दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात आम आदमी पार्टीचे (आप) आणखी एक नेते केंद्रीय यंत्रणेच्या रडारवर आहेत. आपचे नेते आमदार दुर्गेश पाठक यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. सीबीआयने सोमवारी या प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबरोबर पाठक आणि इतर चार जणांची आरोपपत्रात नावे दिली. सीबीआयने नोंदवलेल्या सुरुवातीच्या आरोपपत्रात पाठक यांचे नाव नसले तरी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांची दोनदा चौकशी केली आहे.

या वर्षी मार्चमध्ये, दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयात ईडीने दाखल केलेल्या रिमांड अर्जात आरोप करण्यात आला होता की, दक्षिण भारतातील राजकारणी, व्यावसायिक यांनी दिल्ली अबकारी धोरणातून अवाजवी लाभ मिळवला. आपने असा आरोप केला की, २०२२ मधील गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी त्याचा वापर करण्यात आला. हवाला नेटवर्कद्वारे पैसे गोव्यात पोहोचल्याचा आरोप ईडीने केला होता. पाठक हे त्यावेळी आपचे गोवा प्रभारी होते. या वर्षी एप्रिलमध्ये केजरीवाल यांचे खाजगी सचिव बिभव कुमार यांच्यासह पाठक यांची संबंधित पीएमएलए (प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायदा) प्रकरणात ईडीने चौकशी केली होती. सप्टेंबर २०२२ मध्ये त्यांची पहिल्यांदा चौकशी करण्यात आली होती.

ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
MIM In Delhi Election 2025.
Delhi Election : दिल्लीतील २०२० च्या दंगलीतील आरोपी लढवणार विधानसभा, ओवैसींच्या पक्षाने दिली उमेदवारी
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Mayawati expels BSP leader Surendra Sagar
Surendra Sagar Expels : ‘बसपा’च्या नेत्याला ‘सपा’च्या आमदाराशी सोयरीक करणं पडलं भारी; मायावतींनी पक्षातून केली हकालपट्टी
devendra fadnavis vidhan sabha election bjp
BJP Victory in Vidhan Sabha: महाराष्ट्रातील निकालांमुळे भाजपासाठी काय बदललं? स्पष्ट बहुमत, युतीवर वर्चस्व की आणखी काही?
Sanjay Shirsat On grand alliance government Mahayuti Politics
Sanjay Shirsat : शिवसेनेला किती मंत्रि‍पदे मिळणार? शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “उपमुख्यमंत्रिपद अन्…”

हेही वाचा : काकांचा पत्ता कापून अखिलेश यादवांनी ब्राम्हण नेत्याला दिले विरोधी पक्षनेतेपद; कोण आहेत माता प्रसाद पांडे?

पक्षातील मुख्य चेहरा

पाठक २०१५ च्या निवडणुकीत दिल्लीत पक्षाचे सह-संयोजक होते आणि २०१७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पंजाबचे सह-प्रभारी होते. पक्षाने त्यांच्या वयाच्या आणि अनुभवाच्या पलीकडे जबाबदारी सोपवली असल्याचे अनेकांचे मत आहे. तर आपचे नेते म्हणतात की, पाठक हे एक चांगले संघटक आणि पक्षातील प्रमुख व्यक्तींपैकी एक आहेत. २०२२ मध्ये त्यांनी राजिंदरनगर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाच्या राजेश भाटिया यांचा ११ हजार मतांच्या फरकाने पराभव करून विजय मिळवला. पंजाबमधून राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आल्यावर राघव चड्ढा यांनी सोडलेल्या राजिंदरनगर विधानसभेच्या जागेवरून त्यांची उमेदवारी ‘आप’मधील अनेकांना आश्चर्यचकित करणारी होती.

पाठक यांची राजकीय पार्श्वभूमी

राजिंदरनगरमध्ये पंजाबी लोकसंख्या ३५ टक्के आहे. मतदारसंघातील गावांमध्ये जाट, यादव आणि राजपूतांची संमिश्र लोकसंख्या आहे. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये, पूर्वांचली लोकांची संख्या वाढली आहे, जे मूळचे उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील आहेत. हा पाठक यांचा समर्थक वर्ग आहे. भाटिया यांना पंजाबी मतदारांचा चांगला पाठिंबा मिळाल्याचे मानले जाते, तर पाठक यांना पूर्वांचली जनतेचा पाठिंबा असल्याचे मानले जाते. अलाहाबाद विद्यापीठातून इंग्रजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर पाठक नागरी सेवा परीक्षेच्या तयारीसाठी २०१० मध्ये दिल्लीला गेले. काही महिन्यांतच दिल्लीत अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे साक्षीदार झाले; ज्यामुळे नंतर ‘आप’ची स्थापना झाली. भ्रष्टाचारविरोधी चळवळीतून राजकारणात प्रवेश करणाऱ्या अनेक तरुणांमध्ये पाठक यांचा समावेश होता.

गेल्या काही वर्षांत पाठक यांनी ‘आप’मध्ये जोमाने काम केले. २०१३ मध्ये त्यांनी केजरीवाल यांच्यासाठी निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळली. जवळपास वर्षभरानंतर दिल्लीत पुन्हा निवडणुका झाल्यामुळे पाठक यांची दिल्लीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती करण्यात आली. त्या निवडणुकीत आपने ७० पैकी ६७ जागा जिंकल्या. त्यानंतर पंजाबमधील २०१७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी, त्यांना संजय सिंह यांच्यासोबत सह-प्रभारी करण्यात आले. “जेव्हा ते आणि संजय सिंह पंजाबमध्ये गेले (२०१७ मध्ये), तेव्हा त्यांनी संघकार्यावर आणि पक्ष बळकट करण्यावर भर दिला. याची संपूर्ण जबाबदारी दुर्गेश यांच्यावर होती. ती निवडणूक आम्ही जिंकली नसली तरी संघटनेची मुळे बळकट झाली आहेत, असे एका ज्येष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

हेही वाचा : नितीश कुमारांची नक्कल करणे आरजेडी नेत्याला पडले महाग, विधान परिषदेतील सदस्यत्व रद्द; कोण आहेत सुनील सिंह?

राजिंदरनगर पोटनिवडणूक ही पाठक यांची निवडणुकीच्या राजकारणातली पहिली चढाई नव्हतीच. त्यांनी दिल्लीतील २०२० ची निवडणूक करावल नगरमधून लढवली होती, परंतु १९९८, २००३, २००८ आणि २०१३ च्या निवडणुकीत या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भाजपाच्या मोहन सिंह बिश्त यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता.

Story img Loader