नगरः लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या निरीक्षकांचा दौरा आयोजित करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी एकाएकी जागे झाले आणि त्यांनी महाविकास आघाडीतील जागा वाटपात नगर दक्षिणसह शिर्डी या दोन्हीही जागा काँग्रेसला मिळाव्यात अशी मागणी केली. पक्षाचे निरीक्षक माजीमंत्री चंद्रकांत हांडोरे यांनीही पदाधिकाऱ्यांच्या भावना पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले.

संगमनेर व नगर येथे झालेले पक्षाचे दोन्ही मेळावे जिल्ह्यातील काँग्रेसचे एकमेव नेते माजीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अनुपस्थितीत झाले. त्यामुळे पक्ष निरीक्षकांचा हा दौरा किती गांभीर्याने घ्यायचा असा प्रश्न पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पडला आहे. परंतु पक्षनिरीक्षकांच्या या दौऱ्यामुळे निद्रिस्त पक्ष संघटना जागी झाली एवढाच त्याचा अर्थ. ज्येष्ठ नेते थोरात यांचे पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील स्थान मजबूत झाले असले तरी त्यांच्या नेतृत्वाखालील पक्षाची जिल्हा संघटना भक्कम केव्हा होणार असाही प्रश्न या दौऱ्यातून पुढे आला आहे.

maharashtra govt introduces new guidelines for school picnic
शैक्षणिक सहलींसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून दक्षतेची सूचना
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Sustainability Crusader Award Announced to Alok Kale Founder and Managing Director of Magnus Ventures Pune news
औद्योगिक कचऱ्यातून नवव्यवसायाची निर्मिती! पुण्यातील तरुण उद्योजकाचा प्रवास
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Kolkata Metro Railway to recruit for 128 Apprentice posts, registration begins on Dec 23 at mtp.indianrailways.gov.in
कोलकाता मेट्रोमध्ये भरती; नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी, लगेचच करा अर्ज
Shocking video Bat Spotted Eating Chikoo In Pune Market; Video Raises Health Concerns
पुणेकरांनो तुम्हीही बाजारातून फळं घेताय का? थांबा! ‘हा’ प्रकार पाहून पायाखालची जमीन सरकेल; VIDEO एकदा पाहाच
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?

हेही वाचा – मध्य प्रदेशमधील कल्याणकारी योजनांवर भाजपाला विजयाची खात्री; राजस्थान, छत्तीसगढबाबत मात्र साशंकता

पक्ष निरीक्षकांच्या संगमनेर येथील मेळाव्यात आमदार थोरात यांचे मेहुणे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना पुन्हा सन्मानाने पक्षात स्थान देण्याच्या मागणीचा ठराव करण्यात आला. मात्र, पक्षापासून लांब गेलेले डॉ. तांबे यांचे चिरंजीव नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्याबाबतचा कोणताही उच्चार या मेळाव्यात करण्यात आला नाही. या ठरावाने डॉ. तांबे यांचा पक्षातील समावेशाचा मार्ग मोकळा झाला असला तरी आमदार सत्यजित तांबे यांच्या पक्षातील समावेशाचा प्रश्न अधांतरीच राहिला आहे. अर्थात हा प्रश्न तसाच अधांतरी राहाणे आमदार थोरात व आमदार तांबे यांच्या पथ्यावरच पडणारा आहे.

एकेकाळी डाव्यांचा बालेकिल्ला असलेला नगर जिल्हा यशवंतराव चव्हाण यांनी सहकार चळवळीच्या माध्यमातून काँग्रेसचा बालेकिल्ला बनवला होता. काँग्रेसचे नगर जिल्ह्यावर दीर्घकाळ वर्चस्व राहीले. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर काँग्रेसचे जिल्ह्यातील स्थान घसरणीला लागले. तरीही राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व काँग्रेसमधील आमदार थोरात गटाची जिल्ह्यातील साथसंगत कायम राहिली. त्याचा उपयोग थोरात गटाला जिल्हा बँक, जिल्हा परिषद, इतर काही सहकारी संस्था आदी ठिकाणी झाला खरा मात्र, काँग्रेस पक्ष संघटना काही उभारी धरू शकली नाही. अर्थात तत्कालीन जिल्हा काँग्रेसमधील थोरात-विखे गटातील तीव्र वैमनस्याचा परिणामही त्यास कारणीभूत ठरला. नंतरच्या प्रत्येक लोकसभा-विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे संख्याबळ घटतच गेले.

राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर काँग्रेसला नगर व शिर्डी (शिर्डीचा सन २००४ बाळासाहेब विखे यांचा अपवाद) या दोन्ही लोकसभा मतदारसंघात कधीही विजय मिळवता आलेला नाही. सध्याही विधानसभेत काँग्रेसचे जिल्ह्यात केवळ आमदार थोरात संगमनेर व आमदार लहू कानडे श्रीरामपूर असे दोनच प्रतिनिधी आहेत. तरीही काँग्रेसने दोन्ही मतदारसंघांवर दावा केला आहे. पक्षाने दोन्ही जिल्हाध्यक्ष पदे एकाच घरात म्हणजे राजेंद्र नागवडे व त्यांच्या पत्नी अनुराधा नागवडे यांच्याकडे नुकतीच सोपवली आहेत. तिसरे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पदही श्रीगोंदे तालुक्यातच, स्मितल वाबळे यांच्याकडे आहे. तिन्ही जिल्हाध्यक्ष पद एकाच तालुक्यात दिली आहेत. त्यापलिकडे पक्षाला इतरत्र या पदासाठी सक्षम कार्यकर्ता आढळला नाही.

हेही वाचा – सर्व लोकसभा व विधानसभा मतदारसंघात भाजपची ‘वॉर रुम’ सुरू होणार

सध्याच्या आणि पूर्वीच्याही जिल्हाध्यक्षांनी कधी जिल्हा दौरा करून संघटना कार्यरत ठेवली नाही. राजेंद्र नागवडे मध्यंतरी भाजपच्या संपर्कात गेले होते. नगर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळेही राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी असा प्रवास करून आले आहेत. संगमनेर, श्रीरामपूर, नगर या पलीकडे काँग्रेसचे अस्तित्व जिल्ह्यात इतरत्र दिसत नाही. श्रीरामपूरमध्येही आमदार कानडे व जिल्हा बँक संचालक करण ससाणे यांच्यातून विस्तव जात नाही. जिल्हा संघटनेपुढे स्वतःचा असा स्वतंत्र कार्यक्रम नाही. पक्षश्रेष्ठींकडून आलेले कार्यक्रमही सक्षमपणे राबवली जात नाहीत. जिल्ह्यात विस्कळीत झालेली संघटना पुन्हा एकसंघ उभी करण्याचे आव्हान आहे. असे असले तरी पक्षाने दोन्ही मतदारसंघांवर दावा केला आहे. हा दावा काँग्रेस पक्ष संघटनेला झेपणारा ठरेल का? अशीच परिस्थिती आहे.

शिर्डी मतदारसंघ सध्या राखीव आहे. या मतदारसंघातून पक्षाचे युवक पदाधिकारी उत्कर्षा रूपवते, हेमंत उगले यांनी उमेदवारीवर दावा केला. ‘नगर दक्षिण’ मतदारसंघातून कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उमेदवारीची मागणी केली. यापूर्वीही ही मागणी करण्यात आली होती. मात्र या मागणीवर आमदार थोरात यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही. पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरून काही दिग्गजांना लोकसभा निवडणुकीत उतरवण्याचा घाट घातला जात आहे. त्यामध्ये आमदार थोरात यांचेही नाव असल्याचे सांगितले जाते. थोरात संगमनेरमधून सलग सातवेळा निवडून आले आहेत. नगर दक्षिणमधून त्यांचे नाव पुढे येणे हा पक्षाच्या धोरणाचा भाग आहे की सक्षम उमेदवारीसाठी कार्यकर्ते, पदाधिकारी त्यांच्या नावाची मागणी करीत आहेत, हे स्पष्ट झालेले नाही. संगमनेरमधून थोरात यांच्या जेष्ठ कन्या डॉ. जयश्री थोरात आता पुढे येत आहेत. पक्षात त्या सक्रिय झाल्या आहेत. त्यांच्यासाठी संगमनेर विधानसभा मतदारसंघ सुरक्षित ठरू शकतो. त्यातूनही थोरात यांचे नाव नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी पुढे आणले जात असल्याचा तर्क लढवला जात आहे.

Story img Loader