local body Elections : दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि आम आदमी पक्षातील कटुता आता गुजरातमध्ये पाहायला मिळत आहे. गुजरातच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ‘आप’ने काँग्रेसची मजबूत पकड असलेल्या जागांवर शिरकाव केल्याचे पाहायला मिळत आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २००० हून अधिक जागांपैकी ‘आप’ला फक्त ३२ जागा जिंकता आल्या आहेत, ज्यामध्ये एकाही ठिकाणी आपला बहुमत मिळवता आलेले नाही. असे असले तरी भाजपाने जिंकलेल्या सुमारे २५० जागांच्या तुलनेत काँग्रेसला मागे टाकत अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष दुसर्‍या क्रमांकावर राहिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

६८ नगरपालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ६ फेब्रुवारी रोजी पार पडल्या. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्याच्या आठवडा भरातच या निवडणुकी झाल्या. या निवडणुकीत प्रमुख दोन पक्षांमध्ये आप हा तुलनेने नवखा पक्ष होता.

‘आप’ला कुठे-कुठे विजय मिळाला?

आम आदमी पक्षाला मिळालेला विजय हा २७ नगरपालिकांमध्ये विभागलेला आहे. देवभूमी द्वारका जिल्ह्यातील सलाया नगरपालिकेत आपला १३ जागा मिळाल्या, ज्यामुळे काँग्रेसला १४ जागांवर धक्का बसला. कारजन नगरपालिकेत झालेल्या प्रतिष्ठेच्या लढाईत भाजपाच्या दोन बंडखोर उमेदवारांसह आपने आठ जागा जिंकल्या. आपने मंगलोळ आणि गरिआधर येथे अनुक्रमे चार आणि तीन जागा जिंकत मुख्य विरोधक म्हणून मुसंडी मारली. पक्षाने वांकनेर आणि जमजोधपूर येथे देखील प्रत्येकी एक जागा जिंकली.

गुजरातच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील हा विजय आम आदमी पक्षाचे मनोबल वाढवणारा ठरणार आहे. याचा फायदा पक्षाला भविष्यातील निवडणुकींमध्ये मिळू शकतो.

२०२१ मध्ये गुजरातच्या सुरत नगरपालिकेत आण आदमी पक्षाने त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात २७ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपला पाच विधानसभा जागा जिंकता आल्या होत्या. सध्या विधानसभेत आपचे चार आमदार आहेत, तर काँग्रेसचे १२ आमदार होते, त्यापैकी पाच जणांनी राजीनामा दिला आणि २०२२ च्या निवडणुकीनंतर भाजपाच्या तिकिटावर विजय मिळवला.

आपचे गुजरातचे प्रवक्ते करण बारोत म्हणाले की, पक्षाला मिळालेल्या ३२ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा हा दिल्ली विधानसभा निवडणुकीत पक्षाला नाकारलेल्या लोकांच्या जनादेशाचे प्रतिबिंब आहे. “आम्हाला दिल्लीत अपेक्षित निकाल मिळाला नाही… तरीही, इतक्या जागांसह ‘आप’ हा दिल्लीत विरोधी पक्षात बसणारा पहिला पक्ष असेल… कारण भाजपाने सत्ता मिळवण्यासाठी साम दाम दंड भेद असा सर्व शक्य युक्त्या वापरल्या… दिल्लीचा निकाल हा जनतेचा जनादेश नव्हता,” असे बारोत म्हणाले.

पक्षाला मिळालेल्या विजयावर बोलताना ते म्हणाले की, यामुळे एक चांगला संदेश जाईल आणि यामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढेल. “संदेश आहे आहे की भाजपा निवडणुका जिंकण्यासाठी सर्व यंत्रणांचा वापर करत आहे… आम्ही लढवलेल्या एकूण ६६७ जागांपैकी २५० जागांवर काँग्रेसला मागे टाकत आम्ही दुसर्‍या स्थानावर आहोत. आम्ही एकूण ३२ जागा जिंकल्या आणि सालया येथे आणखी दोन जागा जिंकल्या असत्या तर आम्ही तेथे बोर्ड स्थापन करू शकलो असतो. खरं तर, राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांचे प्रदेश असूनही सलायामध्ये भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला,” असे बारोत म्हणाले.

काँग्रेसने मात्र या निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना आप हा भाजपाचा साथिदार असल्याचा हा पुरावा असल्याचे म्हटले आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर गुजरात काँग्रेसचे प्रमुख आणि राज्यसभा खासदार शक्तीसिंह गोहिल म्हणाले की, “सामान्यत: एकमेकांच्या विरोधात लढणारे आप आणि भाजपा निवडणुकीत एकत्र होते.” तसेच त्यांनी आप आणि बसपा यासारख्या पक्षांना पाठिंबा देऊन भाजपा काँग्रेसच्या मतांचे विभाजन करत असल्याचा दावाही यावेळी केला.