परभणी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाथरी तालुक्यातील काही राजकीय पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला तर दुसरीकडे शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पाथरीत बाबाजानी दुर्राणी यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनास गेले. तूर्त राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष असलेले बाबाजानी हे गेल्या अनेक दिवसांपासून या पक्षात अस्वस्थ आहेत. राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाशी त्यांची बोलणी चाललेली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जर काही शब्द मिळाला तर बाबाजानी हे पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दिसतील अशी परिस्थिती आहे. एकूणच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाथरी मतदारसंघात जोरदार राजकीय घडामोडी घडत आहेत.

विधानसभा निवडणुकीत पाथरीची जागा शिवसेनेला सोडवून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करु, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी सांगितले आहे. मुंबईत आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात पाथरी विधानसभा अंतर्गत येणाऱ्या तालुक्यातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यात पाथरीचे माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड. मुंजाजी भाले पाटील, मधुकर निरपने, कुमार चव्हाण, सारंगधर महाराज, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब फले यांच्यासह विश्वनाथ भाले पाटील, किरण भाले पाटील आणि हनिफ कुरेशी या नगरसेवकांचा व राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष खालेद शेख, बंडू कांबळे यांच्यासह विविध गावांतील सरपंच आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
On Friday Rahul Gandhi spoke with Prakash Ambedkar he said he will campaign against his candidate
‘तुमच्या उमेदवाराच्या…’ॲड. प्रकाश आंबेडकर व राहुल गांधींमध्ये नेमकी काय चर्चा
Ajit Pawar on a secret Adani Amit Shah meeting
राजकीय निर्णयात उद्योगपतींचा सहभाग नसतो!
yogi adityanath criticize congress and mahavikas aghadi
योगी आदित्यनाथ म्हणाले “काँग्रेस नेतृत्वातील ‘मविआ’ची नियत साफ नाही”
nitin gadkari
Nitin Gadkari: ‘भाजपाचं पिक वाढलंय, त्यावरही फवारणी करण्याची गरज’, नितीन गडकरींचा इशारा कुणाकडे?
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी

हेही वाचा – “केजरीवालांची तब्येत बिघडावी म्हणून कट”; आप-काँग्रेस एकत्र येऊन करणार आंदोलन

पाथरी, मानवत, सोनपेठ या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली आहे. पाथरी विधानसभा मतदारसंघाची जागा महायुतीत आपल्या पक्षाकडे घेण्याचा प्रयत्न करू, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे, अशी माहिती सईद खान यांनी दिली. एकनाथ शिंदे गटाकडून सईद खान हे विधानसभेसाठी इच्छुक आहेत तर या मतदारसंघात सध्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर हे विद्यमान आमदार आहेत.

महाविकास आघाडीच्या वतीने विधानसभा निवडणुकीत पाथरीची जागा काँग्रेस पक्षाकडेच असेल असे मानण्यात येत असले तरी या ठिकाणी बाबाजानी दुर्राणी हेसुद्धा इच्छुक आहेत. सुरुवातीला आपण राष्ट्रवादीत शरद पवारांसोबतच राहू असे स्पष्ट केल्यानंतर काही दिवसांनी बाबाजानी यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. या पक्षाचे जिल्हाध्यक्षपद सध्या त्यांच्याकडेच आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात बाबाजानी हे अलिप्तच होते. मराठा आरक्षण आंदोलनामुळे महायुतीच्या विरोधात जनमत आहे. मराठा आणि मुस्लिम मतदार ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत अशी भावनाही त्यांनी त्यावेळी पक्षनेतृत्वाकडे कळवली होती. अजित पवार गटाने राजेश विटेकर यांना विधान परिषदेवर संधी दिली, त्यानंतर बाबाजानी दुर्राणी यांनी या पक्षाशी पुन्हा अंतर ठेवले. अजित पवार गटात त्यांचे मन रमत नसल्याचे गेल्या अनेक महिन्यांपासून दिसून येत आहे.

हेही वाचा – “उत्तर बंगालमधील जिल्हे मिळून स्वतंत्र राज्य करा”; भाजपा नेत्यांच्या मागणीमागे काय आहे राजकारण?

‘निष्ठावंतांचा मेळावा’ या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमानिमित्त पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे दोन दिवस जिल्हा दौऱ्यावर होते. पहिल्या दिवशी गुरुवारी रात्री पाथरी येथे बाबाजानी दुर्राणी यांच्या निवासस्थानी पाटील यांनी भेट दिली. स्नेहभोजनानंतर दोघांमध्ये बराच वेळ बंद खोलीत चर्चा झाली. ही केवळ सदिच्छा भेट होती, आम्ही सोबत जेवण केले. या निमित्ताने जुन्या कार्यकर्त्यांच्या भेटी झाल्या, असे यावेळी पाटील यांनी सांगितले. आगामी राजकीय दिशा ठरवून बाबाजानी हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाऊ इच्छितात. तथापि पुढील सर्व बोलणी झाल्याशिवाय आणि या पक्षाकडून पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आश्वासन मिळाल्याशिवाय अधिकृतपणे काहीच जाहीर करायचे नाही असा पवित्रा बाबाजानी यांनी घेतल्याचे समजते. प्रदेशाध्यक्षाशी झालेल्या चर्चेनंतर पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन बाबाजानी आपली पुढील राजकीय वाटचाल जाहीर करतील असे संकेत आहेत. एकूणच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाथरी विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.