जळगाव जामोद: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत आज चित्रपट अभिनेते अमोल पालेकर सहभागी झाले. ते भेंडवळ ते जळगाव जामोद दरम्यान चालले. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सहभागी झाल्या होत्या. हा महाराष्ट्रातील यात्रेचा शेवटचा टप्पा आहे.
भारत जोडो यात्रेमध्ये आतापर्यंत समाजातील विविध घटकांमधील लोकांनी सहभाग घेऊन आपला पाठिंबा दर्शवला आहे.
हेही वाचा: नक्षलवाद ते अहिंसावाद असा प्रवास करणा-या आमदार सीताक्का भारत जोडो यात्रेत
त्याचबरोबर लेखक, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते यांनी राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली आहे. भारत जोडो यात्रेत आतापर्यंत अभिनेत्री रिया सेन, पूजा भट्ट सहभागी झाल्या आहेत. राहुल गांधी यांनी ट्विट करून त्यांना धन्यवाद दिले. देशाप्रती आपली जबाबदारी समजून ती पार पाडण्यासाठी पालेकर त्यांचा पत्नी सह यात्रेत सहभागी झाले, असे राहुलने ट्विट केले.