नाशिक : विधानसभा निवडणुकीची लगबग सुरु असतानाच शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) जिल्हाप्रमुख तथा महाविकास आघाडीचे नाशिक पश्चिम मतदारसंघातील संभाव्य उमेदवार सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपकसह सात जणांवर मोक्कातंर्गत कारवाई करण्यात आली. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत मुलावर झालेल्या या कारवाईमुळे बडगुजर यांच्या राजकीय अडचणीत भर पडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुमारे दोन वर्षांपूर्वी अंबड पोलीस ठाण्यात दाखल ॲड. प्रशांत जाधव यांच्यावरील गोळीबाराच्या गुन्ह्यात दीपक बडगुजरवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील सात संशयितांपैकी सहा जणांना अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे. १४ फेब्रुवारी २०२२ रोजी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात पोलिसांना सर्व संशयित मयूर बेद याच्या नेतृत्वाखालील एका संघटित गुन्हेगारी टोळीचे सदस्य असल्याचे आढळून आले. ही टोळी अनेक वर्षांपासून शहरात सक्रिय असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

प्रशांत जाधववर गोळीबार करण्याचे कृत्य या टोळीने आर्थिक फायद्यासाठी आणि दहशत निर्माण करण्यासाठी केले होते. या टोळीने हे कृत्य दीपक बडगुजरने सुपारी दिल्याने केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर, शहर पोलीस आयुक्त संदीप कार्णिक यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्गत दीपक बडगुजरवर मोक्का अंतर्गत कारवाई केली असून तो फरार आहे.

हे ही वाचा… पाथरीच्या उमेदवारीसाठी महायुतीत कडवी स्पर्धा

या कारवाईमुळे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या राजकीय अडचणी वाढण्याची शक्यता आहे. बडगुजर हे ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असून नाशिक पश्चिम मतदारसंघातून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action taken against the son of a nashik west assembly shiv sena potential candidate sudhakar badgujar print politics news asj