तृणमूल काँग्रेसमधील नंबर ‘दोन’चे नेते अशी ओळख असलेल्या अभिषेक बॅनर्जी यांच्याकडे त्यांच्या आत्याचे म्हणजेच ममता बॅनर्जी यांचे राजकीय वारस म्हणून पाहिले जात आहे. पक्षात अभिषेक यांच्या उदयानंतर काही जेष्ठ नेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. मात्र दुसऱ्या बाजूला पक्षातील काही नेते अभिषेक यांना पक्षांतर्गत अडचणीतून बाहेर येण्यासाठी सहकार्य करत आहेत. अभिषेक यांची प्रतिमा लोकांमध्ये आणि पक्षात मजबूत करण्याचा त्या नेत्यांचा प्रयत्न आहे. या वर्षाच्या सुरुवातीला करोनाच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्यानंतर अभिषेक हे करोना व्यवस्थापनाच्या कामात सक्रिय झाले. त्यांनी त्यांच्या मतदार संघातील प्रत्येक ब्लॉक, म्युनिसिपल वॉर्ड आणि पंचायत विभागामध्ये नियंत्रण कक्षाची स्थापना केली. पाच ब्लॉक्समध्ये ‘डॉक्टर ऑन व्हील’ ही योजना कार्यान्वयीत केली. अभिषेक यांनी केलेल्या उपाययोजनेमुळे त्यांच्या मतदार संघातील करोना पॉजेटीव्ह रेट हा दोन आठवड्यांमध्ये २० टक्क्यांवरून एका टक्क्यावर आला.
अभिषेक बॅनर्जी हेच ममता बॅनर्जी यांचे राजकीय वारसदार, पुढील राजकीय प्रवास मात्र सोपा नाही
अभिषेक बॅनर्जी यांच्याकडे ममता बॅनर्जी यांचे राजकीय वारस म्हणून पाहिले जात आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-06-2022 at 18:43 IST
मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhishek banerjee is political successor of mamata banerjee but further political journey will not be so easy for him pkd