आम आदमी पार्टी (AAP) आणि काँग्रेसने लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय स्तरावर एकत्र येण्यासाठी आपले मतभेद बाजूला ठेवलेले दिसत असले तरी काही राज्यांत त्यांचा एकमेकांशी संघर्ष पाहायला मिळत आहे. अनेक दिवसांच्या औपचारिक अन् अनौपचारिक बैठका, फोन कॉल्स आणि वादविवादानंतर दोन्ही पक्षांनी गुरुवारी जागावाटपावर व्यापक चर्चा केली. दिल्लीत ४-३ जागावाटपाच्या सूत्रावर दोघांनी सहमती दर्शवली असली तरी राष्ट्रीय राजधानीच्या पलीकडे आपसाठी जागा सोडण्यास काँग्रेसने नकार दिला आहे. पंजाबमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्र लढत असून, दोन्ही पक्षांच्या राज्यातील नेते एकमेकांशी आघाडी न करण्याच्या त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. ‘आप’ने आसाममधील तीन उमेदवारांची नावेही जाहीर केली आहेत. पण गुजरात आणि गोव्यातील जागा अडथळ्याचा मुद्दा बनला आहे.

गुजरात

गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीचे (GPCC) वरिष्ठ नेते AAP बरोबर जागावाटपाच्या विरोधात आहेत. कारण पक्षाला २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत आपमुळे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या जखमा ताज्या असून, AAP ने ३५ पैकी अनेक जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांना हानी पोहोचवली, जिथे ते त्या जागांवर २० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवून दुसऱ्या स्थानावर राहिले, यापैकी नऊ मतदारसंघ हे आदिवासी जिल्ह्यांमधील काँग्रेसचे बालेकिल्ले समजले जातात. २०२२ मध्ये काँग्रेसला २७ टक्के मते मिळाली होती, तर AAP ला जवळपास १३ टक्के मते मिळाली होती. सुरुवातीला मतदानाच्या टक्केवारीच्या आधारे आपने राज्याच्या २६ लोकसभेच्या जागांपैकी ८ जागांची मागणी केली होती, परंतु इतर राज्यांमधील जागा वाटपाच्या चर्चेनंतर ही मागणी दोन जागांवर आली. एका वरिष्ठ आप नेत्याने सांगितले की, त्यांच्या गुजरातमधील आपने खूप चर्चा केल्यानंतर बोटाडचे आमदार उमेश मकवाना यांना भावनगरमधून आणि डेडियापाडाचे आमदार चैतर वसावा यांना भरूचमधून उमेदवार म्हणून घोषित केले आहे. परंतु काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणारा मतदारसंघ भरूच सध्या भाजपाच्या ताब्यात आहे. तो काँग्रेसला परत मिळवायचा आहे, कारण तो मतदारसंघ दिवंगत अहमद पटेल यांचे घर आणि काँग्रेसला बालेकिल्ला होता.

Navi mumbai Airoli Vidhan Sabha Constituency Ganesh Naik vs shivsena thackeray group m k madhavi for Maharashtra assembly election 2024
नवी मुंबईत नाईक विरोधक चक्रव्युहात
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Shiv Sainiks held a meeting and decided not to work as a candidate of Mahavikas Aghadi
महाविकास आघाडीच्या उमेदवारांच काम करणार नाहीत, शरद पवारांनी शिवसेना संपवण्याचा डाव….;शिवसैनिक आक्रमक
Nana Patole Maha Vikas Aghadi Congress Party is big for Maharashtra Vidhan Sabha Election 2024 than Shivsena thackeray group and NCP Sharad Pawar print politics news
Congress in Maha Vikas Aghadi: आक्रमक नानांमुळे मविआतील घटकपक्षांना लगाम?
Senior Maharashtra minister Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar: लोकसभेनंतर भाजपाने रणनीतीत ‘हा’ महत्त्वाचा बदल केला, सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “RSS ने लोकसभेवेळी…”
Udhayanidhi Stalin vs L Murugan
स्टॅलिन हे नाव तमिळ आहे का? हिंदीच्या सक्तीकरणाला विरोध करणाऱ्या उदयनिधींना भाजपा मंत्र्याचे उत्तर
banner for vote against the oppressors of the Halaba community
हलबा समाजाला डावलणाऱ्यांविरोधात मतदान, ‘या’ फलकाने वाढवले सर्व पक्षांचे टेन्शन…
Rebellion to Mahayuti and Mahavikas Aghadi in Purandar
पुरंदरमध्ये महायुती, महाविकास आघाडीला बंडखोरीचे ग्रहण

हेही वाचाः मोदी सरकारविरोधात बोलणं सत्यपाल मलिकांना भोवणार? सीबीआयच्या छापेमारीनंतर राजकीय चर्चांना उधाण!

गुजरातमधील जागावाटपाची चर्चा सुरू असतानाही काँग्रेसच्या भरूचमधील नेत्यांनी गुरुवारी पटेल यांचा मुलगा फैसल पटेल आणि मुलगी मुमताज पटेल यांच्यासह आपबरोबरच्या आघाडीला त्यांचा आक्षेप असल्याचे जाहीर केले. काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष राजेंद्रसिंह राणा यांनी ‘आप’शी युती करण्यास आक्षेप घेत GPCCला पत्र लिहिले आहे. शुक्रवारी फैसलने X वर पोस्ट राहुल गांधींना उद्देशून पोस्ट केलीय, त्यात त्यांनी भरूच जागेवरही दावा केलाय. “राहुल गांधीजी तुम्ही माझे आणि भरूच काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकले. आम्हाला पाठिंबा दिल्याने माझा आणि माझ्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सन्मान झाला आहे. मी तुम्हाला वचन देतो की मी भरूच लोकसभा मतदारसंघ जिंकून तुमच्या विश्वासास पात्र राहीन.” काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले, “आपकडे भरूच वगळता कोणत्याही जागेवरून कोणताही अजेंडा किंवा उल्लेखनीय उमेदवार नाही. चैतर वसावा यांना आपने उमेदवारी न दिल्यास ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे समजते. तसेच आपही त्यांना गमावू इच्छित नाही.

