आम आदमी पार्टीला अखेर दिल्ली महानगरपालिकेत आपला महापौर निवडण्यात यश आलं आहे. भाजपाच्या उमेदवार रेखा गुप्ता यांचा पराभव करून आम आदमी पार्टीच्या उमेदवार शैली ओबेरॉय दिल्लीच्या महापौर बनल्या आहेत. शैली ओबेरॉय यांनी ३४ मतांनी ही निवडणूक जिंकली. विशेष म्हणजे दिल्ली महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तब्बल ८४ दिवसांनी आम आदमी पार्टीला आपला महापौर बनवण्यात यश आलं आहे.
या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या उमेदवार शैली ओबेरॉय यांना १५० तर भाजपाच्या उमेदवार रेखा गुप्ता यांना ११६ मतं मिळाली. या निवडणुकीत शैली ओबेरॉय यांचा ३४ मतांनी विजय झाला. पण महापौर होण्यासाठी त्यांना ८४ दिवस वाट पाहावी लागली. असं असलं तरी नवनिर्वाचित महापौर शैली ओबेरॉय यांना ३१ मार्चपर्यंत म्हणजेच केवळ ३८ दिवस या पदावर राहता येणार आहे. १ एप्रिल रोजी पुन्हा महापौरपदाची निवडणूक होणार आहे.
याचे कारण म्हणजे १७ डिसेंबर २०२२ रोजी दिल्ली महानगरपालिका निवडणुकीचे निकाल लागले. यामध्ये आम आदमी पार्टीला सर्वाधिक मतं मिळाली. महापौरपदाच्या निवडणुकीसाठी दिल्ली महापालिकेच्या सदनमध्ये तीन वेळा बैठका झाल्या. पण तिन्ही वेळा भाजपा आणि आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये गदारोळ झाला. परिणामी महापौरपदाची निवडणूक होऊ शकली नाही. त्यानंतर अखेर बुधवारी चौथ्यांदा सभागृहाची बैठक पार पडली. यात शैली ओबेरॉय यांची महापौरपदी निवड करण्यात आली.
हेही वाचा- राजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा खदखद? रायपूर अधिवेशनाआधीच गहलोत-पायलट गटबाजीच्या चर्चांना उधाण
खरं तर, शैली ओबेरॉय बर्याच प्रयत्नांनंतर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर महापौरपदी निवडून आल्या आहेत. असं असलं तरी त्यांना केवळ ३८ दिवसच महापौर पदावर राहाता येणार आहे. कारण एमसीडी कायद्यानुसार, दरवर्षी १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीतच महापौरांची निवड केली जाते. डीएमसी कायद्याच्या कलम २(६७) नुसार, दिल्ली महापालिकेचं वर्ष १ एप्रिलपासून सुरू होतं आणि पुढील वर्षी ३१ मार्चला संपतं. या अर्थाने शैली ओबेरॉय यांची २२ फेब्रुवारी रोजी महापौरपदी निवड झाली. त्यांचा कार्यकाळ ३१ मार्च २०२३ रोजी संपणार आहे. त्यामुळे त्यांना केवळ ३८ दिवस महापौरपदावर राहून काम करता येणार आहे. १ एप्रिल २०२३ रोजी पुन्हा महापौरपदाची निवडणूक होणार आहे.