक ॲक्सिडेंटल आमदार तयार झाला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार रविंद्र धंगेकर यांना टोला
vip political leaders checking during the election campaign
बॅग तपासणीवरून नवे वादंग; नाहक त्रास देण्याचा प्रयत्न, महाविकास आघाडीचा आरोप, विरोधकांकडून केवळ राजकारण : महायुतीचे प्रत्युत्तर
former ministers who rebel and won
अनेक माजी मंत्री, आमदारांचा बंडखोरी करून विजयाचा इतिहास, देशमुख, केदार, बंग, जयस्वाल आदींचा समावेश
Shekhar Shende filed complaint against Dr Pankaj Bhoyer for giving sarees and utensils to women
सरकारी सेवेतील लाडक्या बहिणींना साडी-भांडी; तक्रार होताच आमदार म्हणतात…

विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षाचे सात विद्यमान पराभूत झाले. त्यात प्रामुख्याने १) काँग्रेसचे सुभाष धोटे (राजुरा), २)रणजित कांबळे (देवळी),३) यशोमती ठाकूर (तिवसा),४) राजेश एकडे (मलकापूर), ५) प्रहारचे बच्चू कडू (अचलपूर), ६) राजकुमार पटले (मेळघाट) आणि ७) राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे राजेंद्र शिंगणे (सिंधखेडराजा) आदींचा समावेश आहे.

आणखी वाचा-यश काँग्रेसचे, चर्चा मात्र भाजपच्या पराभवाचीच! अकोला पश्चिममध्ये ३० वर्षांनंतर परिवर्तन; मुस्लिमांचे मत विभाजन टळणे काँग्रेससाठी ठरले फायदेशीर

सत्ताधारी पक्षाचे पराभूत आमदार

निवडणुकीत पराभूत झालेल्या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांमध्ये १) भाजपचे मदन येरावार (यवतमाळ), २) भाजपचे संजीव रेड्डी (वणी), ३) भाजपचे कृष्णा गजबे (आरमोरी) ४) शिंदे गटाचे संजय रायमुलकर ( मेहकर) आणि ५) राष्ट्रवादीचे देवेंद्र भुयार (मोर्शी) यांचा समावेश आहे. या मतदारसंघातही लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्यात सत्ताधारी पक्षाने कोणतीही कसर सोडली नव्हती, मात्र मतदारांनी त्यांचा कौल विरोधी पक्षाच्या उमेदवारांच्या बाजूने दिला. त्याचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसला.

भाजपने सात आमदारांना नाकारले होते तिकीट

निवडणुकीत पराभूत होण्याचा धोका लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने सात विद्यमान आमदारांना तिकीट नाकारले होते व त्यांच्या जागी नवीन चेहरे दिले होते. त्यात टेकचंद सावरकर (कामठी), विकास कुंभारे ( मध्य नागपूर) दादाराव केचे (आर्वी), संदीप धुर्वे (आर्णी) देवराव होळी (गडचिरोली), नामदेव ससाणे (उमरखेड) यांचा समावेश होता.

कारणे काय ?

कोणत्याही निवडणुकीत कोणाचा तरी एकाचाच विजय होतो. पण जेव्हा निवडणुकीत एखादी लाट येेते तेव्हा सरसकट एकाच पक्षाच्या बाजूने निकाल लागतो. २०२४ च्या निवडणुकीतही चित्र अशाच स्वरुपाचे आहे. त्यासाठी सरकारच्या लाडकी बहीण योजनेला श्रेय दिले जात आहे. असे असेल तर त्याचा फायदा पराभूत झालेल्या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना का झाला नाही, असा सवाल केला जात आहे.

आणखी वाचा-नाना पटोलेंच्या भ्रमाचा भोपळा फुटला; साकोलीत लाजिरवाणा विजय!

विदर्भातील पक्षीय बलाबल

एकूण जागा -६२

भाजप -३८

काँग्रेस-०९

राष्ट्रवादी-अजित पवार-०६

शिवसेना- शिंदे-०४

शिवसेना-ठाकरे-४

इतर -०१