हेही वाचाः पुण्यातील महाविकास आघाडीच्या मेळाव्यात तिन्ही पक्षांमधील संबंध अधिक भक्कम करण्यावर भर

गोवा

फक्त दोन लोकसभेच्या जागा असलेल्या गोव्यात AAP ने दक्षिण गोवा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केला आहे, जिथे विद्यमान खासदार काँग्रेसचा आहे. पक्षाने २०२० मध्ये राज्यात प्रथम प्रवेश केला, जेव्हा त्यांनी दक्षिण गोव्यातील बेनौलिम येथे जिल्हा पंचायतीची जागा जिंकली. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने दक्षिण गोव्यात ४० पैकी केवळ वेलीम आणि बेनौलिम जिंकले. गोवा काँग्रेसने AAP च्या या निर्णयाला “एकतर्फी आणि अकाली” म्हटले आहे, तर AAP चे गोव्यातील अध्यक्ष अमित पालेकर यांनी जागावाटप निश्चित करण्यात उशीर झाल्याबद्दल काँग्रेसला दोष दिला आहे. १३ फेब्रुवारी रोजी पालेकर म्हणाले, “वेळ महत्त्वाचा आहे, निवडणुकीसाठी दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. कोणताही विलंब प्रचारासाठी आणि विजयासाठी हानिकारक ठरू शकतो.” तेव्हापासून दोन्ही पक्षांमध्ये परस्परसंवाद सुरू आहे. गुरुवारी चर्चेनंतर ‘आप’ने या जागेवरून माघार घेण्याची तयारी दर्शवली होती. वरिष्ठ AAP नेत्यांनी सांगितले की, त्यांनी पुढे जाऊन त्यांना आत्मविश्वास वाटणाऱ्या जागेवर उमेदवाराचे नाव जाहीर केले, कारण काँग्रेस प्रतिसाद देण्यास खूप वेळ घेत आहे किंवा कोणताही मतदारसंघ सोडण्यास तयार नाही. खरं तर पालेकर यांनी आपली भूमिका थोडी मवाळ केली होती. दक्षिण गोवा मतदारसंघासाठी नाव ‘आप’च्या निवडणूक रणनीतीचा एक भाग म्हणून घोषित केले गेले होते, कारण ते तिथला उमेदवार मागे घेऊ शकतात.

आसाम

AAP सूत्रांनी सांगितले की, पक्षाने केवळ अशाच जागांवर उमेदवारांची घोषणा केली, जिथे त्यांना विधानसभा किंवा नगरपालिका निवडणुकीत आधीच यश मिळाले आहे. उदाहरणार्थ, गेल्या वर्षी AAP ने उच्च आसाममधील नागरी संस्थांच्या निवडणुकीत दोन विजय मिळवले आणि त्यानंतर गुवाहाटी महानगरपालिका निवडणुकीत ६० पैकी ३८ जागा लढवल्या. पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की, या कामगिरीच्या आधारे उमेदवारीसाठी गुवाहाटी मतदारसंघासाठी प्रदेशाध्यक्ष भाबेन चौधरी, दिब्रुगड मतदारसंघासाठी राज्य उपाध्यक्ष मनोज धनोवर आणि सोनितपूरसाठी राज्य संघटन सचिव ऋषिराज कौंदिन्य यांची निवड करण्यात आली आहे.

आपचे आसाम उपाध्यक्ष जितुल डेका यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, पक्षाचा मूळ हेतू अधिक उमेदवार उभे करण्याचा होता, परंतु आघाडीमुळे आपल्या आकांक्षा कमी झाल्या. “बूथ व्यवस्थापनापासून ते मतदारसंघ समित्यांपर्यंत आम्हाला खात्री होती की, संघटनात्मकदृष्ट्या आम्ही या तिन्ही जागांवर जोरदार लढत देऊ शकतो. सुरुवातीला आम्ही पाच जागांवर निवडणूक लढवू, असे वाटत होते, पण आघाडी झाल्याने आम्ही तीन जागा निवडल्या. दिब्रुगढमध्ये आम्ही लोकसंख्या आणि मतदारांच्या पद्धतीचे विश्लेषण केले आणि आम्हाला आढळले की, आमचा उमेदवार इथे मजबूत आहे. आमच्यासाठी शेवटची मोठी निवडणूक गुवाहाटी महानगरपालिकेची निवडणूक होती, जिथे आम्ही नगरसेवक म्हणून जिंकलो आहोत. गुवाहाटीच्या मेट्रो मतदारसंघातील लोकांना एक सुशिक्षित स्थानिक व्यक्ती हवी आहे, ज्याचे प्रतिनिधीत्व डॉ. भाबेन चौधरी यांनी केले आहे. आम्ही निवडलेले तीन मतदारसंघ असे आहेत की, ज्यात काँग्रेस गेली १५ वर्षे पराभूत होत आहे आणि त्यांच्याकडे जनाधार असलेले नेते नाहीत.