आम आदमी पार्टी सध्या बऱ्याच अडचणींमधून जात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीला सातपैकी एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. दुसऱ्या बाजूला पक्षाचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल अद्यापही तुरुंगात आहेत. त्यामुळे दिल्लीचा कारभार सध्या अधांतरीच आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता पक्षाला गळतीचा सामनाही करावा लागत आहे. छत्तरपूरचे आमदार करतार सिंह तंवर यांनी बुधवारी (१० जुलै) आम आदमी पक्षाला रामराम करत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तंवर यांनी आपमधील ‘हुकूमशाही’मुळे पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचे म्हटले आहे. “दिल्लीची अवस्था फारच वाईट झाली आहे. मात्र, आप पक्षाच्या मंत्र्यांची हुकूमशाही आणि त्यांच्या धोरणांमुळे त्याबाबत आम्ही काहीही करू शकत नाही. गेले तीन महिने कडक उन्हाळा असूनही दिल्लीची जनता पाण्यासाठी टाहो फोडत आहे. जेव्हा जेव्हा आम्ही यासंदर्भात मंत्र्यांकडे बोलणी केली, तेव्हा त्यांनी नायब राज्यपाल, पंतप्रधान मोदी आणि हरियाणा सरकारवर त्याचे खापर फोडण्याचे काम केले”, असे तंवर यांनी म्हटले.
दिल्लीत पाणी तुटवडा, मुख्यमंत्री अटकेत आणि पक्षाला गळती; आप आमदाराने सोडला पक्ष
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीला सातपैकी एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. दुसऱ्या बाजूला पक्षाचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल अद्यापही तुरुंगात आहेत.
Written by पॉलिटिकल न्यूज डेस्क
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-07-2024 at 17:19 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aap delhi mla kartar singh tanwar joined bjp vsh