अमरावती : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने सहकार क्षेत्रात दमदार पदार्पण करण्याची महत्वाकांक्षा बाळगून असलेल्या आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या गटाचा भ्रमाचा भोपळा फुटल्याने जिल्ह्याच्या राजकारणातील बदलत्या प्रवाहाचे संकेत मिळू लागले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सहकार क्षेत्रात राजकीय पक्षांचा थेट सहभाग नसतो, हा समज यावेळी सपशेल खोटा ठरविण्यात वेगवेगळ्या पक्षातील पुढाऱ्यांमध्ये यावेळी अहमहिका पहायला मिळाली. राजकीय हस्तक्षेपाने जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका गाजल्या. पण, पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक वेगळ्या अर्थाने लक्षवेधी ठरली. अमरावती आणि भातकुली या दोन तालुक्यांची ही बाजार समिती आपल्या ताब्यात आल्यास राजकीय ताकद आणखी वाढेल, हा उद्देश ठेवून रवी राणा हे पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या आखाड्यात उतरले. सोबतीला भाजपमधील स्थानिक नेते होते.
हेही वाचा – ब्राह्मण मुख्यमंत्र्याची गुगली टाकून कुमारस्वामींचा लिंगायत समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न
महाविकास आघाडीत स्थान न मिळाल्याने काँग्रेसचे नेते आणि बाजार समितीचे माजी सभापती विलास महल्ले यांचा गटही राणांच्या मदतीला आला. त्यांच्या विरोधात माजी मंत्री आणि काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी मैदानात होती. राष्ट्रवादीचे सुनील वऱ्हाडे, शिवसेना ठाकरे गटाच्या प्रीती बंड यांची साथ होती. या निवडणुकीत चूरस पहायला मिळेल, हा अंदाज मतदारांनी खोटा ठरवला आणि महाविकास आघाडीचा एकतर्फी विजय झाला. सर्वच्या सर्व १८ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले. शिवसेनेच्या ठाकरे गटातील काही नेत्यांनी वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला, पण मतदारांनी त्यांनाही नाकारले. रवी राणा यांच्या गटाला एकही जागा मिळू शकली नाही. खुद्द रवी राणा यांचे मोठे बंधू सुनील राणा यांच्यावर पराभूत होण्याची नामुष्की ओढवली. रवी राणा ज्या ठिकाणी कुदळ मारतील, त्या ठिकाणी पाणी काढतील, ही त्यांच्या समर्थकांच्या दाव्यातील हवा या एका निवडणुकीने काढून घेतली. भाजप सोबत असूनही राणांच्या रथाची चाके का रुतली, याचे विश्लेषण आता केले जात आहे.
बाजार समितीत आजवर पक्षीय राजकारणापेक्षा सोयीचे राजकारण पहायला मिळत होते. वेगवेगळ्या पक्षाचे नेते एकत्र येऊन निवडणूक लढताना दिसले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते त्यात अग्रणी होते. भाजपला बाजार समितीत कधीही फारसा प्रभाव दाखवता आला नाही. बडनेरा हा रवी राणांचा मतदारसंघ. अमरावती आणि भातकुली या दोन तालुक्यांमध्ये विस्तारलेल्या त्यांच्या कार्यक्षेत्रात अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचाही अंतर्भाव असल्याने सहकार क्षेत्राच्या माध्यमातून मतदारसंघात पकड घट्ट करण्याच्या उद्देशाने रवी राणा मैदानात उतरले. त्यांचे बंधू सुनील राणा यांनाही निवडणूक लढण्याची इच्छा झाली. राणा यांच्या अनुपस्थितीत पडद्यामागे कार्यकर्त्यांचा संच सांभाळणारे सुनील राणा हे प्रथमच पडद्यावर अवतरले. रवी राणा यांनी स्वत: प्रचाराची धुरा सांभाळली. मेळावे घेतले. एका मेळाव्यात तर ‘तुम्ही आमच्याकडे सत्ता द्या, बारामतीसारखा विकास करून दाखवतो’, अशा शब्दात मतदारांना आवाहनही करून पाहिले. तरीही यश मिळू शकले नाही.
हेही वाचा – सोलापुरात भाजपची पकड आणखी मजबूत
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने खासदार बनलेल्या नवनीत राणा यांनी निवडून आल्याबरोबर भाजपला दिलेले समर्थन, रवी राणा यांनी महाविकास आघाडीच्या आणि विशेषत: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात घेतलेली भूमिका, भाजपशी असलेली जवळीक याची चर्चा सातत्याने होत असताना राणा दाम्पत्याने हनुमान चालिसा पठणाच्या निमित्ताने मिळवलेली प्रसिद्धी ही यशाचा हमखास मार्ग ठरू शकतो, हा राणांच्या समर्थकांचा समज या निकालाने दूर केला आहे. आता महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी राणांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने मात्र, काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी जिल्ह्याच्या राजकारणावर आपली पकड अधिक मजबूत केली आहे.