विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या तासगाव दौर्‍यामध्ये अध्यक्ष म्हणून आमंत्रित असतानाही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची अनुपस्थिती चर्चेत आली आहे. मणेराजुरी येथे आयोजित मेळाव्यास शिराळ्याचे आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांची उपस्थिती मात्र चर्चेला खतपाणी घालणारी ठरली आहे.

हेही वाचा- जुनी निवृत्ती वेतन योजना विधानपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा केंद्रबिंदू

Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
Ajit Pawar on a secret Adani Amit Shah meeting
राजकीय निर्णयात उद्योगपतींचा सहभाग नसतो!
Hadapsar, NCP, Hadapsar latest news,
हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई
Ajit Pawar Questionnise the voters of Baramati about the retirement of Sharad Pawar Pune print news
शरद पवारांंच्या निवृत्तीनंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार यांची बारामतीतील मतदारांना विचारणा
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’

तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आणि लोकनियुक्त सरपंचांचा सत्कार समारंभ मणेराजुरी येथे स्व.आर. आर. आबांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी आयोजित केला होता. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार या कार्यक्रमासाठी आवर्जुन उपस्थित होते.शुक्रवारी पूर्णवेळ ते तासगाव दौर्‍यावर होते. अंजनी व सावळज येथील कार्यक्रमानंतर सायंकाळी मणेराजुरी येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आ. जयंत पाटील यांचे नाव निश्‍चित करण्यात आले होते. मात्र, पवार यांच्या पूर्ण दौर्‍यामध्ये आ. पाटील येणार नाही, येणार याची चर्चा कार्यकर्त्यांच्यामध्ये सुरू होती. तथापि, मणेराजुरीचा कार्यक्रम संपला तरी आ. पाटील तासगावकडे फिरकले नाहीत. यामुळे त्यांच्या अनुपस्थितीचीच अधिक चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा- राजकीय खटले मागे घेण्यावरून काँग्रेस-भाजपमध्ये जुंपली

दुसर्‍या बाजूला आ. पाटील यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय बनली असताना शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांनी मात्र पवार यांच्या उपस्थितीला प्राधान्य देत कार्यक्रमास आवर्जुन उपस्थिती लावली. याशिवाय आ. सुमनताई पाटील, कवठेमहांकाळ येथील महांकाली साखर कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाशकाका पाटील यांनीही उपस्थिती लावली.

हेही वाचा- “नितीश कुमारांची ‘समाधान यात्रा’ म्हणजे लोकांना मूर्ख बनवण्याचा…”, प्रशांत किशोर यांची बोचरी टीका

गेल्या वर्षी पवार यांचा उपमुख्यमंत्री पदावर असतानाही सांगली दौर्‍याकडे. पाटील यांनी नाममात्र उपस्थिती दर्शवत अंग काढून घेतल्याचे ठळकपणे जाणवले होते. विधानसभा विरोधी पक्ष नेते पदासाठीही ते इच्छुक होते. मात्र, विधानसभा सदस्यांच्या बैठकीत पवार यांची निवड झाल्याने त्यांची नाराजी दिसून आली होती. ही नाराजी त्यांनी उघडपणे कधीही बोलून दाखवली नसली तरी त्यांची कृती बरेच काही सांगून जात असल्याचे मानले जात आहे.
अजितदादा पवार यांनी सत्ता असो वा नसो, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार घराणे कायम आबांच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील. काहींना सत्तेचा व पैशाचा माज आला असून मसल पॉवर दाखवत असून अरे ला कारे ने उत्तर द्या, मी तुमच्या पाठीशी आहे अशी ग्वाही दिली. यावेळी दमदाटीची, धमकीची भाषा आबांचे कार्यकर्ते यापुढे खपवून घेणार नाहीत, आबांच्या एखाद्या कार्यकर्त्याला हात लावाल तर रोहित पाटलांला हात लावला असे समजून उत्तर दिले जाईल,