Premium

६२ टक्के आमदारांवर गुन्हे, बहुतांश करोडपती

निवडणूक लढविलेल्या एकूण उमेदवारांपैकी ४१ टक्के म्हणजेच एक हजार १९३ उमेदवार पदवीधर होते.

62 percent mlas have criminal cases in Maharashtra
प्रतिनिधिक छायाचित्र :

मुंबई : मावळत्या विधानसभेतील बहुतांश म्हणजेच ९३ टक्के आमदार करोडपती असून, राज्यात सर्वांत श्रीमंत असलेले भाजपचे घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातील आमदार पराग शहा यांना अजूनही भाजपाने उमेदवारी दिलेली नाही. विशेष म्हणजे मावळत्या विधानसभेतील तब्बल ६२ टक्के आमदारांवर विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील आमदारांचे शिक्षण, सांपत्तीक स्थिती, त्यांच्यावर दाखल गुन्हे याबाबत ‘असोसिएशन फॉर डेमोक्रेटीक रिफॉर्मस’ (एडीआर) यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार राज्यात २०१९मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत २८८ मतदार संघातून तब्बल तीन हजार १३८ उमेदवारांनी निवडणूक लढविली होती. त्यामध्ये २३७ (८ टक्के) महिला उमेदवार होते. निवडणुकीत उभे राहिलेल्यांपैकी ३० टक्के म्हणजेच ९३२ उमेदवारांवर विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल होते. यातील २० टक्के म्हणजेच ६१८ उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते. तर एक हजार १९ (३२ टक्के) उमेदवार करोडपती होते.

हेही वाचा >>> मराठवाड्यातील उमेदवार वादाच्या रिंगणात

निवडणूक लढविलेल्या एकूण उमेदवारांपैकी ४१ टक्के म्हणजेच एक हजार १९३ उमेदवार पदवीधर होते. या निवडणुकीनंतर विजयी झालेल्या म्हणजेच विद्यामान आमदारांपैकी १७७ (६२ टक्के) आमदारांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून, त्यातील ४० टक्के आमदारांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहेत. विद्यामान आमदारांपैकी ५५ टक्के आमदार पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत. २०१९च्या निवडणुकीत एकूण २४ महिला उमेदवार विजयी झाल्या होत्या.

आता बदलाकडे लक्ष..

● मावळत्या विधानसभेतील सर्वांत श्रीमंत आमदार भाजपाचे पराग शहा असून त्यांची एकूण मालमत्ता ५०० कोटींपेक्षा अधिक आहे. त्याखालोखाल विद्यामान मंत्री मंगलप्रभात लोढा यांची मालमत्ता ४४१ कोटींपेक्षा अधिक असून तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे सांगलीचे आमदार विश्वजित कदम (२१६ कोटी) होते.

● सर्वाधिक ३२ गुन्ह्यांची नोंद अपक्ष आमदार बच्चू कडू (अचलपूर) यांच्यावर दाखल होते. त्याखालोखाल बबनराव पाचपुते (श्रीगोंदा), जितेंद्र आव्हाड (कळवा- मुंब्रा) २५, विकास ठाकरे (नागपूर)२५ तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (कोपरी पाचपाखाडी) आणि गणपत गायकवाड (कल्याण) यांच्यावर प्रत्येकी १८ गुन्हे दाखल होते.

● आमदारांनी निवडणूक लढवितांना प्रतिज्ञापत्राद्वारे ही माहिती जाहीर केली होती. यातील बहुतांश आमदार पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात असून त्यांची मालमत्ता आणि त्यांच्यावरील गुन्हे यात किती बदल झाला आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

२०१९च्या निवडणुकीत उभे राहिलेल्यांपैकी ३० टक्के म्हणजेच ९३२ उमेदवारांवर विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल होते. यातील २० टक्के म्हणजेच ६१८ उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 62 percent mlas have criminal cases mostly millionaires print politics news zws

First published on: 24-10-2024 at 06:31 IST
Show comments