गुजरात निवडणुकीसाठी १ आणि ५ डिसेंबरला मतदान पार पडणार आहे. त्यापूर्वी भाजपा, काँग्रेस आणि आप यांच्यातील प्रचार शिगेला पोहचला आहे. यंदा गुजरात निवडणुकीत पहिल्यांदा उतरलेल्या आम आदमी पक्षावर ( आप ) काँग्रेस आणि भाजपाकडून हल्लाबोल करण्यात येत आहे. त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ‘नमूना’ म्हणत टीका केली आहे.
गुजरातमधील एका सभेला योगी आदित्यनाथ संबोधित करत होते. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी २०१६ साली पाकिस्तानमध्ये भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागितला, असा आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला. तसेच, केजरीवाल दहशतवादाचे खरे समर्थक असल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले.
हेही वाचा : अहमदाबादमधून अमित शाह नावाच्या व्यक्तीला भाजपाकडून उमेदवारी
मुख्यमंत्री केजरीवाल यांचा उल्लेख करत योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं की, “दिल्लीतून गुजरातमध्ये एक ‘नमूना’ आला असून, ते दहशतवादाचे खरे समर्थक आहे. कारण, ते अयोध्येतील राम मंदिराला विरोध करतात. भारतीय लष्कराकडून पाकिस्तानमध्ये करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागतात. शूर सैनिकांकडून पुरावे मागितले जातात का?,” असा सवाल आदित्यनाथ यांनी विचारला.
हेही वाचा : ‘भारत जोडो’ यात्रेत ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा? भाजपाचा गंभीर आरोप; काँग्रेसनेही दिलं प्रत्त्युतर
योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवरही टीका केली आहे. “काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि नेत्या प्रियांका गांधी गुजरातमध्ये प्रचार करत नाहीत. कारण, काँग्रेसने गुजरातमधील पराभव स्वीकारला आहे. काँग्रेसने कधीही सरदार वल्लभ भाई पटेल यांचा सन्मान केला नाही,” असेही योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं.