हर्षद कशाळकर

अलिबाग : रायगडच्या पालकमंत्रीपदावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि शिवसेनेच्या शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरू असल्याने पालकमंत्रीपद शिंदे गटाकडेच कायम राहते की अजित पवार व तटकरे यांच्या आग्रहामुळे राष्ट्रवादीकडे जाते याची आता उत्सुकता असेल. आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री पद मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आग्रही होते. पण शिवसेनेकडून या मागणीला ठाम विरोध झाला.

mahayuti won assembly election 2024
महायुतीची ‘सत्ता’वापसी; लोकसभेत पराभूत झालेल्या १०५ जागांवर विजयी
congress in assembly election
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला धक्का; महाराष्ट्रात निराशा अन् झारखंडमध्येही…
Maharashtra vidhan sabha election 2024
विधानसभेचे ७० लाख वाढीव मतदान
manoj jarange patil latest marathi news
जरांगे प्रभाव की ‘लाडकी बहीण’? मराठवाड्यात निकालाची उत्सुकता
Maharashtra vidhan sabha election 2024
तावडे यांची राहुल गांधी, खरगेंना नोटीस; २४ तासांत आरोप मागे घ्या, अन्यथा १०० कोटींचा बदनामीचा दावा
pune vidhan sabha vote counting
मतमोजणीस विलंबाची शक्यता? लोकसभेच्या तुलनेत विधानसभेत टपाली मतदानात दुपटीने वाढ
congress sachin pilot mahavikas aghadi
‘मविआ’च्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा एका दिवसात जाहीर करणार, काँग्रेसचे सरचिटणीस सचिन पायलट यांची माहिती
administration ready for vote counting postal ballots to be counted first
मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; मुंबईत १० ठिकाणी केंद्रे; सुरुवातीला टपाल मतांची मोजणी

शिवसेना आमदारांच्या या मागणीला भाजपच्या आमदारांचेही समर्थन मिळाले. त्यामुळे आदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्री पदावर वर्णी लागू शकली नाही. खरे तर आदिती तटकरे यांच्या मंत्रीमंडळातील समावेशानंतरच शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेकडेच राहील असे जाहीर करून टाकले होते. यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी आम्ही रायगडच्या पालकमंत्रीपद मागितले नसल्याचे सांगत या वादावर पडदा टाकण्याचा प्रय़त्न केला होता. पण दुसरीकडे पुणे, नाशिक आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळावे यासाठी प्रयत्न सुरु ठेवले होते. याची कुणकूण शिवसेना आमदारांना होतीच.

हेही वाचा >>> परभणीत पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे शिंदे गटाला मोठा धक्का

त्यामुळे आदिती यांना कुठल्याही जिल्ह्याची जबाबदारी द्या पण रायगड नको, अशी मागणी शिवसेना आमदारांकडून केली जात होती. या मागणीला जिल्ह्यातील भाजपच्या तीनही आमदारांचा पाठींबा असल्याचे गोगावले सातत्याने सांगत होते. अखेर शिवसेना आमदारांच्या दबावामुळे तुर्तास तरी आदिती यांना रायगडच्या पालकमंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडेच सध्या तरी रायगडच्या पालकमंत्री पदाची धुरा कायम राहणार आहे.

पालकमंत्री पदावरून शिवसेना राष्ट्रवादीत वादाची पार्श्वभूमी…

महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद शिवसेनेकडे असावे अशी मागणी शिवसेनेच्या तीनही आमदारांनी तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली होती. मात्र आमदारांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत उध्दव ठाकरे यांनी रायगडचे पालकमंत्री पद आदिती तटकरे यांच्याकडे सोपविले होते. तेव्हापासून दोन्ही पक्षात सुप्त संघर्ष सुरु झाला होता. नंतरही कधी विकास निधी वाटपावरून, कधी श्रेयवादावरून, तर कधी मतदारसंघात पालकमंत्र्याकडून होणाऱ्या हस्तक्षेपावरून दोन्ही पक्षात खटके उडत राहीले. त्यामुळे भरत गोगावले यांचा नेतृत्वाखाली शिवसेना आमदारांनी तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे आदिती यांना पालकमंत्री पदावरून हटावा अशी मागणी केली होती. जी ठाकरे यांनी धुडकावली. यामुळे नाराज शिवसेना आमदारांनी बंडखोरी करत महाविकास आघाडी सरकारची सत्ता उलथवून लावली होती.

रायगडच्‍या पालकमंत्री पदाचा कुठलाच तिढा नाही, सरकार स्‍थापन झाल्‍यापासून शिवसेनेचे उदय सामंत पालकमंत्री आहेत. मुख्‍यमंत्री आणि उपमुख्‍यमंत्री यांच्‍या सांगण्‍यानुसार सर्व सुरळीत सुरू आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री पद शिवसेनेकडेच राहील जेव्‍हा मंत्रिमंडळाचा विस्‍तार होईल तेव्‍हा आपला समावेश होईल आणि मीच रायगडचे पालकमंत्री होईन. -भरत गोगावले, आमदार शिवसेना, शिंदे गट