उत्तर प्रदेशमधील योगी सरकारकडून अतिक्रमणविरोधी कारवाई करताना तसेच अन्य गंभीर गुन्ह्यांमधील आरोंपीवर कारवाई करण्यासाठी बुलडझोरची मदत घेतली जात आहे. योगी सरकारकडून बुलडोझरच्या मदतीने केल्या जाणाऱ्या या कारवाईची मागील काही दिवसांपासून देशभरात चर्चा झाली. या कारवाईवर विरोधकांकडून सडकून टीका केली जात आहे. बुलडोझरद्वारे कारवाई करून गरिबांवर अन्याय केला जात आहे, असा गंभीर आरोप विरोधकांकडून केला जात आहे. दरम्यान, आज महाशिवरात्रीचे निमित्त साधून आप अर्थात आम आदमी पक्षाने उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे ‘बुलडोझर आहुती यज्ञा’चे आयोजन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>>“मला ठाऊक नव्हतं की मोदी सरकार इतकं कमकुवत…” जॉर्ज सोरोस प्रकरणावर चिदंबरम काय म्हणाले?

आम आदमी पक्षाचे नेते तथा खासदार संजय सिंह यांनी या यज्ञाचे आयोजन केले होते. या याज्ञाला आप पक्षाने बुलडोझर आहुती यज्ञ असे नाव दिले. विशेष म्हणजे या यज्ञादरम्यान प्रातिनिधिक बुलडोझरची आहुती देण्यात आली. यावेळी आपच्या नेत्यांनी उत्तर प्रदेशमधील भाजपा सरकारवर टीका केली.

‘बाबजींचा बुलडोझर हा लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत आहे. याच कारणामुळे बुलडोझर आहुती यज्ञाचे आयोजन करण्यात आले. बुलडोझर हे दहशतवाद तसेच अत्याचाराचे प्रतिक बनेलेले आहे. त्यामुळे आता आगामी काळात जनतेचा बुलडोझर सत्तेमुळे आलेला अहंकार द्ध्वस्त करणार आहे,’ असे म्हणत संजय सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे.

हेही वाचा >>> दिल्लीतील कथित उत्पादन शुल्क घोटाळा प्रकरण : मनीष सिसोदियांना पुन्हा सीबीआयचे समन्स; अडचणी वाढणार?

याआधी आप पक्षाने कानपूर देहात येथे घडलेल्या घटनेचा संदर्भ देत योगी सरकारच्या बुलडोझरद्वारे केल्या जाणाऱ्या कारवाईवर टीका केलेली आहे. योगी सरकार बुलडोझच्या मदतीने अवैधरित्या अतिक्रमणविरोधी मोहीम राबवत आहे, असा आरोप आप पक्षाने केला आहे.

दरम्यान, योगी आदित्यनाथ यांच्याकडून मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारवाया करताना बुलडोझरचा वापर केला जात आहे. याच कारणामुळे योगी आदित्यनाथ यांना बुलडोझर बाबा म्हणून संबोधले जात आहे. या कारवाईचे एका समुदायाकडून स्वागत केले जात आहे. तर दुसऱ्या समुदायाकडून या कारवाईवर टीका केली जात आहे.