Shrivardhan Vidhan Sabha Election 2024 अलिबाग : श्रीवर्धन मतदारसंघ हा पूर्वी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. मात्र सुनील तटकरे यांनी या शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला आणि राष्ट्रवादीची पकड मजबूत केली. सलग तीन वेळा तीन तटकरे मतदारसंघाचे आमदार बनले. आदिती तटकरे यांनी मतदारसंघाची बांधणी केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मतदारसंघ सोपा असला, तरी बदलती राजकीय समीकरणे आणि बहुजन व मुस्लीम मतांचे होणारे ध्रुवीकरण थोपविण्याचे आव्हान महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरें यांच्यासमोर आहे.

श्रीवर्धन, तळा, म्हसळा, माणगाव आणि रोहा तालुक्यातील काही भाग मिळून श्रीवर्धनचा मतदारसंघ तयार होतो. पूर्वी काँग्रेस, शेकाप आणि शिवसेना हे या मतदारसंघातील प्रमुख पक्ष ओळखले जायचे. मात्र मतदारसंघ पुनर्रचनेत माणगाव मतदारसंघ रद्द झाल्याने श्रीवर्धन मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्यांदा दावा सांगितला. यानंतर या मतदारसंघातील काँग्रेस पक्षाला उतरती कळा लागली. शेकाप आणि शिवसेनेची ताकद क्षीण होत गेली. जिल्हा परिषद आणि राज्यातील सत्तेच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेसने मतदारसंघावर आपली पकड घट्ट केली.

Hemlata Patil
Hemlata Patil : काँग्रेसला मोठा धक्का? ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रवक्त्या डॉ.हेमलता पाटील पक्ष सोडणार?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
bhaskar jadhav and uday samant
Uday Samant : “शिवसेनेची काँग्रेस झालीय”, भास्कर जाधवांच्या विधानावर उदय सामंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मोठ्या नेतृत्त्वाचं…”
shetkari kamgar paksh break in alibaug
मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; अलिबागमधील ‘शेकाप’च्या पाटील कुटुंबात फूट
Babasaheb Ambedkar Marathwada University ,
नामविस्तारानंतर आंबेडकरी चळवळीची वाढ खुंटलेली कशी?
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
Party-wide campaign against Jayant Patil allegation by state spokesperson Praveen Kunte-Patil
जयंत पाटील विरुद्ध राजकीय विरोधकांकडून मोहीम
MVA rift grows as Shiv Sena ubt announces independent poll strategy
महाविकास आघाडीत धुसफुस; शिवसेनेच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीचीही स्वतंत्र लढण्याची तयारी

हेही वाचा >>> संजयकाका पाटील हे शरद पवार यांच्या भेटीला; सांगलीच्या राजकीय क्षेत्रात तर्कवितर्क

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा याचीच प्रचीती आली आहे. श्रीवर्धन मतदारसंघातून महायुतीकडून निवडणूक लढविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेच्या सुनील तटकरे यांना २९ हजारांचे मताधिक्य मिळाले. तटकरे यांना ८६ हजार ९०२ तर शिवसेना उबाठा गटाच्या अनंत गीते यांना ५७ हजार ०३० मते पडली. गीते यांना पडलेल्या मतांमध्ये मुस्लीम आणि बहुजन मतांचा मोठा वाटा होता.

श्रीवर्धनमध्ये अल्पसंख्याक समाजाची मते मोठ्या प्रमाणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने महायुतीत प्रवेश केल्याने मतदारसंघात मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आणि नाराजी निर्माण झाली होती. सुनील तटकरे यांनी ही नाराजी दूर करण्यासाठी अल्पसंख्याकांचे मेळावे घेतले. महायुतीत असलो तरी सर्वधर्मसमभावाचा विचार सोडणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. मात्र तरीही मतदारसंघात मतांचे धार्मिक ध्रुवीकरण बऱ्याच प्रमाणात झाल्याचे लोकसभा निवडणुकीत दिसून आले होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत विरोधकांपेक्षा धार्मिक ध्रुवीकरण रोखणे हेच मोठे आव्हान आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेकडून विनोद घोसाळकर यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, पण ते मतदारांवर फारसा प्रभाव पाडू शकले नव्हते. यावेळी शिवसेना ठाकरे गटाकडून या मतदारसंघातून दक्षिण रायगडचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

शिवसेनाराष्ट्रवादीत कुरबुरी

लोकसभा निवडणुकीनंतर रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात कुरबुरी वाढल्या आहेत. शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या कर्जत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने युतीचा धर्म पाळला नाही, तर श्रीवर्धनमधून जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर निवडणूक लढवतील, असा थेट इशारा आमदार महेंद्र थोरवे यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे भक्कम संघटन

तटकरे कुटुंबातील तीन आमदार या मतदारसंघातून सातत्याने विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यामुळे गेल्या दीड दशकात श्रीवर्धन हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे भक्कम संघटन असलेला असलेला हा जिल्ह्यातील एकमेव मतदारसंघ आहे.

Story img Loader