निवडणूक रोख्यांना सुरुवात झाल्यापासून २०१८ ते २०२३ या काळात एकूण रोख्यांपैकी सुमारे ५५ टक्के रोख्यांमधून भाजपला आर्थिक मदत मिळाली असून, काँग्रेसला जेमतेम १० टक्के रक्कम मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवडणुकीतील गैरव्यवहार रोखण्यासाठी तसेच राजकीय पक्षांना पारदर्शक पद्दतीने मदत मिळावी या उद्देशाने मोदी सरकारने निवडणूक रोखे बाजारात आणले होते. २०१८ मध्ये सुरुवात झाल्यापासून जानेवारीपर्यंत १६ हजार ५१८ कोटींच्या रोख्यांची स्टेट बँक ऑफ इंडियातून विक्री झाली होती. यापैकी मार्च २०२३ अखेर १२ हजार कोटींच्या रोख्यांमधून कोणत्या पक्षाला किती मदत मिळाली याची माहिती उपलब्ध आहे. प्रत्येक राजकीय पक्षाला आर्थिक वर्षाच्या अखेर आपला जमाखर्च निवडणूक आयोगाला सादर करावा लागतो. यातून निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर राजकीय पक्षांच्या वित्तीय व्यवस्थेची माहिती नागरिकांना उपलब्ध करून दिली जाते.

हेही वाचा – पिताश्रींच्या पावलावर अशोक चव्हाणांचे पाऊल !

सुमारे १२ हजार कोटींपैकी भाजपला ६५६४ कोटी म्हणजे ५५ टक्के रक्कम ही निवडणूक रोख्यांमधून मिळाली आहे. भाजपच्या तुलनेत काँग्रेसचा वाटा एकदमच कमी आहे. काँग्रेसला अवघे १० टक्के म्हणजे ११३५ कोटी रुपयांची रक्कम मिळाली आहे.

एडीआर या संस्थेच्या अहवालात २०१८ ते २०२३ या पाच वर्षांच्या कारकिर्दीत एकूण निवडणूक रोख्यांपैकी ५३ टक्के रक्कम ही भाजपला मिळाली आहे. भाजपला ५२७१ कोटी रुपये मिळाल्याची माहिती संस्थेने दिली आहे.

हेही वाचा – रामटेकमध्ये शिंदे गटाच्या जागेबाबत अनिश्चितता कायम

विविध राज्यांमध्ये सत्ताधारी असलेल्या पक्षांना अधिकची रक्कम रोख्यांमधून मिळाली आहे.

राजकीय पक्षांना २०२२-२३ या वर्षात रोख्यांमधून मिळालेली मदत (पुढीलप्रमाणे)

भाजप : २१२० कोटी

काँग्रेस : १७१ कोटी

भारत राष्ट्र समिती : ५२९ कोटी

तृणमूल काँग्रेस : ३२९ कोटी

बिजू जनता दल : १५२ कोटी

वायएसआर काँग्रेस : ५२ कोटी

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 55 percent to bjp and 10 percent help to congress through election bonds print politics news ssb