पश्चिम बंगालमधील काँग्रेसची अवस्था फारच बिकट आहे. विशेषकरून लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने अत्यंत सुमार कामगिरी केल्यामुळे राज्यातील काँग्रेसचे आव्हान जवळपास संपुष्टात आल्यात जमा आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, हा राजीनामा सोपविल्यानंतर काही तासांतच अधीर रंजन चौधरी यांनी आपल्या समाजमाध्यम खात्यावरून तृणमूल काँग्रेसवर आगपाखड करणाऱ्या काही पोस्ट्स केल्या आहेत. अधीर रंजन चौधरी यांनी मंगळवारी रात्री केलेल्या या पोस्ट्समध्ये म्हटले आहे, “तृणमूल काँग्रेसकडून रात्रंदिवस हल्ले झेलत असलेल्या आमच्या कार्यकर्त्यांसाठी मी बोललो नाही, तर मग कोण बोलणार?” पुढे त्यांनी म्हटले, “दररोज सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाकडून आमचा पक्ष तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इंडिया आघाडीचा भाग असूनही आमच्यावर हल्ले आणि अत्याचार करण्याचे त्यांचे प्रयत्न थांबलेले नाहीत. अगदी आजही आमच्या कार्यकर्त्यांना चुकीच्या खटल्यांमध्ये गोवण्यात आले असून, तुरुंगात डांबण्यात आले आहे आणि दुसऱ्या बाजूला आमची पक्षकार्यालये हिसकावून घेतली जात आहेत. जर मी शांत बसलो, तर तो आमच्या पक्षकार्यकर्त्यांवर अन्याय ठरेल.”

हेही वाचा : संघकार्यावरील आक्षेप असंविधानिक; राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांचे मत

rss bjp tussle ends maharashtra vidhan sabha election 2024
वादावर पडदा, RSS भाजपासाठी मैदानात; विधानसभेसाठी यंत्रणा कार्यान्वित!
maharashtra assembly elections
२०१९ च्या त्या बैठकीत काय घडलं? कथित सत्तांतर…
Vidhan Sabha Election 2024 Emphasis on Cinematic Propaganda through Social Media by all Parties print politics news
निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय प्रचाराची ‘संगीत’ खुर्ची; सर्वच पक्षांकडून समाजमाध्यमातून ‘सिनेमॅटिक’ प्रचारावर भर
Ashok Uike, Vasant Purke
राळेगावमध्ये भाजपचा अतिआत्मविश्वास काँग्रेसच्या पथ्यावर ! दोन माजी मंत्र्यांमध्ये थेट लढत
Arvi Constituency, Amar Kale Wife Mayura Kale,
आर्वीत उमेदवार पत्नीसाठी पती, तर उमेदवार पतीसाठी पत्नी मैदानात
Kalpana Soren electoral campaign
Kalpana Soren: झारखंड विधानसभा निवडणुकीत कल्पना सोरेन यांची हवा; महिलांसाठीच्या योजना गेमचेंजर ठरणार?
Narendra Modi and Rahul Gandhi Chimur, Chimur,
पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्या चिमुरातील सभेची मतदारांमध्ये तुलनात्मक चर्चा
Dhamangaon Constituency, Dhamangaon Constituency BJP Congress , Dhamangaon, Dhamangaon BJP news,
धामणगावात भाजप, काँग्रेसमध्‍ये वर्चस्‍वाची लढाई
Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?

काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस पार्टी राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीचा भाग असूनही लोकसभा निवडणुकीमध्ये पश्चिम बंगालमध्ये हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले आहेत. काँग्रेसमधील पक्षश्रेष्ठींना असे वाटते की, लोकसभा निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांमध्ये सुयोग्य वाटाघाटी होऊन युती न झाल्याचा परिपाक म्हणून अधीर रंजन चौधरी तृणमूल काँग्रेसवर आणि विशेषकरून ममता बॅनर्जींवर आगपाखड करीत आहेत. काँग्रेसमधील सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, चौधरी पदावरून पायउतार झाल्यानंतर आता पक्षाकडून तृणमूल काँग्रेसबरोबरच्या युतीबाबत पुनर्विचार केला जाईल.

