Abu Azmi Mankhurd Shivaji Nagar Assembly election 2024 : समाजवादी पार्टी हा मूळचा उत्तर प्रदेशातला पक्ष आहे. मात्र, या पक्षानं गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातही हातपाय पसरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात त्यांना काही प्रमाणात यश मिळालं आहे. या पक्षाचे महाराष्ट्रात दोन आमदार आहेत. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी हे मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार असून, भिवंडी पूर्व मतदारसंघात रईस शेख हे सपाचे महाराष्ट्रातील दुसरे आमदार आहेत. राज्यात सपाला ओळख मिळवून देण्यात अबू आझमी यांचा मोठा वाटा आहे. मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघ हा अबू आझमी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असला तरी यंदा त्यांना त्यांच्या कारकिर्दीतील सर्वांत अवघड निवडणूक लढावी लागत आहे. कारण- त्यांच्यासमोर यंदा कडवं आव्हान उभं ठाकलं आहे. माजी मंत्री नवाब मलिक यांनी अबू आझमी यांच्यासमोर मोठं आव्हान निर्माण केलं आहे.

अबू आझमी हे १५ वर्षांपासून मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार असले तरी त्यांनी मतदारसंघात फारशी विकासकामं केली नसल्याचा येथील मतदारांचा, प्रामुख्याने मानखुर्दकरांचा सूर आहे. मानखुर्द-शिवाजीनगर हा मतदारसंघ मुंबईतील सर्वांत अविकसित मतदारसंघांपैकी एक म्हणून ओळखला जातो. शिवाजीनगरमधील तरुणाईला अमली पदार्थांचा विळखा बसला आहे. या मतदारसंघात अमली पदार्थांची तस्करी होत असल्याच्या काही घटना अलीकडच्या काळात समोर आल्या होत्या. नवाब मलिक यांनी हा मुद्दा धरून जोरदार प्रचार केल्याचं पाहायला मिळालं.

लक्षवेधी लढत : यशोमती ठाकूर यांच्यासमोर भाजपचे आव्हान
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
maharashtra assembly election 2024 narahari jhirwal vs sunita charoskar dindori assembly constituency
लक्षवेधी लढत : झिरवळ सलग तिसऱ्या विजयाच्या प्रयत्नात
Murbad , Kisan Kathore, Subhash Pawar,
मुरबाडच्या ‘कुणबी’ लढतीत आगरी अस्मिताही महत्वाची, लोकसभेनंतर ग्रामीण पट्ट्यात पुन्हा जातीय समिकरणांना वेग
amit shah remark on muslim reservation in ghatkopar
मुस्लिमांना आरक्षण मिळू देणार नाही; केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे परखड प्रतिपादन
Afghanistan Batter Rahmanullah Gurbaj Surpasses Virat Kohli in Youngest to 8 Hundreds in Mens ODI Equals Sachin Tendulkar Record
AFG vs BAN: अफगाणिस्तानच्या फलंदाजाची ऐतिहासिक कामगिरी, विराट कोहलीला मागे टाकलं तर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची केली बरोबरी
Ramesh Chennithala
Ramesh Chennithala : “हरियाणाच्या निवडणुकीतून खूप शिकायला मिळालं, त्यामुळे ८० टक्के बंडखोरांनी…”, रमेश चेन्निथला यांचं महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत मोठं भाष्य
maharashtra vidhan sabha election 2024 congress leaders fails to get rebels to withdraw from pune seats
महाविकास आघाडीच्या या जागा धोक्यात, हे आहे कारण ! बंडखोरांना शांत करण्यात काँग्रेस नेत्यांना अपयश

हे ही वाचा >> बुलढाणा जिल्ह्यात युती विरुद्ध आघाडीत थेट सामना, सिंदखेडराजात लक्षवेधी मैत्रीपूर्ण लढत

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील एका व्यक्तीला पळून जण्यासाठी विमान तिकिटाची व्यवस्था केल्याच्या आरोपाखाली अबू आझमी यांना टाडा कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. आझमी यांनी दोन वर्षं तुरुंगात काढल्यानंतर या खटल्यातून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यानंतर सपाचे संस्थापक, अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी मुंबईतील उत्तर भारतीय सुमदायातील अबू आझी यांची वाढती लोकप्रियता पाहून, त्यांना समाजवादी पार्टीत प्रवेश दिला आणि १९९५ मध्ये पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केली.

