मुंबई : शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदी आदित्य ठाकरे तर विधानसभा गटनेतेपदी भास्कर जाधव यांची सोमवारी निवड करण्यात आली. पक्षात फूट टाळण्यासाठी सर्व आमदारांकडून शपथपत्र लिहून घेण्यात आले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’ निवासस्थानी नवनिर्वाचित २० आमदारांच्या बैठकीत आमदार आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी तर भास्कर जाधव यांची विधानसभेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. पक्षात पुन्हा फाटाफूट टाळण्यासाठी सावध पवित्रा घेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच निर्णय अंतिम राहील, असे शपथपत्रही लिहून घेण्यात आले.

MVA allegation is that money is being distributed to the police by BJP Pune news
भाजपकडून पाेलीस बंदाेबस्तात पैशांचे वाटप? ‘मविआ’चा आरोप, महायुतीचेही प्रत्युत्तर..
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
uddhav thackeray emotional appeal impact to voters
उद्धव यांचे भावनिक आवाहन ठाकरे सेनेला कितपत तारणार? मराठवाड्याकडे विशेष लक्ष?
A case has been registered against Shaina NC for circulating a fake letter on X social media in the name of Muzaffar Hussain
काँग्रेस नेते मुझफ्फऱ हुसेन यांच्या नावाचे बनावट पत्र; शिवसेना नेत्या शायना एनसी यांच्यावर गुन्हा दाखल
Bhaskar Jadhav sunil kedar
“सुनील केदार हे मारुतीच्या बेंबीतला विंचू”, शिवसेना नेते भास्कर जाधव यांची जहरी टीका
maharashtra assembly election 2024 amit thackeray sada saravankar mahesh sawant dadar mahim assembly constituency
लक्षवेधी लढत : दोन्ही ठाकरेंसाठी वर्चस्वाची लढाई
congress rajya sabha mp abhishek manu singhvi at loksatta loksamvad event
आरक्षणावर सर्वोच्च न्यायालय विरुद्ध सारे राजकीय पक्ष

हेही वाचा >>>Nana Patole: पटोलेंच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यापासूनच काँग्रेसच्या घसरणीला सुरुवात

विधानसभेत बहुमत मिळालेल्या सत्ताधारी पक्षाकडून विरोधी पक्षातील आमदार संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत असल्याने उद्धव ठाकरे यांनी तत्काळ सावध पवित्रा घेतला. पक्षप्रतोद सुनील प्रभू यांनी विधिमंडळ पक्षनेते म्हणून आदित्य ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, तर अजय चौधरी यांनी गटनेतेपदासाठी गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. अजय चौधरी यांच्या जागी निवड करताना भास्कर जाधव यांची आक्रमकता, विधिमंडळ कायद्याचा, नियमांचा अभ्यास या बाबी गृहीत धरण्यात आल्या.

हेही वाचा >>>Sharad Pawar: ‘ट्रम्पेट’मुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ९ उमेदवार पराभूत

आपण २० असलो तरी पुरून उरू – उद्धव ठाकरे

या बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी नवनिर्वाचित आमदारांना विश्वास दिला. ते फडण‘वीस’ असले तरी आपण ‘वीस’ आहोत, आपण त्यांना पुरून उरू, अशा शब्दांत त्यांनी आमदारांना आश्वस्त केले. यावेळी आमदारांकडून घेण्यात आलेल्या शपथपत्रामध्ये विधिमंडळाबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार पक्षप्रमुखांना असून त्यांचा निर्णय बंधनकारक राहणार असल्याचे नमूद करण्यात आले.

सुनील प्रभू पुन्हा पक्षप्रतोद

शिवसेना नेते सुनील प्रभू यांची पुन्हा पक्षप्रतोदपदी निवड करण्यात आली. शिवसेना ठाकरे गटाच्या पक्ष आणि चिन्हासाठीच्या सर्वोच्च न्यायालयातील तसेच विधानसभा अध्यक्षांसमोरील लढाईत सुनील प्रभू यांनी पक्षप्रतोद म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली.