२०१४ च्या लोकसभा निवडणुकांपासून दिल्लीतील सर्व प्रमुख निवडणुकांचे निकाल खूपच स्पष्ट लागले आहेत. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत भाजपाने सर्वच्या सर्व म्हणजे ७ जागा जिंकल्या आहेत. तर आम आदमी पक्षाने गेल्या २ विधासभा निवडणुकांमध्ये ७० जागांपैकी अनुक्रमे ६७ आणि ६२ जागांवर विजय मिळवला आहे. मात्र पोटनिवडणुकीचा विचार केला असता दिल्लीने वेगळा कल दिला असल्याचे लक्षात येते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
२६ जून रोजी देशाची राजधानी आणखी एका मोठ्या पोटनिवडणुकीला सामोरी जाणार आहे. राजेंद्र नगर मतदार संघातील आपचे आमदार राघव चढ्ढा यांची राज्यसभेवर नियुक्ती झाल्यामुळे राजेंद्र नगर मतदार संघात ही पोटनिवडणूक होत आहे. सत्ताधारी आम आदमी पक्षाने पोट निवडणुकीसाठी दुर्गेश पाठक यांना उमेदवारी दिली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने केलेली कामे हाच ‘आप’च्या प्रचाराचा प्रमुख मुद्धा असणार आहे. भाजपाने सत्तेचा वापर करून गरीब लोकांच्या घरावर बुलडोजर चालवून त्यांना बेघर केले. हे दिल्ली मॉडेल आपल्याला नको असल्याची भूमिका ‘आप’ मांडत आहे.
दिल्ली भाजपाला २०१७ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीतही भाजपाचा विजय होईल. भाजपाचे प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर म्हणाले की ” आम आदमी पक्षाचे आमदार दिल्ली जल मंडळावर आहेत. तरीसुद्धा दिल्लीतील लोकांचा पाणी प्रश्न अजूनही सुटला नाहै. त्यामुळे या मतदार संघातील मतदार आदमी पक्षाला मतदान करणार नाहीत.
विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच २०१७ मध्ये दिल्लीतील राजौरी गार्डन मतदारसंघाला पोटनिवडणुकीला सामोरे जावे लागले होते. यावेळी भाजपा आणि अकाली दलाचे संयुक्त उमेदवार मनजिंदर सिंग सिरसा यांनी १०,००० पेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला होता. तर या निवडणुकीत आपच्या उमेदवाराला फक्त १०,००० मते मिळाली होती. या पोटनिवडणुकीत आम आदमी पक्ष हा तिसऱ्या क्रमांकावर होता. या निवडणुकीत काँग्रेसने आम आदमी पक्षापेक्षा जास्त मते मिळवली होती.
त्यानंतर काही महिन्यांनंतर ऑगस्टमध्ये बावाना येथील भाजपाचे उमेदवार वेद प्रकाश यांनी आम आदमी पक्षाचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे वेद प्रकाश यांना आमदारकीचा राजीनामा दयावा लागला होता. या निवडणुकीत भाजपाला धक्का बसला होता. दोन वर्षांपूर्वी आरामात जिंकलेले वेद प्रकाश यांचा त्याच मतदार संघातून पराभव झाला. या निवडणुकीत आम आदमी पक्षाने २४, ०५२ मतांनी विजय मिळवला. केवळ विधानसभा पोटनिवडणूकच नाही तर नुकत्याच झालेल्या नागरी संस्थांच्या पोटनिवडणुकांमध्येही आश्चर्यकारक निकाल लागले आहेत. मार्च २०२१ मध्ये ‘आप’ने दिल्ली महानगर पालिकेच्या पाचपैकी चार पोटनिवडणुकांमध्ये विजय मिळवल. त्यामुळ येत्या २६ जून रोजी होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्न करतील मात्र मुख्य लढत ही आम आदमी पार्टी आणि भाजपा यांच्यामध्येच होण्याची शक्यता आहे.