२०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी विरोधक एकत्र आले आहेत. विरोधकांनी आपल्या आघाडीला ‘इंडिया’ असे नाव दिले असून देशातील महत्त्वाच्या विरोधी पक्षांचा या आघाडीत समावेश आहे. काँग्रेससह आम आदमी पार्टी (आप) पक्षदेखील या आघाडीत आहेत. दरम्यान, आप पक्षाच्या गुजरात विभागाचे प्रदेशाध्यक्ष इसुदान गढवी यांनी या युतीवर मोठे आणि महत्त्वाचे भाष्य केले आहे. आमची इंडिया या आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसशी युती असून आम्ही गुजरातमध्ये जागावाटप करण्यास तयार आहोत, असे ते म्हणाले आहेत.

काँग्रेसने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही

गढवी यांच्या या विधानानंतर आप पक्ष आता प्रत्येक राज्यात काँग्रेससोबत जागावाटप करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गढवी यांनी आम्ही जागावाटपास तयार आहोत, असे जाहीर भाष्य केले असले तरी काँग्रेसने मात्र अद्याप यावर कोणतीही थेट प्रतिक्रिया दिलेली नाही. पक्षश्रेष्ठींनी अधिकृत घोषणा करण्याआधीच गढवी यांनी जागावाटपावर भाष्य करणे योग्य नाही, असे काँग्रेसच्या नेत्यांचे मत आहे.

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
issue of ministery post between Devendra Fadnavis Eknath Shinde and Ajit Pawar is likely to be resolved in Delhi
खातेवाटपाचा पेच आता दिल्लीतच सुटण्याची शक्यता
centre attempts to revive farm reforms unveils draft policy
शेतीमालाच्या विक्री धोरणाबाबत केंद्राची पुन्हा घाई; सूचना, हरकतींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी
Lakshmi Road will be closed again within three months after Ganeshotsav
गणेशोत्सवानंतर तीन महिन्यातच ‘लक्ष्मी रस्ता’ पुन्हा राहणार बंद, काय आहे कारण?
pune municipality suffered financial loss due to state government decision
Pune Municipal Corporation : महापालिकेला का सोसवेना समाविष्ट गावांचा भार, काय आहे नक्की कारण?
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक
markadwadi villagers marathi news
मारकडवाडी ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करणे आवश्यक, रामदास आठवले यांची भूमिका

गढवी नेमके काय म्हणाले?

गुजरातमध्ये गढवी एका पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी इंडिया आघाडी आणि काँग्रेससोबतच्या युतीवर भाष्य केले. “काँग्रेस आणि आप पक्षात युती झालेली आहे. त्याला आम्ही ‘इंडिया’ असे म्हणतो. ही युती गुजरातमध्येही लागू होते. सध्या आम्ही गुजरातमधील लोकसभेच्या जागांवर अभ्यास करत आहोत. भाजपाला इंडिया या आघाडीची भीती वाटत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून भाजपाच्या अन्य नेत्यांच्या मनातही ही भीती आहे. याच कारणामुळे ते आमच्या आघाडीवर टीका करत आहेत,” असे गढवी म्हणाले.

“…तर आम्ही सर्वच जागांवर विजयी होऊ शकतो”

युती असलेल्या पक्षांनी एकमेकांशी चांगल्या प्रकारे जागावाटप केल्यास आम्ही गुजरातमधील सर्वच्या सर्व म्हणजेच २६ जागा जिंकू शकतो, असा विश्वासही गढवी यांनी व्यक्त केला. आप पक्षाचे गुजरातमधील प्रवक्ते करण बरोत यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाविरोधात सामना करण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात कोणाची ताकद किती आहे? हे जाणून घेऊनच आप आणि काँग्रेस पक्ष आपले उमेदवार उभे करतील, असे करण बरोत यांनी सांगितले.

“वेळेआधीच त्यांनी ही घोषणा केली”

काँग्रेसने मात्र यावर अद्याप कोणतीही थेट प्रतिक्रिया दिलेली नाही. जागावाटपावर दिल्लीतील पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील, असे मत काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केले.काँग्रेसचे प्रवक्ते मनिष दोशी यांनीदेखील यावर भाष्य केले आहे. “गढवी यांनी केलेल्या घोषणेविषयी मला नुकतेच समजले आहे. जागावाटपाचा निर्णय केंद्रातील नेतेमंडळीच घेणार आहेत,” असे दोशी म्हणाले.

“आप पक्ष काँग्रेसची बी टी, दावा खरा ठरला”

गुजरात भाजपाचे प्रवक्ते ऋत्विज पटेल यांनीदेखील गढवी यांच्या घोषणेनंतर प्रतिक्रिया दिली आहे. मागील दोन्ही निवडणुकीत भाजपाने गुजरातमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. २०२४ च्या निवडणुकीत मोठ्या फकराने जिंकण्याचे आमचे लक्ष्य असणार आहे. आपचा उदय झाल्यापासून आम्ही तो पक्ष काँग्रेसची बी टीम असल्याचे सांगतो. आज या दोन पक्षांत युतीची घोषणा करण्यात आली आहे. त्यांनी आमचा दावा योग्य अल्याचे सिद्ध करून दाखवले आहे, असे पटेल म्हणाले.

“नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार”

“याआधीच्या दोन्ही लोकसभा निवडणुकांत आम्ही २६ जागांवर विजयी झालेलो आहोत. या वेळी आमचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी मोठ्या फरकाने निवडून येण्यास सांगितले आहे. अमित शाहा यांनी नुकतेच विधान केले आहे की, विरोधकांनी काहीही करू देत. पण आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचाच विजय होणार आहे,” असेही पटेल म्हणाले.

काँग्रेसने १७ जागांवर तर आप पक्षाचा ५ जागांवर विजय

दरम्यान, २०२२ सालाच्या डिसेंबर महिन्यात गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने एकमेकांविरोधात उमेदवार उभे केले होते. या निवडणुकीत काँग्रेसने १७ तर आप पक्षाने पाच जागांवर विजय मिळवला होता.

Story img Loader