AAP and BJP Vote Margin : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने तब्बल २७ वर्षांनंतर दणदणीत विजय मिळवला. तर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. राजधानीतील ७० जागांपैकी भाजपाने ४८ जागा जिंकल्या. दुसरीकडे ‘आप’ला केवळ २२ जागांवरच समाधान मानावं लागलं. दरम्यान, गेल्या दशकभरापासून राजधानीचं तख्त राखणाऱ्या ‘आप’चं मताधिक्य यंदाच्या निवडणुकीत दोन टक्के कमी झालं. मात्र, तरीही त्यांचे ४८ उमेदवार पराभूत झाले, हे नेमके का झालं? याबाबत सविस्तर जाणून घेऊ.

आपच्या उमेदवारांचा विजयी फरक भाजपापेक्षाही जास्त

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शनिवारी राजकीय विश्लेषकांनी विश्लेषण केले. त्यात असं दिसून आलं की, भाजपाने सरासरी १४ हजार ७२५ मतांच्या फरकाने तब्बल ४८ जागा जिंकल्या. आम आदमी पार्टीला २२ जागांवर समाधान मानावं लागलं. मात्र, त्यांच्या उमेदवारांचा विजयी फरक सरासरी १७ हजार ०५४ मतांचा आहे, जो भाजपाच्या उमेदवारांपेक्षा जास्त आहे. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत, भाजपाने राजधानीतील आठ मतदारसंघात सरासरी १२ हजार २७१ मताधिक्याने विजय मिळवला होता. तर ‘आप’चे ६२ उमेदवार तब्बल २२ हजार ७६ मतांच्या फरकाने विजयी झाले होते.

According to different party sources, Parvesh Verma who defeated Arvind Kejriwal in the New Delhi seat and BJP Lok Sabha MP Manoj Tiwari are among the list of potential CM names. (Express photo by Praveen Khanna)
Delhi CM : दिल्लीत भाजपाचे मुख्यमंत्री निवडण्याचे निकष काय? जातीय समीकरण, स्वच्छ प्रतिमा यासह काय काय विचारात घेतलं जाणार?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Delhi Election Results 2025 Vote Margin News
Delhi Election Results 2025 Vote Margin: ‘आप’साठी दिल्लीत ‘तेराचा फेरा’, काँग्रेसमुळे ‘या’ १३ जागांवर झाला पक्षाचा पराभव!
या पाच कारणांमुळे भाजपाने जिंकली दिल्लीची निवडणूक; आपचा पराभव कशामुळे झाला? (फोटो सौजन्य पीटीआय)
Political News : भाजपाच्या यशाचं गुपित काय? दिल्लीतील जनतेने केजरीवालांना का नाकारलं?
Northeast Delhi Assembly Election Result
दंगलग्रस्त भागातही भाजपाचा डंका; तीन जागा जिंकून आघाडी, तर ‘आप’ला एकच ठिकाणी यश
Delhi Assembly Election Results 2025 and yamuna
Delhi Election Results 2025: दिल्लीतील सत्तापालटासाठी कारण ठरलेल्या यमुनेचा इतिहास काय सांगतो? सद्यस्थिती काय?
Arvind Kejriwal
Delhi Assembly Election 2025 Results Update : अर्थसंकल्पातील ‘त्या’ घोषणेमुळे दिल्लीत निकाल फिरले? ‘आप’ला नेमका कशाचा बसला फटका?
Delhi election result updates in marathi
‘आप’ची मतपेढी फुटण्यावरच दिल्लीतील निकालाचे गणित?

आणखी वाचा : Delhi Election Result 2025 : दिल्लीत दलित मतदारांनी भाजपाला का नाकारलं? यामागचं कारण काय?

२०२५ मध्ये दिल्लीत भाजपाचे किती मतदार वाढले?