अबू आझमींमुळे सपाची महाराष्ट्रात वाताहत?

१९९५ मध्ये सपाने अबू आझमी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात विधानसभेच्या तीन जागा जिंकल्या. मात्र, त्या सर्व आमदारांनी नंतर सपाला राम राम करीत इतर पक्षांमध्ये प्रवेश केला. अबू आझमी यांच्या हुकूमशाही कारभारामुळे पक्ष सोडत असल्याचं या आमदारांनी तेव्हा सांगितलं होतं. अबू आझमींबरोबर काम करणं कठीण आहे. ते खूप उद्धट असून, कोणताही स्वाभिमानी माणूस त्यांच्याबरोबर काम करू शकत नाही. त्यांच्याकडून होणारा अपमान सहन करू शकत नाही, असं या आमदारांनी तेव्हा सांगितलं होतं. पक्षाची वाताहत होत असतानाही अबू आझमी यांनी मुलायम सिंह यादव यांच्याशी असलेले संबंध व्यवस्थित सांभाळले.

हे ही वाचा >> महायुतीसमोर कुणाचं आव्हान? मनसेचा उल्लेख करत विनोद तावडेंनी केले मोठे विधान

मनसेबरोबर संघर्ष

२००२ मध्ये पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवलं. तसेच २००४ मध्ये ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले. मात्र, शिवसेनेच्या योगेश पाटील यांनी त्यांना ३० हजार मतांनी पराभूत केलं होतं. २००९ मध्ये त्यांनी जोरदार पुनरागमन केलं. त्यांनी एकाच वेळी मानखुर्द-शिवाजीनगर व भिवंडी या दोन जागा जिंकल्या. मात्र, आमदार म्हणून निवडून आलेले आझमी विधान भवनात हिंदी भाषेत शपथ घेत होते. त्यामुळे मनसेच्या आमदारांनी त्यांच्या कानशिलात लगावली होती. त्यामुळे ते देशभरात चर्चेत आले होते.

हे ही वाचा >> Eknath Khadse Political Retirement : एकनाथ खडसे यांचे राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत

बालेकिल्ला मजबूत, पण आव्हान तगडं

उत्तर भारतीयांना आकृष्ट करेल अशी वक्तृत्व शैली व चिथावणीखोर भाषणं यांमुळे ते उत्तर भारतीय व मुस्लीम मतदारांमध्ये लोकप्रिय होत गेले. ते राज्यातील उत्तर भारतीय मतदारांचं प्रतिनिधित्व करताना दिसतात. मानखुर्द-शिवाजीनगरमधील लाखो स्थलांतरित मतदारांच्या जीवावर त्यांनी आजवर निवडणुका जिंकल्या आहेत. मात्र, यावेळी त्यांचा सामना नवाब मलिक यांच्याशी होणार आहे. तसेच गेल्या चार-पाच वर्षांमध्ये ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल ????मुस्लिममीन??? पक्षानेदेखील या मतदारसंघात हातपाय पसरले आहेत. एआयएमआयएमने यांदाच्या निवडणुकीत एका तरुण व स्थानिक उमेदवारांना संधी दिली आहे. अतिक अहमद खान असं त्या उमेदवाराचं नाव असून, अतिक यांनी जोरदार प्रचार केला आहे. अतिक मतदारसंघातील रहिवासी आहेत. तर, अबू आझमी मतदारसंघात राहत नसल्यामुळे त्यांच्यापेक्षा मी मतदारांना अधिक जवळ असल्याचं अतिक यांचं म्हणणं आहे. त्यामुळे अबू आझमी यांच्यासमोर दोन मोठी आव्हानं उभी ठाकली आहेत.