हरियाणामध्ये आम आदमी पक्षाचे प्रमुख्य केजरीवाल यांनी आगामी लोकसभा निवडणूक इंडिया आघाडीबरोबर, तर विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. रविवारी जिंद येथे झालेल्या मेळाव्यात बोलताना त्यांनी यासंदर्भातील घोषणा केली. विशेष म्हणजे केजरीवालांनी घोषणा केल्याच्या एक दिवस आधी काँग्रेस नेते भूपेंदर सिंग हुड्डा यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना हरियाणात आमचा युती करण्याचा कोणताही विचार नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे केजरीवाल यांच्या विधानानंतर इंडिया आघाडीत मतभेत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.

हरिणायात लोकसभेच्या १० जागा आहेत. अशातच एप्रिल-मे महिन्यात देशभरात लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे, तर त्यानंतर ऑक्टोबरमध्ये हरियाणात विधानसभा निवडणूक होणार आहे.

Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
mayura kale
“आजवर काय केले तेही सांगत नाही अन् पुढे काय करणार ते पण बोलत नाही,” चर्चेतील टीका
mahavikas aghadi government in state was lost because of Sanjay Raut vishwajit Kadams criticism
संजय राऊतांमुळे राज्यातील आघाडीचे सरकार गेले, विश्वजित कदम यांची खोचक टीका
odi’s call for consolidation was aimed at addressing the BJP’s growing challenge in Dhule City.
Narendra Modi : धुळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘एक है तो सेफ है’चा नारा का दिला? काय आहे कारण?
yogi adityanath criticize congress and mahavikas aghadi
योगी आदित्यनाथ म्हणाले “काँग्रेस नेतृत्वातील ‘मविआ’ची नियत साफ नाही”
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”

हेही वाचा – राज्यसभेत भाजप तीन, काँग्रेस, शिंदे गट आणि अजित पवार गटाला प्रत्येकी एक जागा मिळण्याचा मार्ग मोकळा, उद्ध ठाकरे आणि शरद पवार गटाचे नुकसान

रविवारी जिंद येथील मेळाव्यात बोलताना केजरीवाल म्हणाले, आम आदमी पक्ष हरियाणातील आगामी विधानसभा निवडणुकीत संपूर्ण ९० जागांवर निवडणूक लढणार आहे. हरियाणातील लोकांना बदल हवा आहे. देशभरातील राजकारण बघता, लोकांना आता केवळ आम आदमी पक्षाकडून अपेक्षा आहेत आणि जनतेला फक्त आमच्या पक्षावर विश्वास आहे. आज आम आदमी पक्ष हा हरियाणातला सर्वात मोठा पक्ष आहे. गेल्या सहा महिन्यांत विविध पक्षातील एक लाखापेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी आमच्या पक्षात प्रवेश केला आहे.

यावेळी त्यांनी मनोहर लाल खट्टर यांच्यावर टीकाही केली. ते म्हणाले, आम्ही पंजाबमध्ये ४२ हजार तरुणांना सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत. मात्र, हरिणायातील खट्टर सरकार राज्यातील तरुणांना नोकरीसाठी इस्त्रायलमध्ये पाठवण्याची योजना आखत आहे. तिथे युद्ध सुरू असून कोणाच्याही जीवाची शाश्वती नाही. मनोहर लाल खट्टर जर तरुणांना राज्यात नोकऱ्या देऊ शकत नसतील तर त्यांनी आजच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. आम्ही त्या तरुणांना राज्यात नोकऱ्या देऊ, पण त्यांना मारण्यासाठी इस्रायलला पाठवणार नाही. पुढे बोलताना त्यांनी दिल्लीप्रमाणेच हरियाणातही मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले. हरियाणात आपचे सरकार आल्यानंतर आम्ही दिल्ली आणि पंजाबप्रमाणेच २४ तास मोफत वीज देऊ, असे ते म्हणाले.

दरम्यान, केजरीवालांच्या या विधानानंतर आम आदमी पक्षाची हरियाणात संपूर्ण जागांवर निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ असेल. यापूर्वी २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत आपने ४६ जागांवर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना ०.४८ टक्के मत मिळाली होती. मात्र, त्यांना एकाही जागेवर विजय मिळवता आला नव्हता. विशेष म्हणजे ही मते नोटाला मिळालेल्या मतांपेक्षाही कमी होती, तर आपच्या अनेक उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त करण्यात आली होती.

हेही वाचा – राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे नाराज असल्याची चर्चा; आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाची डोकेदुखी वाढणार?

याशिवाय २०१९ च्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टी (JJP) बरोबर युती केली होती. त्यांनी अंबाला, कर्नाल आणि फरिदाबाद या तीन जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र, त्यांना दोन टक्क्यांपेक्षाही कमी मते मिळाली होती.

महत्त्वाचे म्हणजे गेल्या काही दिवसांत आम आदमी पक्षाला तीन मोठे राजकीय धक्के बसले आहेत. सर्व प्रथम आपचे राष्ट्रीय सहसचिव आणि माजी आमदार निर्मल सिंग यांनी पक्षाला रामराम ठोकला, तर त्यानंतर प्रदेश उपाध्यक्षा चित्रा सरवरा आणि राज्य प्रचार समितीचे अध्यक्ष अशोक तन्वर यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली. यापैकी सिंग आणि सरवरा काँग्रेस पक्षात गेले, तर तन्वर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.