लोकसभा आणि ओडिशा विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने ओडिशातील सत्ताधारी बिजू जनता दलाला मोठा धक्का दिला आहे. केंद्रपारा येथील लोकसभा खासदार आणि बीजेडीचा राजीनामा देणारे अभिनेते अनुभव मोहंती यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. चार वर्षांपासून पक्षात गुदमरल्यासारखे वाटत होते, असंही बीजेडी सोडताना मोहंती म्हणालेत. यापूर्वी शनिवारी अनुभव मोहंती आणि दोन माजी आमदारांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. चार वर्षांहून अधिक काळ बीजेडीशी जोडलेला आहे आणि आता गुदमरल्यासारखे वाटत होते. २०१४ मध्ये सर्वात तरुण राज्यसभा सदस्य बनलेले मोहंती २०१९ मध्ये केंद्रपारा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आलेत. त्यांनी नवी दिल्ली येथे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे त्यांना पक्षात येण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. २०१९ मध्ये मोहंती यांनी ओडिशातील भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बैजयंत (जय) पांडा यांचा केंद्रपारा येथून १.५३ लाख मतांनी पराभव केला. पांडा यांना भाजपाने या जागेवरून उमेदवारी दिली आहे, तर मोहंती आता विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. दुसरीकडे बीजेडीने माजी आमदार राहिलेले अंशुमन मोहंती यांना लोकसभेचे उमेदवार घोषित केले आहे. जे अलीकडेच काँग्रेसमधून बाहेर पडले आहेत.
अभिनेते आणि खासदार अनुभव मोहंती आता भाजपाच्या मंचावर
२०१९ मध्ये मोहंती यांनी ओडिशातील भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बैजयंत (जय) पांडा यांचा केंद्रपारा येथून १.५३ लाख मतांनी पराभव केला. पांडा यांना भाजपाने या जागेवरून उमेदवारी दिली आहे, तर मोहंती आता विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
Written by पॉलिटिकल न्यूज डेस्क
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 04-04-2024 at 11:29 IST
TOPICSनवीन पटनाईकNaveen Patnaikभारतीय जनता पार्टीBJPराजकारणPoliticsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election
मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor and mp anubhav mohanty now on bjp platform vrd