मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने मंत्रिमंडळ बैठका आणि त्यातील निर्णयांचा सपाटा लावला आहे. जून २०२२ रोजी सत्तेवर आलेल्या महायुती सरकारची सोमवारी ८६ वी मंत्रिमडळ बैठक पार पडली. जून २०२२ ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान मंत्रिमंडळाच्या झालेल्या एकूण ८६ बैठकांमध्ये जवळपास ६५० निर्णय घेण्यात आले आहेत. यात महिलांसाठी लाडकी बहीण, एसटी सवलत, आनंदाचा शिधा, आणि महामुंबईतील पथकर मुक्ती हे महत्त्वपूर्ण निर्णय ठरणार आहेत.

महायुती सरकारने आचारसंहिता लागण्यापूर्वी घेतलेले शेकडो झटपट निर्णय यापूर्वीच्या काँग्रेस, आघाडी आणि शिवसेना भाजपा युती सरकारने घेतलेले आहेत. शिवसेना भाजपा युती काळात मुंबईत ५५ उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय अशाच प्रकारे घेण्यात आला होता. काँग्रेस व आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी वीज बील, कर्जमाफी असे निवडणूक निकालाला कलाटणी देणारे निर्णय घेतले गेले होते. महायुती सरकारच्या काळात अनेक निर्णय बेधडक घेण्यात आले आहेत. बिनधास्त निर्णय घेणारे सरकार अशी या सरकारची प्रतिमा तयार झाली आहे. काही निर्णयांच्या परिणामांची पर्वा करण्यात आलेली नाही. मुंबै बँक, महालक्ष्मी ट्रस्ट, अनेक नामधारी संस्थां तसेच अदानी समूहाला मुंबईतील मोक्याच्या जागा देताना होणाऱ्या टीकेचा विचार केला गेला नाही. भाजपच्या पाठिंब्यावर जूनमध्ये सत्तेवर आलेले शिवसेना (शिंदे) यांच्या सरकारला राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाची साथ मिळाल्याने हे सरकार अधिक मजूबत झाले. पहिले काही महिने मंत्रिमंडळ बैठकीत दहा बारा निर्णय मंजूर केले जात असताना अलीकडे महायुती सरकारने निर्णयाचां सपाटा लावला.

Ratan Tata Died at 86 in Marathi
Ratan Tata Death : उद्योगपती रतन टाटा यांचे निधन; ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Loksatta chavdi Ajit Pawar group Actor Sayaji Shinde Assembly Elections propaganda
चावडी: आमचा सयाजी
Central Election Committee meeting on Wednesday regarding BJP first candidate list
भाजपची पहिली यादी एक-दोन दिवसांत? केंद्रीय निवडणूक समितीची बुधवारी बैठक
Haryana Exit Polls Results 2024
Haryana Exit Polls Results 2024 : हरियाणात भाजपाची हॅटट्रिक चुकणार; १० वर्षांनी काँग्रेस सत्तेत येण्याची शक्यता
Hiraman Khoskar Join NCP
Hiraman Khoskar Join NCP : विधानसभेच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ विद्यमान आमदाराचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
Ajit Pawar On Amit Shah Statement
Ajit Pawar : अमित शाहांच्या ‘त्या’ विधानानंतर अजित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “राज्यात एका पक्षाचं सरकार सत्तेत…”
Haryana Jammu Kashmir Exit Poll Result 2024
Haryana And Jammu-Kashmir Election Exit Poll 2024 : जम्मू-काश्मीरमध्येही भाजपाला धक्का, एक्झिट पोलनुसार किती जागा मिळणार?

हेही वाचा >>>Maharashtra Election 2024: काँग्रेसमध्ये उमरखेडसाठी सर्वाधिक इच्छुक, दिग्रसमध्ये केवळ दोन!

राज्यातील प्रत्येक जात, प्रांत, सांप्रदाय, धर्मातील समाजाला खूश करण्यासाठी योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक जातीच्या कल्याणासाठी महामंडळे स्थापन करण्यात आलेली आहेत. सर्व प्रमुख तीर्थक्षेत्रांचा विकास हाती घेण्यात आला आहे. राज्यातील वारकरी सांप्रदायाची संख्या लक्षात घेऊन वारकऱ्यांसाठी वारकरी महामंडळ स्थापन करण्यात आले. आषाढी- कार्तिकी एकादशीला निघणाऱ्या त्यांच्या वाऱ्या पाहता प्रत्येक वारीला वीस हजार रुपये देण्याचा निर्णयही घेण्यात आला.

तीर्थ दर्शन योजना संपूर्ण राज्यात सरकारी निधीवर सुरू करण्यात आली आहे. एक कोटी ६२ लाख शिधापत्रिका धारकांना १०० रुपयाता पाच वस्तूंचा समावेश असलेला आनंदाचा शिधा सणासुदीला वाटप करण्यात येत आहे. राज्यातील अडीच कोटी महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये व मुंबईत प्रवेश करताना लागणाऱ्या पाच पथकर नाक्यांवरील पथकर मुक्ती हे दोन निर्णय महायुती सरकारसाठी फायदेशीर ठरणार आहेत.