परभणी : पक्षफुटीनंतर झालेली पडझड, आधीच्या महायुतीचा मोडलेला संसार, तब्बल ३५ वर्षानंतर धनुष्यबाणाशिवाय झालेली परभणीतली निवडणूक, भाजपने लावलेली प्रचंड ताकद अशा सगळ्या गोष्टींवर मात करत खासदार संजय जाधव यांनी तिसऱ्यांदा विजय संपादन केला. परभणी मतदारसंघ उद्धव ठाकरे यांच्याच शिवसेनेचा निर्विवाद बालेकिल्ला असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले.

परभणीत महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांनी महायुतीच्या महादेव जानकर यांच्या विरोधात एक लाख ३५ हजाराचे मताधिक्य घेऊन विजय मिळवला. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून खासदार जाधव यांच्या विरोधात राजेश विटेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचे सुरुवातीला निश्चित झाले होते. विटेकर कामालाही लागले होते मात्र ऐनवेळी रासपच्या महादेव जानकर यांची ‘एन्ट्री’ झाली. जानकर यांच्या अनुषंगाने स्थानिक विरुद्ध बाहेरचे असा वादही झाला पण जानकरांच्या दिमतीला महायुतीचे डझनभर स्थानिक नेते कामाला लागले. शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे परंपरागत चिन्ह परभणीत नसल्याने हिंदुत्ववादी मते आपणासच मिळतील यावर महायुतीचे नेते निर्धास्त होते. केंद्रीयमंत्री भागवत कराड यांनी तीन-चार दिवस तळ ठोकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या निमित्ताने झालेले मोठे शक्तीप्रदर्शन, महायुतीच्या तिन्ही पक्षांकडून पुरविण्यात आलेली विपुल ‘रसद’ असे सगळे असतानाही जानकर यांचा परभणीत पराभव झाला.

bhaskar jadhav and uday samant
Uday Samant : “शिवसेनेची काँग्रेस झालीय”, भास्कर जाधवांच्या विधानावर उदय सामंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मोठ्या नेतृत्त्वाचं…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Anil Deshmukh criticized BJP and amit shah
बोलघेवडेपणा करू नका!अमित शहा यांच्या नेत्यांना कानपिचक्या
MVA rift grows as Shiv Sena ubt announces independent poll strategy
महाविकास आघाडीत धुसफुस; शिवसेनेच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीचीही स्वतंत्र लढण्याची तयारी
Image Of MVA
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या स्वबळाच्या भूमिकेमागे नेमकी कारणं काय?
santosh deshmukh latest news in marathi
‘‘संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी द्या”, वाशीममध्ये सर्वपक्षीय मोर्चात मूक आक्रोश
Sanjay Shirsat On Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : महाविकास आघाडी तुटणार? संजय शिरसाटांचा मोठा दावा; म्हणाले, ‘शरद पवारांचा गट लवकरच सत्तेत…’
Akola Municipal Corporation Election news in marathi
अकोला महापालिकेतील ‘प्रशासक राज’ केव्हा संपणार?; संभाव्य निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी, वर्चस्व राखण्याचे भाजपपुढे आव्हान

आणखी वाचा-निवडणुकीतील अपयशानंतर पश्चिम बंगाल भाजपाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; कारण काय?

ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षण आंदोलनाची तीव्रता मोठी होती. या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे गाव अंतरवाली सराटी हे परभणी लोकसभा मतदारसंघात येते. जानकर यांना परभणीतून रिंगणात उतरवून ‘मराठा’ विरुद्ध ‘ओबीसी’ ध्रुवीकरणाचाही प्रयत्न झाला. सर्व ओबीसींना एकत्रित करून त्यात भाजपचा परंपरागत मतदार मिळवला तर विजयाची बेरीज सहजपणे होईल असे महायुतीच्या नेत्यांना वाटले. प्रत्यक्षात या मतदारसंघातला मराठा समाज पूर्णपणे महाविकास आघाडीच्या बाजूने वळला. सत्ताधाऱ्यांविरुद्धची टोकाची नाराजी होतीच तिला आणखी धार आली. महायुतीच्या स्थानिक नेत्यांनी ‘मराठा’ विरुद्ध ‘ओबीसी’ अशी फाळणी करून ओबीसींना आपलेसे करण्यावर भर दिला. यात मराठा समाज महायुतीपासून पूर्णपणे तुटला. राजकीय सभांमधून मराठा नेत्यांची उपस्थिती दिसायची पण प्रत्यक्षात समाजाने मात्र पाठ फिरवली.

मराठा मतदार एकवटलेला असताना पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा परभणीत पार पडली.उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा ‘नकली शिवसेना’ असा उल्लेख त्यांनी केला. या सभेत त्यांनी निजाम, रझाकारी असे संदर्भ देत धार्मिक ध्रुवीकरणाला फोडणी दिली. जो मुस्लिम समाज आजवर परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या विरोधात कौल द्यायचा त्याच मुस्लिम समाजाने मोदी यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला. एकट्या परभणी विधानसभेत खासदार जाधव यांना ४० हजाराचे मताधिक्य मिळाले यावरून मुस्लिम मतांचा कानोसा लक्षात येऊ शकतो.

आणखी वाचा-तृणमूल, उबाठा सत्तास्थापनेसाठी आग्रही, काँग्रेसची सावध भूमिका; चंद्राबाबू नायडू, कुमार इंडिया आघाडीत येणार?

मराठा मतांचे विभाजन करण्यासाठी भाजपच्या वतीने काही उमेदवारांना रसद पुरवण्यात आली. मराठा मतांमध्ये विभाजन झाले तर विजय सोपा जाईल अशी महायुतीच्या नेत्यांनी केलेली आखणी कागदावरच राहिली. प्रत्यक्षात या निर्णयाचा कवडीचाही फायदा झाला नाही. विभाजनासाठी उभे राहिलेल्या उमेदवारांना मतदारांनी साफ नाकारले. मराठा मतांचा रेटाच एवढा जबरदस्त होता की मराठाबहुल गावांमध्ये भाजपचे स्थानिक नेतेही जाईनासे झाले. मराठा मतांची एकजूट आणि त्याला मुस्लिम मतदारांची मिळालेली जोड यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार जाधव यांचा विजय सुकर झाला.

३५ ते ४० हजाराच्या मताधिक्याने निवडून येणार असे जानकर सांगत होते तर माझे मताधिक्य लाखाच्या पुढचे असेल असा आत्मविश्वास खासदार जाधव यांनी मतदानानंतर व्यक्त केला, तो तंतोतंत उतरला. १९८९ पासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला परभणी हा मतदार संघ चिन्ह बदलानंतरही उद्धव ठाकरे यांच्या सेनेने कायम ठेवला. जानकर यांना केवळ गंगाखेड विधानसभा मतदारसंघात निसटते मताधिक्य मिळाले. उर्वरित पाचही विधानसभा मतदारसंघात खासदार जाधव यांनीच मताधिक्य घेतले. जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर, परतुरचे आमदार बबन लोणीकर या दोन्ही भाजप आमदारांच्या कार्यक्षेत्रात जाधव यांनी मताधिक्य घेऊन आपला प्रभाव दाखवून दिला. परभणी लोकसभा मतदारसंघ हा गेल्या साडेतीन दशकांपासून शिवसेनेचा गड राहिलेला आहे सलग तिसऱ्यांदा निवडून येत खासदार जाधव यांनी तो अभेद्य राखला.

Story img Loader