२०२० ते २०२५ दरम्यान, भाजपाने उमेदवारांच्या सरासरी मताधिक्यात दोन हजार ५०० मतांची वाढ केली. दुसरीकडे याच काळात आम आदमी पार्टीच्या उमेदवारांचे मताधिक्य पाच हजारांहून जास्त मतांनी घसरले. दिल्लीतील ७० जागांचे अनुसूचित जाती (एससी) जागा, मुस्लीम बहुल जागा आणि शहरी आणि ग्रामीण जागा अशा चार श्रेणींमध्ये विभाजन केल्यास असं दिसून येतं की, मुस्लीम, शहरी आणि ग्रामीण जागांमध्ये ‘आप’च्या उमेदवारांचा विजयी फरक भाजपापेक्षा जास्त आहे. याशिवाय अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या १२ मतदारसंघांपैकी ‘आप’ने तब्बल आठ जागांवर विजय दणदणीत मिळवला आहे. ज्यामध्ये पक्षाच्या उमेदवारांचा सरासरी विजयी फरक ११ हजार ७८९ मताधिक्यं इतका आहे.

राखीव मतदारसंघातही भाजपाचा दणदणीत विजय

भाजपाने अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या मतदारसंघांपैकी सरासरी १२ हजार ७५५ मतांच्या फरकाने चार जागा जिंकल्या आहेत. २०२० मध्ये, ‘आप’ने सर्व राखीव मतदारसंघांमध्ये विजय मिळवून भाजपाला पराभवाचा धूळ चाखली होती. तेव्हा प्रत्येक जागांवर पक्षाला सरासरी ७६ हजार ७०२ मताधिक्य मिळाली होती. त्यावेळी उमेदवारांचा सरासरी विजयी फरक हा २९ हजार १३३ मतांचा होता. २०२५ च्या निवडणुकीत ‘आम आदमी पार्टीच्या प्रत्येक उमेदवारांची सरासरी १४ हजार मते कमी झाल्याचं दिसून आलं.

२०२५ मध्ये भाजपाचे राखीव मतदारसंघातील मताधिक्य वाढले

२०२० मध्ये एकाही अनुसूचित जातीच्या राखीव मतदारसंघात भाजपाला विजय मिळवता आलेला नव्हता. यंदाच्या निवडणुकीत पक्षाने तब्बल आठ जागा जिंकल्या असून त्यांच्या मतांचा सरासरी विजयी फरक ११ हजारांनी वाढला आहे. याआधी भाजपाला राखीव मतदारसंघात सरासरी ४८ हजार ९५९ मताधिक्य मिळत होती. २०२५ च्या निवडणुकीत ती वाढून ५९ हजार ७७९ इतकी झाली आहे. आकडेवारीवरून असे दिसून येते की ‘आप’पासून वेगळे झालेल्या मतदारांनी केवळ भाजपालाच मतदान केले नाही, तर एक मोठा वर्ग काँग्रेसच्या बाजूनेही गेला. २०२० मध्ये काँग्रेसला नुसूचित जातीच्या राखीव मतदारसंघात सरासरी पाच हजार २७६ मते मिळाली होती, यंदाच्या निवडणुकीत ती वाढून नऊ हजार ०४५ इतकी झाली आहे.

आम आदमी पार्टीची मुस्लीम मतदारांवर मजबूत पकड

मुस्लीम मतदारांची २० टक्केपेक्षा जास्त संख्या असलेल्या १० जागांपैकी आम आदमी पार्टीने तब्बल सात जागा जिंकल्या आहेत. यामध्ये उमेदवारांचा विजयी फरक सरासरी २६ हजार ३७१ मताधिक्य इतका आहे. उर्वरित तीन जागांवर भाजपाने विजय मिळवला असून, उमेदवारांचा सरासरी विजयी फरक १० हजार २२३ मतांचा आहे. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने मुस्लीम बहुल मतदारसंघात सरासरी ४१ हजार ९०४ मतांच्या फरकाने नऊ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी पक्षाच्या उमेदवारांना प्रत्येक जागेवर सरासरी ७७ हजार ६९९ मते मिळाली होती. दुसरीकडे भाजपाला मिळालेल्या मतांची सरासरी ४८ हजार ८२४ इतकी होती. फक्त गांधीनगर विधानसभेची मुस्लीमबहुल जागा भाजपाने सहा हजार ७९ मतांनी जिंकली होती.