पक्षाला सध्या पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्षपदासाठी एका चांगल्या नेतृत्वाची गरज आहे. त्यासाठी पक्षाकडून जवळपास २५ नेत्यांबरोबर चर्चा सुरू केली आहे. अधीर रंजन चौधरी यांनी आपल्या पोस्ट्समधून यावरही टीका केली आहे. त्यांनी काही व्हिडीओ पोस्ट करीत म्हटले आहे, “पक्षाचा झेंडा हातात घेऊन रस्त्यावर उतरून रात्रंदिवस झगडणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांच्या भेटीही पक्षश्रेष्ठींनी घेतल्या पाहिजेत. त्यांचीही मते ऐकून घेतली पाहिजेत. त्यांनाही दिल्लीला बोलवून घेतले पाहिजे.” आपण अन्यायाशी तडजोड करू शकत नाही, असेही ते म्हणाले. प्रसारमाध्यमांशी बोलतानाचे काही व्हिडीओ चौधरी यांनी शेअर केले आहेत. त्यांनी राजीनामा सादर केल्याचा दावा पक्षाने केला आहे. हे व्हिडीओ शेअर करून पक्षाच्या या दाव्यामुळे आपण आश्चर्यचकित झाल्याचे त्यांनी सूचित केले. दिल्लीतील बैठकीत काँग्रेसच्या एका नेत्याने त्यांची ओळख ‘माजी’ प्रदेशाध्यक्ष म्हणून करून दिल्याने त्यांना अधिकच धक्का बसला.

हेही वाचा : मुस्लीम कट्टरपंथी ते कावड सेवक; उत्तर प्रदेशच्या राजकारणातील प्रमुख चेहरा, कोण आहेत इम्रान मसूद?

याबाबत बोलताना अधीर रंजन चौधरी म्हणाले, “मला हे पुरेसे स्पष्ट केले पाहिजे. जेव्हा मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षाचे अध्यक्षपद हातात घेतले तेव्हापासून सगळ्याच गोष्टी तात्पुरत्या स्वरूपाच्या झाल्या. पक्षातील समित्या व प्रदेशाध्यक्ष पदेही तात्पुरती झाली. कारण- पक्षाचा अध्यक्ष नव्या समित्या आणि पदे नव्याने भरत असतो. हे पक्षाच्या घटनेतच नमूद आहे.” पुढे अधीर रंजन चौधरी म्हणाले की, केवळ या संदर्भातच त्यांचे पद ‘तात्पुरते’ ठरवले जाऊ शकते. ममतांच्या विरोधात टीकास्त्र डागण्यावरून मल्लिकार्जुन खरगे यांनी निवडणुकीच्या वेळी त्यांना जाहीरपणे दटावले होते. त्याबद्दल चौधरी म्हणाले, “निवडणुकीच्या आधी मी माझ्या पक्षाला हे स्पष्टपणे सांगितले होते की, तृणमूल काँग्रेसबरोबरच्या वाटाघाटीच्या चर्चेत मला सामील करून घेऊ नका. ममता बॅनर्जींना सत्तेत बसविण्यासाठी काँग्रेसनेच एकदा मदत केली आहे. २००९ मध्ये जेव्हा प्रणब मुखर्जी मुर्शिदाबादमधून लढत होते, तेव्हा ममता बॅनर्जी यांनी त्यांचा प्रचार केला होता आणि मीही त्या मंचावर होतो. मात्र, २०११ साली ममता बॅनर्जी सत्तेवर आल्यापासून सगळेच चित्र पालटले आहे. तेव्हापासूनच ममता बॅनर्जींनी काँग्रेस पक्षाला नेस्तनाबूत करण्याचेच प्रयत्न चालवले आहेत. आमचे आमदार, पंचायत सदस्य, जिल्हा परिषद सगळे काही हिसकावून घेण्यास सुरुवात झाली. मला हे कळत नाही की, मी जे बोललो त्यामध्ये गैर काय आहे?” पुढे ते म्हणाले, “जेव्हा राज्यातील निवडणुकीचे निकाल खराब आले तेव्हा इतर प्रदेशाध्यक्षांप्रमाणेच मीही पक्षश्रेष्ठींना म्हणालो की, तुमची इच्छा असेल, तर तुम्ही मला पदावरून दूर करू शकता. मात्र, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस मिर साहेब यांनी माझा उल्लेख ‘माजी प्रदेशाध्यक्ष’ केल्यानंतर मला धक्का बसला. मी त्यांना प्रश्न विचारू शकत नाही. कदाचित पक्षाने प्रदेशाध्यक्षपदासाठी नव्या व्यक्तीचा विचार केला असेल.” अधीर रंजन चौधरी हे पश्चिम बंगालमधील बहरामपूर लोकसभा मतदारसंघाचे पाच वेळा खासदार राहिलेले आहेत. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणने तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर लढत देऊन, त्यांचा पराभव केला आहे. मागील लोकसभेमध्ये अधीर रंजन चौधरी हे काँग्रेसचे सभागृहनेते म्हणून प्रमुख चेहऱ्यांपैकी एक होते.