अनिकेत साठे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पाच वर्षांपूर्वी म्हणजे २०१७ मधील महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेचे २७ नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले होते. काँग्रेस, राष्ट्रवादीतील काहींनी तोच मार्ग अनुसरला. नाशिकच्या इतिहासात घाऊक पक्षांतराचा तो विक्रम ठरला होता. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा पक्षांतराचे वारे जोमाने वाहू लागले आहे. शिंदे गटाने सेनेच्या माजी नगरसेवकाला थेट महानगरप्रमुखपदी नियुक्तीची खेळी केली. त्यास भाजपच्या नगरसेविकेला पक्षात प्रवेश देत शिवसेनेने प्रत्युत्तर दिले. एकनिष्ठ आणि संभाव्य फुटीरांच्या शिरगणतीसाठी माजी नगरसेवकांना मातोश्रीवर नेण्यात आले. या वारीत दोन-तीन नगरसेवक अनुपस्थित राहिले. यातील दोन भाजप वा शिंदे गटाच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे.
शिंदे गटाच्या उदयानंतर स्थानिक राजकीय पटलावर पक्षांतराचे नव्याने डावपेच खेळले जात आहेत. राज्यात शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतरही स्थानिक पातळीवर संघटना मजबूत असल्याचे दर्शविले जात होते. खा. संजय राऊत यांच्याकडे अनेक वर्षांपासून नाशिकची जबाबदारी आहे. त्यांना मानणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने एकही माजी नगरसेवक शिंदे गटात सहभागी होणार नसल्याचे दावे झाले. प्रवीण तिदमे यांच्या शिंदे गटातील प्रवेशाने ते फोल ठरले. माजी नगरसेवकांमध्ये फाटाफूट सुरू झाल्याची चर्चा रंगली. परंतु, तिदमेंची बंडखोरी एका मर्यादेत राहील, याची व्यवस्था खुद्द शिंदे गटाच्या त्यांना महानगरप्रमुखपदी नेमण्याच्या निर्णयाने झाली. गतवेळी पहिल्यांदा नगरसेवक झालेले तिदमे हे राजकीय अनुभवाने कमी आहेत. शिंदे गटाने नवख्या व्यक्तीकडे नाशिकची सूत्रे सोपविल्याने कुंपणावर बसलेल्यांची अडचण झाली. ज्येष्ठ नगरसेवक त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची शक्यता नाही. दुसरीकडे शिंदे गटाला आणखी फोडाफोडीची संधी मिळू नये, याकरिता सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले. नाशिकरोड विभागातील माजी नगरसेवकांच्या घरोघरी जाऊन भेटी घेतल्या. सिडको, सातपूर विभागातील नगरसेवक-पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन शह देण्याच्या दृष्टीने पावले उचलली. त्या अंतर्गत पंचवटी प्रभाग समितीच्या माजी सभापती तथा माजी नगरसेविका पूनम धनगर यांना शिवसेनेत आणून भाजपला धक्का दिला.
हेही वाचा : शिंदे समर्थक आमदार गोगावले यांचा पुन्हा एकदा अपेक्षाभंग
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिदमे यांच्याकडे महानगर प्रमुखपद सोपविल्यानंतर शिवसेनेने तातडीने मातोश्री भेटीची आखणी केली. यावेळी ३३ पैकी जवळपास २९ ते ३० माजी नगरसेवक उपस्थित राहिले. त्यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंची भेट घेतली. श्याम साबळे आणि कल्पना चुंबळे या दोघांनी दांडी मारली. ते भाजप किंवा शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे सांगितले जाते. सेनेतून अपेक्षित रसद मिळत नसल्याने शिंदे गटाने नाशिकचे पालकमंत्रीपद स्वत:कडे घेत नव्याने व्यूहरचना आखण्याची तयारी केली आहे. दुसरीकडे भाजपला आपल्या नगरसेवकांना पक्षात ठेवण्याचे आव्हान आहे. मागील महापौर निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपच्या जवळपास १२ नगरसेवकांना गळाला लावले होते. आघाडीत समन्वय नसल्याने भाजपने ऐनवेळी त्यांची बंडखोरी रोखत महापौरपद कायम राखण्यात यश मिळवले होते. बंडाचे निशाण फडकावणाऱ्यांमध्ये सेनेत प्रवेश करणाऱ्या पूनम धनगर यांचाही समावेश आहे. तेव्हा बंडाचा पवित्रा घेणारे १२ नगरसेवक आगामी निवडणुकीत भाजप उमेदवारी देईल की नाही, या चिंतेत आहे. ही बाब त्यांच्या पक्षांतराला हातभार लावणारी ठरू शकते. धनगर यांच्या सेना प्रवेशातून तेच अधोरेखीत झाले.
हेही वाचा : कोल्हापूरमध्ये भाजपांतर्गत मतभेद दूर करण्याचे चंद्रकांत पाटील यांच्यासमोर पहिले आव्हान
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना काही महिन्यांपूर्वी भाजपचे माजी उपमहापौर प्रथमेश गिते, माजी उपमहापौर भिकुबाई बागूल, माजी नगरसेविका हेमलता कांडेकर यांच्यासह सुफी जीन यांनी शिवबंधन बांधले होते. अपक्ष मुशीर सय्यदही सेनेच्या गोटात सहभागी झाले होते. राज्यातील सत्ता गमावल्यानंतर सेनेत फाटाफूट सुरू झाली. या स्थितीत भाजपच्या नगरसेवकांना सेनेत आणून विरोधकांना आव्हान दिले जात आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी एकसंध राहून तयारीला लागण्याचा दिलेला सल्ला संभाव्य पडझड रोखण्याचा भाग आहे. गतवेळी अंतर्गत वादात शिवसेनेचे मोठे नुकसान झाले होते. घाऊक पक्षांतराने मनसेला राज्यातील एकमेव सत्ताकेंद्र गमवावे लागले. पक्षांतराची परंपरा यंदा कायम राखताना प्रतिस्पर्ध्याला गारद करण्याची व्यूहरचना आखण्यावर सर्वपक्षीयांचे लक्ष आहे.