दिल्लीतील शहरी मतदारांनी ‘आप’ला नाकारलं

राष्ट्रीय राजधानीला प्रामुख्याने शहरी मानलं जातं, परंतु १८ विधानसभा जागांमध्ये ग्रामीण भागांचा समावेश आहे. उर्वरित ५२ शहरी मतदारसंघांपैकी, भाजपाने यावेळी सरासरी १३ हजार ६६८ मतांच्या फरकाने ३५ जागा जिंकल्या आहेत. तर आम आदमी पार्टीला शहरी भागातील उर्वरित १७ जागांवर विजय मिळवता आला आहे. परंतु, ‘आप’च्या उमेदवारांचा सरासरी विजयी फरक हा भाजपा उमेदवारांपेक्षा जास्त आहे. २०२० मध्ये, ‘आप’ने शहरी भागातील ४५ जागांवर सरासरी २२ हजार ०७६ मताधिक्याने विजय मिळवला होता. तर उर्वरित सात जागा भाजपाच्या पारड्यात गेल्या होत्या आणि त्यांच्या उमेदवारांचा विजयी फरक सरासरी १२ हजार २७१ मतांचा होता.

शहरी मतदारांची भाजपा आणि काँग्रेसला पसंती

२०२० मध्ये, ‘आप’ने प्रत्येक शहरी मतदारसंघात सरासरी ६६ हजरा ७३१ मते मिळवली होती. तर भाजपला ४९ हजार ९४८ आणि काँग्रेसला फक्त पाच ६२८ मते मिळाली होती. दरम्यान, २०२५ मध्ये, भाजपाने आपल्या शहरी मताधिक्य सरासरी ५७ हजार ७२४ पर्यंत वाढवली. काँग्रेसनेही आपल्या मताधिक्यात काही प्रमाणात वाढ केली, ज्यामुळे आम आदमी पार्टीला मोठा फटका बसला आणि पक्षाच्या एकूण उमेदवारांची सरासरी मताधिक्य ५३ हजार ५०७ मतांपर्यंत घसरली. आकडेवारी असे दर्शवते की यंदाच्या निवडणुकीत शहरी भागातील मतदारांनी ‘आप’पेक्षा भाजपा आणि काँग्रेसच्या उमेदवारांना जास्त पसंती दिली.

हेही वाचा : Political News : भाजपामध्ये अंतर्गत वाद, मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या मंत्र्याला कारणे दाखवा नोटीस; हरियाणात काय घडतंय?

ग्रामीण भागातील मतदारसंघातही भाजपाची उसळी

दुसरीकडे, ग्रामीण भागातील १८ जागांपैकी भाजपाने यंदाच्या निवडणुकीत १३ जागांवर विजय मिळवला. या जागांवर भाजपाच्या उमेदवारांचा सरासरी विजयी फरक १७ हजार १२८ इतका होता. तर उर्वरित पाच जागा आम आदमी पार्टीला आपल्या पारड्यात टाकता आल्या. त्यांच्या उमेदवारांचा सरासरी विजयी फरक १९ हजार २९६ इतका आहे, जो भाजपाच्या उमेदवारांपेक्षा जास्त आहे. दरम्यान, २०२० मध्ये, ‘आप’ने ग्रामीण भागातील तब्बल १७ जागांवर दणदणीत विजय मिळवला होता. तेव्हा पक्षाच्या उमेदवारांचा सरासरी विजयी फरक हा २२ हजार २७० मताधिक्य होता. तर भाजपाला ग्रामीण भागात एकाच जागेवर विजय मिळवता आला होता.

दिल्लीत आम आदमी पार्टीचा पराभव का झाला?

आकडेवारीतून असंही समोर आलं आहे की, २०२० ते २०२५ च्या दरम्यान आम आदमी पार्टीची ग्रामीण भागातील मताधिक्य सरासरी ८३ हजार ५८४ वरून ७२ हजार ००६ मताधिक्यापर्यंत घसरली. भाजपाने २०२० मध्ये ग्रामीण भागातील प्रत्येक मतदारसंघात सरासरी ६३ हजार ४१४ मते मिळवली होती, जी यावर्षीच्या निवडणुकीत वाढून ७९ हजार १५८ मते झाली आहेत. काँग्रेसनेही सात हजार २५९ मताधिक्यावरून ११ हजार ७३५ पर्यंत मतांची सुधारणा केली आहे. २७ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भाजपाने दिल्ली विधानसभेत बहुमत मिळवलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader