उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मंगळवारी (६ फेब्रुवारी) विधानसभेत राज्याचे प्रस्तावित समान नागरी कायदा विधेयक मांडले. महिला अधिकारांना प्राधान्य, बहुपत्नीत्वासारख्या प्रथांवर बंदी आणि सर्वधर्मीयांसाठी समान विवाहवय इत्यादी शिफारशींचा समावेश एका तज्ज्ञ पॅनेल या विधेयकात केला आहे. विशेष म्हणजे देवभूमी उत्तराखंड हे स्वातंत्र्यानंतर UCC लागू करणारे देशातील पहिले राज्य असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मसुद्यात ४०० हून अधिक कलमं आहेत, ज्याचा उद्देश पारंपरिक रीतीरिवाजांमुळे उद्भवणाऱ्या विसंगती दूर करणे आहे.
समान नागरी कायदा विधेयकातील तरतुदी आदिवासी समुदायांना लागू होत नाहीत
सध्या भारतातील अंतर्गत कायदे जटिल आहेत, प्रत्येक धर्म त्याच्या विशिष्ट नियमांचे पालन करतो. विवाह, वारसा, घटस्फोट इत्यादींबाबत वैयक्तिक कायद्यांचा विचार करता भारतातील सर्व समुदायांना लागू होणारे एकसमान कायद्यांचा संच तयार करणे ही समान नागरी कायद्याची कल्पना आहे. समान नागरी कायद्याला विरोध असलेल्या आदिवासी समुदायांना कायद्यातून सूट देण्याची शिफारस करण्यात आल्याची माहिती आहे. उत्तराखंडच्या लोकसंख्येत २.९ टक्के लोकसंख्या आदिवासींची आहे. जौनसारी, भोटिया, थारू, राजी आणि बुक्सा या जमातींचा त्यांत प्रामुख्याने समावेश होतो.
लिव्ह इन रिलेशनशिपवर नजर ठेवणे हे विधेयकाचे उद्दिष्ट
समान नागरी कायदा हे विधेयक एखाद्या राज्यामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या भागीदारांना निबंधकाकडे नोंदणी करणे बंधनकारक करते, मग ते उत्तराखंडचे रहिवासी असले किंवा नसले तरी त्यांना कलम ३८१ च्या पोटकलम (१) अंतर्गत लिव्ह इन रिलेशनशिपसंदर्भातील माहिती निबंधकाकडे सादर करणे बंधनकारक आहे. कलम ३८० अंतर्गत नमूद केलेल्या कायद्यानुसार लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेली व्यक्ती अल्पवयीन आहे की आधीच विवाहित आहे, यासंदर्भात निबंधक चौकशी करेल. एका महिन्यापेक्षा जास्त काळ लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या आणि नोंदणी सादर न केलेल्या जोडप्यांसाठी तीन महिन्यांपर्यंत कारावास किंवा १० हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तसेच नातेसंबंध संपुष्टात आल्यास निबंधकाकडे त्याबाबतची माहिती द्यावी लागणार आहे. जोडप्याला नोंदणी म्हणून मिळणाऱ्या पावतीच्या आधारे त्यांना घर, वसतिगृह किंवा पीजी भाड्याने मिळू शकेल. UCC मध्ये लिव्ह इन संबंधी स्पष्टता आहे. यानुसार केवळ एक प्रौढ पुरुष आणि एक प्रौढ महिला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू शकतील. त्यांनी आधीच विवाहित किंवा इतर कोणाशीही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये किंवा इतर संबंधात नसावेत. नोंदणी करणाऱ्या जोडप्याच्या पालकांना किंवा पालकांना रजिस्ट्रारला कळवावे लागेल.
हेही वाचाः ओडिशाचे मुख्यमंत्री पटनायक यांची ‘नवीन’ खेळी; ISBT ला देणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव
समान नागरी कायद्याच्या विधेयकानुसार एकापेक्षा जास्त व्यक्तींबरोबर विवाह करण्यास मनाई
कलम ४ अंतर्गत विधेयकात विवाहासाठी पाच अटी आहेत. जर त्या अटी पूर्ण झाल्या, तर एक पुरुष किंवा स्त्रीमध्ये विधिवत विवाह केला जाऊ शकतो किंवा करार केला जाऊ शकतो. समान नागरी कायदा द्विपत्नीत्व किंवा बहुपत्नीत्वाला मान्यता देत नाही. हिंदू, ख्रिश्चन आणि पारशी धर्मीयांसाठी दुसरा विवाह हा गुन्हा असल्याने सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे काही लोक पुन्हा लग्न करण्यासाठी धर्म बदलतात. समान नागरी संहिता (UCC) लागू झाल्यानंतर बहुपत्नीत्वावर बंदी घालण्यात येईल. बहुपत्नीत्वावरही पूर्णपणे बंदी असेल.
हेही वाचाः उत्तराखंडच्या UCC विधेयकाला मुस्लीम बोर्डाचा विरोध, कायदेशीर आव्हान देणार!
कायदा झाल्यानंतर मुलींच्या लग्नाचे कायदेशीर वय २१ वर्षे होणार
लग्नाचे किमान वय काही ठिकाणी निश्चित केले आहे आणि काही ठिकाणी निश्चित केलेले नाही. काही धर्मात लहान वयातही मुलींची लग्ने होतात. ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या प्रौढ नसतात. तर इतर धर्मांमध्ये मुलींसाठी १८ वर्षे आणि मुलांसाठी २१ वर्षे लागू वय आहे. कायदा झाल्यानंतर मुलींच्या लग्नाचे कायदेशीर वय २१ वर्षे निश्चित केले जाईल.