देवेश गोंडाणे

नागपूर : शिक्षण क्षेत्रातील विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात पराभव झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष व संलग्न संघटनांची या क्षेत्रावरील पकड कमी झाली आहे, असे चित्र निर्माण झाले असतानाच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत पदवीधरांच्या गटात दहापैकी नऊ जागा भाजपशी संलग्नित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने जिंकून शिक्षण क्षेत्रावरील आपली पकड अजूनही भक्कम आहे हे दाखवून दिले. या विजयामुळे विद्यापीठाच्या सर्व प्राधिकरणांवर उजव्या विचाराच्या संघटनांनी वर्चस्व कायम केले आहे.

maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
bjp leader shivray Kulkarni
भाजपचे नाव घेणाऱ्यांनी गल्लीबोळात भाजपविरोधात बैठकी…भाजप प्रवक्त्यांच्या आरोपामुळे…
dcm devendra fadnavis praise obc community
भाजपच ओबीसींच्या पाठीशी!, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
BJP counter meeting outside the Jammu and Kashmir Legislative Assembly
जम्मू-काश्मीर विधानसभेबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; मार्शलच्या सहाय्याने सभागृहाबाहेर काढल्यानंतर पाऊल
batenge to katenge bjp vs congress
भाजपच्या ‘बटेंगे’ला काँग्रेसचे ‘जुडेंगे’
Action against rebels, rebels Akola Rural,
बंडखोरांवर कारवाईचा बडगा, अकोला ग्रामीण राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निलंबित
maharashtra assembly election 2024, Amravati District,
अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडी, महायुतीसमोर अस्तित्व राखण्‍याचे आव्‍हान

नागपूर विद्यापीठाचे कार्यक्षेत्र हे नागपूर, गोंदिया, भंडारा आणि वर्धा या चार जिल्ह्यांमध्ये आहे. विद्यापीठातून शिक्षण घेतलेले नोंदणीकृत पदवीधर अधिसभेच्या दहा जागांसाठी मतदान करू शकतात. हेच मतदार विधानपरिषदेच्या पदवीधर निवडणुकीमध्येही मतदार असतात. त्यामुळे अधिसभेत विजय मिळवणारा पुढे पदवीधर मतदारासंघासाठी दावेदार ठरतो. महाविकास आघाडीमधून निवडून आलेले आमदार ॲड. अभिजीत वंजारी यांचा राजकीय प्रवासही विद्यापीठाच्या राजकारणातून झाला. तसेच शिक्षक मतदारसंघामध्ये शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या राजकारणात सक्रिय असणाऱ्यांना पुढे संधी मिळते. त्यामुळे विद्यापीठातील विविध प्राधिकरणांची निवडणूक ही पुढील राजकारणाची पायरी समजली जाते. त्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची मानली जाते. भाजप, काँग्रेसह इतरही प्रमुख राजकीय पक्ष या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या सहभागी होत असतात.

हेही वाचा… राज ठाकरे यांना सूर तर सापडला…..

मागील काही वर्षांपासून विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघावर भाजपचा पगडा होता. परंतु, महाविकास आघाडीने या दोन्ही जागा जिंकून भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले. त्यामुळे भाजपचा शिक्षण क्षेत्रातील दबदबा काहीसा कमी झाला की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. मात्र, विद्यापीठातील १० पैकी ९ जागांवर भाजप परिवारातील अभाविपने विजय मिळवत त्यांची शिक्षण क्षेत्रावरील पकड अजूनही घट्ट असल्याचे सिद्ध केले. विशेष म्हणजे, या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयाच्या जवळही पोहचता आले नाही. त्यामुळे विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीला विजयी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे आमदार ॲड. अभिजित वंजारी आणि डॉ. बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वावर प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा… रायगडात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सुरेश लाड पुन्हा नाराज?

विद्यापीठातील अधिसभेच्या शिक्षक, प्राचार्य आणि संस्थाचालक प्रवर्गाच्या निवडणुका नोव्हेंबर २०२२ मध्ये झाल्या. भाजप परिवारातील शिक्षण मंच या निवडणुका लढवतो. चार महिन्यांआधी झालेल्या अधिसभेच्या या निवडणुकांमध्येही शिक्षण मंचाने महाविकास आघाडीला धक्का दिला होता. शिक्षण मंचाने विद्यापीठ शिक्षक प्रवर्ग वगळता इतर सर्वच प्रवर्गात अधिकाधिक उमेदवार निवडून आणत वर्षांनुवर्षे राज्य करणाऱ्या ॲड. वंजारी यांचे सेक्युलर पॅनल आणि डॉ. तायवाडेंच्या यंग टीचर्स असोसिएशनचे वर्चस्व संपुष्टात आणले. नुकत्याच झालेल्या अभ्यास मंडळाच्या निवडणुकांमध्येही शिक्षण मंचाचा वरचष्मा आहे. या निवडणुकांचा अनुभव लक्षात घेता महाविकास आघाडीने पदवीधरच्या निवडणुकांवर विशेष लक्ष केंद्रित केले होते. ॲड. वंजारी आणि डॉ. तायवाडे प्रत्यक्ष मैदानात उतरले होते. मात्र, निवडणुकीत भाजप आणि अभाविपचे संघटन कौशल्य भारी पडले. अभाविपने शिक्षण क्षेत्रामध्ये आजही त्यांचे वर्चस्व असल्याचे दाखवून दिले.