प्रदीप नणंदकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लातूर -कुटुंबातील रा. स्व. संघाच्या वातावरणामुळे लहानपणापासूनच शाखेत जाण्यास सुरुवात करणारे, महाविद्यालयीन शिक्षणाच्या भाजपशी जोडले गेलेले अभिमन्यू पवार हे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक होते. अनेक प्रकारच्या पक्षातील जबाबदाऱ्या स्वीकारत त्यांनी औसा मतदारसंघ बांधला आणि ते औसा मतदारसंघातून विजयी झाले.

अभिमन्यू पवार यांचे वडील वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते ,त्यामुळे घरात रा.स्व. संघाचे वातावरण. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते म्हणून कामास सुरुवात .बी .कॉम .,एम पी एम व डिप्लोमा इन लेबर लॉ पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले . सुमारे बारा वर्ष त्यांनी युवा मोर्चाचे काम केले .जिल्हा युवा मोर्चाचे सरचिटणीस पद, भाजपच्या लातूर शहरातील एका वार्डाचे अध्यक्ष ते शहराचे उपाध्यक्ष ,शहर सरचिटणीस अशा विविध जबाबदाऱ्या घेत प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य ही राहिले.

हेही वाचा >>>केतन नाईक : कामगार चळवळीतील नेतृत्व

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी केंद्रातून प्रभारी आलेले ओम माथूर यांचे सहयोगी म्हणून त्यांनी साडेतीन वर्ष काम केले .त्यानंतर २०१४ ते २०१९ या कालावधीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी काम केले .त्या पाच वर्षाच्या कालावधीत लातूर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा प्रश्न कसा सोडवला जाईल यासाठी त्यांनी बारकाईने लक्ष दिले. वर्षा बंगल्यावर नागपूर इतकीच लातूरची ही गर्दी असायची व लोकांची कामे मार्गी लागायचे. जलयुक्त शिवारचा विषय असेल किंवा लातूरच्या शहर पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल अशा सर्व विषयात त्यांनी स्वतः लक्ष घातले. मुख्यमंत्री सहायता निधी अधिकाधिक गरजूंपर्यंत कसा मिळेल यासाठी त्यांनी प्रयत्न केले. सामान्य कार्यकर्ते ते मुख्यमंत्री यांच्यातील आपण दुवा आहोत हे लक्षात घेऊन त्यांनी काम केले. लातूरची मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी व्हावी यासाठी मुख्यमंत्र्याकडे आग्रह धरणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. विधानसभा निवडणुकीत औसा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे त्यांनी धाडस दाखवले. दोन वेळा औशाचे आमदार राहिलेले व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष राहिलेले बसवराज पाटील मुरूमकर यांचा २८ हजार मताने पराभव करत अभिमन्यू पवार हे विजयी झाले. औसा विधानसभा मतदारसंघाच्या विक्रमी मताधिक्याने विजयी होणारा आमदार अशी अभिमन्यू पवार यांची ओळख आहे.

हेही वाचा >>>कैलास पाटील : शेतकऱ्यांच्या हितासाठी संघर्ष

आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आपल्याला लोकांनी अतिशय अपेक्षेने निवडून दिलेले आहे हे लक्षात घेऊन त्यांनी कामाचा झपाटा लावला. शेत रस्त्याचा औसा पॅटर्न निर्माण केला. गाव तेथे शेत रस्ता ही मोहीम राबवली. राज्यात शेत रस्त्याच्या बाबतीत सर्वाधिक काम केलेला विधानसभा मतदारसंघ अशी औशाची आहे. फळबाग योजना, रेशीम उद्योग अशा अनेक बाबतीत त्यांनी लक्ष घालत आपला निधी मतदारसंघाच्या योग्य विकासासाठी खर्ची घालावा यासाठी प्रयत्न केले .राज्यसभेतील खासदारांचा निधी मतदार संघाच्या विकासासाठी कसा आणता येईल यासाठीही ते प्रयत्नशील असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील कामाचा अनुभव गाठीशी असल्याने, प्रश्न सोडवण्यासाठी लागणारे कसब अभिमन्यू पवार यांच्या अंगी आहे. महाविकास आघाडीच्या काळातही असा विधानसभा मतदारसंघाला अडचण आली नाही.देवेंद्र फडणवीस आता उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे पवारांच्या कामाचा धडका सुरूच आहे. भविष्याचा वेध घेऊन काम करणारा आमदार अशी अभिमन्यू पवार यांची मतदारसंघात ओळख आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhimanyu pawar mla assembly constituency swayamsevak to mla bjp amy